मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी ऐकल्यावर आपल्याला दुःख होते. कदाचित तुम्हीही कधी विचार केला असेल, ‘देवाला खरच काळजी आहे का?’ [उत्तर ऐका. मग स्तोत्र ७२:१२-१४ वाचा.] या लेखात चर्चा केली आहे की मुलांविषयी देवाच्या कशा भावना आहेत आणि ज्यांना अत्याचार सहन करावा लागतो त्या सर्वांना तो त्यांपासून कशाप्रकारे लवकरच कायमचे मुक्त करेल.”
टेहळणी बुरूज ऑक्टो.१५
“काही लोक म्हणतात की माणसाजवळ जितका पैसा असेल तितके त्याला जीवनात समाधान मिळेल. तुम्हालाही असेच वाटते का? [उत्तर ऐका.] एका गर्भश्रीमंत माणसाने काय लिहिले पाहा. [उपदेशक ५:१० वाचा.] भौतिक संपत्तीपेक्षा कोणत्या गोष्टी अधिक मोलवान आहेत याविषयी या नियतकालिकात चर्चा केली आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“इतर देशांतील, खासकरून तरुणांमध्ये वाढत असलेल्या अनैतिकतेविषयी आपण ऐकतो तेव्हा आपल्या सर्वांनाच काळजी वाटते. इथेही असेच घडत आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] देवाने याबाबतीत कोणता सल्ला दिला आहे ते पाहा. [१ थेस्सलनीकाकर ४:३-५ वाचा.] या नियतकालिकात अनैतिकतेचे कोणते धोके आहेत आणि आत्मसंयम दाखवल्यास एक व्यक्ती हे धोके कशाप्रकारे टाळू शकते हे स्पष्ट केले आहे.”
टेहळणी बुरूज नोव्हें.१
“आपल्या काळातील समस्या सोडवण्याबाबत मानवी नेत्यांच्या क्षमतेवर बऱ्याच लोकांना आजकाल भरवसा राहिलेला नाही. या वचनांत जे लिहिले आहे ते पूर्ण करण्यास कोणी समर्थ आहे असे तुम्हाला वाटते का? [स्तोत्र ७२:७ १२, १६ वाचा. मग उत्तर ऐका.] या नियतकालिकात स्पष्ट केले आहे की या भविष्यवाणीत ज्याच्याविषयी सांगितले आहे तो नेता कोण आहे आणि तो काय साध्य करेल.”