वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०४ पृ. १
  • काळाच्या निकडीची जाणीव ठेवा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काळाच्या निकडीची जाणीव ठेवा!
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • निकडीची भावना टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • प्रचार कार्य करण्यासाठी निकडीची भावना कशी विकसित कराल?
    आमची राज्य सेवा—२०१४
  • अंत जवळ येत असता अधिक साक्षकार्य करणे
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ११/०४ पृ. १

काळाच्या निकडीची जाणीव ठेवा!

१ आपल्या पित्याचे कार्य पृथ्वीवर पूर्ण करण्याकरता आपल्याजवळ मर्यादित वेळ आहे, हे येशूला माहीत होते. (योहा. ९:४) म्हणूनच त्याने काळाच्या निकडीची जाणीव ठेवून आपली सेवा पूर्ण केली आणि आपल्या शिष्यांना देखील असेच करण्याचे प्रशिक्षण दिले. (लूक ४:४२-४४; ८:१; १०:२-४) ऐषोआराम देणाऱ्‍या भौतिक गोष्टींना त्याने दुय्यम स्थानी ठेवले. (मत्त. ८:२०) यामुळेच तो यहोवाने त्याला दिलेले कार्य पूर्ण करू शकला.—योहा. १७:४.

२ मर्यादित वेळ: “सर्व जगात” सुवार्तेचा प्रचार करण्याचाही काळ मर्यादित आहे. (मत्त. २४:१४) बायबल भविष्यवाणी दाखवते, की आपण अंत समयात बऱ्‍याच दूर येऊन पोहंचलो आहोत. लवकरच, ‘जे देवाला ओळखत नाहीत आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शुभवर्तमान मानीत नाहीत [ते] . . . सर्वकालचा नाश हा दंड भोगतील.’ (२ थेस्सलनी. १:६-९, पं.र.भा.) हा न्यायदंड अतिशय अकस्मात येईल. (लूक २१:३४, ३५; १ थेस्सलनी. ५:२, ३) लोकांना त्यांच्या धोकेदायक परिस्थितीची जाणीव झाली पाहिजे. अजूनही वेळ आहे तोपर्यंत त्यांनी यहोवाची मर्जी संपादावी म्हणून त्यांना मदत करण्याची आपली जबाबदारी आहे.—सफ. २:२, ३.

३ आपल्या परीने सर्व प्रयत्न करणे: “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे” हे ओळखल्यामुळे देवाचे सेवक प्रचार कार्याला प्रथम स्थान देतात. (१ करिंथ. ७:२९-३१; मत्त. ६:३३) काहींनी सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्याकरता आर्थिक सुसंधी किंवा इतर व्यक्‍तिगत कामे सोडून दिली आहेत. (मार्क १०:२९, ३०) इतर जण, परिक्षांचा सामना करत करत ‘प्रभूमध्ये श्रम’ घेत आहेत. (१ करिंथ. १५:५८) पुष्कळ जण न डगमगता अनेक दशकांपासून सुवार्तेचा जाहीरपणे प्रचार करत आहेत. (इब्री १०:२३) राज्यासाठी केलेल्या या सर्व त्यागांची यहोवा खूप कदर करतो.—इब्री ६:१०.

४ यहोवाच्या उपासनेला आणि प्रचार कार्याला आपल्या जीवनात केंद्रस्थानी ठेवल्याने आपल्याला यहोवाच्या दिवसाचे विस्मरण होणार नाही. तसेच आपले लक्ष सैतानी जगाच्या विकर्षणांमुळे विचलित होणार नाही व पवित्र वर्तणूक ठेवण्याचा आपला दृढनिश्‍चय पक्का होईल. (२ पेत्र ३:११-१४) होय, काळाच्या निकडीची जाणीव ठेवून आपली सेवा पूर्ण केल्यामुळे, आपला आणि आपला संदेश ऐकणाऱ्‍या लोकांचाही जीव वाचू शकतो.—१ तीम. ४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा