सेवा सभा आराखडा
नोव्हेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.
१५ मि: “समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? माहितीपत्रक कसे सादर कराल.” या प्रकाशनातील कोणती गोष्ट त्यांना आवडते यावर विवेचन मांडण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. माहितीपत्रक कसे सादर करायचे त्याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. स्थानीय क्षेत्रात वेगळी पद्धत प्रभावी ठरेल असे वाटत असल्यास, यावर चर्चा केली जाऊ शकते व त्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाऊ शकते.
२० मि: “काळाच्या निकडीची जाणीव ठेवा!”a टेहळणी बुरूज जानेवारी १५, २०००, पृष्ठे १२-१३ वरील मुद्द्यांचा समावेश करा.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २१ (१९१)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचना तुमच्या मंडळीच्या क्षेत्रासाठी लागू होणाऱ्या असतील तर ऑक्टोबर-डिसेंबर सावध राहा! अंक (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) नोव्हेंबर १५ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर समर्पक सादरतांचाही उपयोग केला जाऊ शकतो.
१५ मि: दिल्याने मिळणारा आनंद तुम्ही कधी अनुभवला आहे का? टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००४, पृष्ठे १९-२३ वरील लेखावर आधारित भाषण.
२० मि: व्यक्तिगत व कौटुंबिक अभ्यासात इंडेक्सचा उपयोग करणे. वडिलांचे भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. यहोवाने आपले वचन आणि आपली संघटना यांद्वारे मौल्यवान मार्गदर्शनाची व उत्तेजनाची जणू काय एक खाणच आपल्याला दिली आहे. ही माहिती खोदून काढण्याकरता एक प्रमुख साधन आहे, वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स. मुलांपासून आजीआजोबांपर्यंत, नवोदितांपासून वडिलांपर्यंत, सर्वांना लाभदायक उद्देशास्तव त्यांना हवे असलेले संदर्भ यात मिळू शकतात. (१ तीम. ३:१५) मेंढपाळ भेटीची तयारी करताना एक वडील आणि एक सेवा सेवक इंडेक्सचा उपयोग कसा करतात त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारक, निर्णय घेण्याकरता, भाषण तयार करताना, साप्ताहिक बायबल वाचनाचा आणखी फायदा मिळण्याकरता, शास्त्रवचनीय माहिती शोधून काढण्याकरता इंडेक्सचा कसा उपयोग करू शकतात त्याची चर्चा करा. ज्यातून संशोधन करता येते अशा अलिकडेच मंडळ्यांना मिळालेल्या प्रकाशनांचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१० मि: स्थानीय गरजा.
२५ मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग ३.”b दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. परिच्छेद ३ वर चर्चा झाल्यानंतर, अपेक्षा माहितीपत्रकाचा पाठ ५, परिच्छेद १ यावर बायबल अभ्यास संचालित करत असल्याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. परिच्छेद वाचून झाला आहे आणि प्रश्नाचे उत्तरही देऊन झाले आहे. अभ्यास संचालक आणि विद्यार्थी, यशया ४५:१८ आणि उपदेशक १:४ ही वचने वाचतात व त्यांवर चर्चा करतात. संचालक साध्या प्रश्नांचा उपयोग करून विद्यार्थ्यास, प्रत्येक वचन, ज्या मुद्द्यावर चर्चा चालली आहे त्याजशी कशाप्रकारे संबंधित आहे याचे स्पष्टीकरण देण्यास प्रवृत्त करतो.
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २९ (२२२)
१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा नोव्हेंबरचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि डिसेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण.
२० मि: समाधानी जीवन माहितीपत्रकाचा उपयोग करून आस्था वाढवा. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. हे माहितीपत्रक सादर करतानाचे एक किंवा दोन उल्लेखनीय अनुभव सांगण्याची आधीच योजना करा. पृष्ठ २ वरील माहितीचा उपयोग करून माहितीपत्रकाच्या विषयांचे संक्षिप्त वर्णन करा आणि पुनर्भेटींच्या वेळी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करता येईल त्यावर जोर द्या. पुनर्भेटीचे एक प्रात्यक्षिक दाखवा. एक किंवा दोन उल्लेखित शास्त्रवचने वाचून त्यावर चर्चा करा. काही पुनर्भेटींनंतर, अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक दिले जाऊ शकते.
गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. डिसेंबर महिन्यात कोणते प्रकाशन सादर करायचे आहे ते सांगा. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करत असल्याचे एक किंवा दोन प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: “तुम्ही मदतीचा हात पुढे करू शकाल का?”c इतरांनी दिलेल्या साहाय्याबद्दल किंवा उत्तेजनाबद्दल गुणग्राहकता बाळगणाऱ्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या.
१५ मि: सेवा सभेतून पूर्ण लाभ घ्या. आपली सेवा पुस्तकाच्या पृष्ठे ७१-२ वर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. ख्रिस्ती सेवक म्हणून सुधारणा करण्याकरता सेवा सभा आपल्याला कोणत्या पाच क्षेत्रात मदत पुरवते? गेल्या महिन्याच्या सेवा सभा कार्यक्रमातल्या उदाहरणांचा उल्लेख करा. पूर्व तयारी करण्याचे फायदे काय आहेत? सेवा सभेला नियमित उपस्थित का राहिले पाहिजे? शास्त्रवचनांमध्ये या सभेचे कोणते उदाहरण आहे?
गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.