ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
डिसेंबर २७, २००४ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, नोव्हेंबर १ ते डिसेंबर २७, २००४ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. एखाद्या विषयात श्रोत्यांची रसिकता वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे? [be पृ. २१८ परि. ३]
२. प्रभावीपणे समारोप करण्याचे पाच मार्ग कोणते? [be पृ. २२० परि. ४-पृ. २२१ परि. ४]
३. आपली विधाने अचूक आहेत याची आपण खात्री कशी करू शकतो? [be पृ. २२४ चौकोन]
४. मंडळीमध्ये आपण सादर करत असलेल्या भागावरून आपल्याला, “सत्याचा स्तंभ व पाया” असलेल्या मंडळीच्या भूमिकेबद्दल गहिरा आदर आहे हे कसे दाखवू शकतो? (१ तीम. ३:१५) [be पृ. २२४ परि. १-४]
५. चालू घटना, एखाद्याने उद्गारलेले शब्द आणि अनुभव सांगताना आपण नीतिसूत्रे १४:१५ कसे लागू करू शकतो? [be पृ. २२५ परि. १]
नेमणूक क्र. १
६. जलप्रलयाच्या काळापासून मागे आदामाच्या उत्पत्तिपर्यंतचा काळ आपण कसा मोजू शकतो? [si पृ. २८६ परि. १२]
७. येशूने कोणत्या तारखेला सेवा सुरू केली हे कसे ठरवता येते आणि त्याची सेवा फक्त साडेतीन वर्षे होती यावर विश्वास ठेवण्यासाठी कोणता आधार आहे? [si पृ. २९१ परि. १६]
८. (अ) “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा” केव्हा देण्यात आली? (ब) तेव्हापासून येशू मशीहा म्हणून प्रकट होईपर्यंत किती वर्षे उलटणार होती? (दानी. ९:२४-२७) [si पृ. २९१ परि. १८-१९]
९. ‘आपल्या भावाबरोबर समेट’ करता यावा म्हणून प्रामाणिकपणे माफी मागण्यात कशाचा समावेश होतो? (मत्त. ५:२३, २४) [w-MR०२ ११/१ पृ. ६ परि. १, ५]
१०. २ राजे १३:१८, १९ आपल्याला देवाने दिलेली कामगिरी पूर्ण करण्याविषयी काय शिकवते? [w-MR०२ १२/१ पृ. ३१ परि. १-२]
साप्ताहिक बायबल वाचन
११. इस्राएली लोक रक्त वाहू न दिलेला मृत प्राणी स्वतः न खाता तो एखाद्या उपऱ्याला अथवा परक्याला का देऊ शकत होते? (अनु. १४:२१)
१२. अनुवाद २०:५-७ मध्ये आपल्यासाठी कोणता धडा आहे?
१३. ‘जाते किंवा जात्याची वरची तळी गहाण ठेवून घेणे’ हे “मनुष्याचे जीवितच” गहाण ठेवण्यासारखे का होते? (अनु. २४:६)
१४. इस्राएलांना चरबी खाण्याची मनाई होती, मग “कोकरांची चरबी” खाण्याचा काय अर्थ होतो? (अनु. ३२:१३, १४)
१५. आखानाच्या पापी मार्गाक्रमणाचे आधुनिक उदाहरण कोणते आहे? (यहो. ७:१-२६) [w-MR८७ १/१ पृ. २० परि. २०]