प्रश्न पेटी
◼ आपण जेव्हा जेव्हा पुनर्भेटीसाठी जातो, तेव्हा तेव्हा घरमालकाला आपल्या जागतिक कार्याकरता वर्गणी देण्याबद्दल उल्लेख करण्याची गरज आहे का?
नाही. डिसेंबर १९९९ च्या आमची राज्य सेवा अंकातील “आपल्या साहित्याचा विचारशीलपणे उपयोग करा,” या लेखात असे म्हटले होते: “कधीकधी, आपल्याला जगभरातील कार्यासाठी वर्गणीच्या विषयाची चर्चा करायला जरा विचित्रच वाटेल.” अशा वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आपले खरोखरच बायबलचे शिक्षण देणारे काम आहे, व्यापार नाही हे लोकांनी स्पष्ट समजून घ्यावे अशी आपली इच्छा आहे. आपण वर्गण्या मागत नाही.
आस्था दाखवणाऱ्या लोकांना आपण पहिल्यांदा प्रकाशन देतो तेव्हा, आपले कार्य स्वच्छेने दिलेल्या वर्गण्यांवर चालते हे स्पष्टपणे सांगणे सहसा उचित आहे. जे लोक आस्था दाखवतात किंवा आपली प्रकाशने वाचण्याची आवड दाखवतात केवळ अशांनाच आपण आपली प्रकाशने देतो, हे जर आपण लक्षात ठेवले तर साहजिकच दानाविषयीचा उल्लेख करू.
पुष्कळ आस्थेवाईक लोक दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटींमध्ये स्वतःहून वर्गणी देण्यास पुढाकार घेतील. इतरजण एखाद्या प्रकाशनाची किंमत विचारतील. आपण त्यांना सांगू शकतो, की आपले कार्य व्यापारी कार्य नाही, आपण आस्थेवाईक लोकांना आपली प्रकाशने किंमत न घेता देतो. त्यांना हेही सांगू शकतो, की जगभरात चालणाऱ्या या कार्याला जो कोणी हातभार लावू इच्छितो तो त्याच्यापरीने वर्गणी देऊ शकतो. जर घरमालक दान देण्याविषयी काही बोलतच नसेल तर उचित संधी पाहून आपण पुनर्भेट देताना वेळोवेळी जगभरात चाललेल्या कार्याला हातभार लावण्याचा विषय काढू शकतो.
आपण आपली प्रकाशने आस्थेवाईक लोकांना किंमत न घेता देत असलो तरी, ही प्रकाशने छापण्यासाठी व त्यांचे वितरण करण्यासाठी किंमत मोजावी लागते, हे आपण विसरू नये. आपल्याला खात्री आहे, की देवाचा आत्मा त्याच्या सेवकांना व क्षेत्रातील आस्थेवाईक लोकांना ऐच्छिक वर्गणी देण्यास प्रवृत्त करेल जेणेकरून संपूर्ण जगभरात चाललेल्या विविध पैलूंतील कार्याचा खर्च निघेल.
◼ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या व्यक्तिगत प्रती कशा मिळवता येतील?
सर्व भाषेतील टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गणीची व्यवस्था काही काळापूर्वी रद्द करण्यात आल्यामुळे सर्व प्रचारकांनी आपल्या स्थानीय मंडळीतून आपली व्यक्तिगत प्रत घेतली पाहिजे. फक्त ब्रेलमध्ये छापली जाणारी मासिके याला अपवाद आहेत; ती लायक असलेल्यांना मोफत पाठवली जातात. कृपया याची नोंद घ्या की मंडळ्या, विदेशी भाषेची आणि मोठ्या अक्षरांच्या आवृत्तीची मागणी काँग्रीगेशन रिक्वेस्ट (M-202) फॉर्मचा उपयोग करून करू शकतात.
तुमच्या क्षेत्रातील कोणी नियमितरीत्या नियतकालिके मागत असेल तर न चुकता त्यांना नियतकालिके देत राहा जेणेकरून एकही अंक चुकणार नाही. बहिष्कृत व्यक्ती व्यक्तिगत वापरासाठी नियतकालिके किंवा इतर प्रकाशने राज्य सभागृहातील नियतकालिक व प्रकाशन काऊंटरवरून घेऊ शकते. प्रचारकांनी बहिष्कृत व्यक्तीला मासिक मार्गाद्वारे नियतकालिके देऊ नयेत.
भारत शाखा दफ्तर केवळ अशा व्यक्तींच्या वर्गण्यांची नोंद ठेवेल ज्यांना कोणत्याही मंडळीच्या प्रचारकाकडून मासिक मार्गाद्वारे नियतकालिके मिळू शकत नाहीत. मंडळीच्या सेवा समितीने जर एखाद्या अशा व्यक्तीला वर्गणी पाठवण्याविषयी विनंती केली असेल जिला नियतकालिके मिळण्याचा दुसरा मार्ग नाही तर मंडळीच्या सचिवांनी, या विनंतीचा विचारविमर्श करण्यात आला आहे आणि मंडळीच्या सेवा समितीने ती विनंती स्वीकारली आहे या आशयाची एक लहानशी टीप सोबत पाठवावी.
याचा अर्थ, प्रचारक व्यक्तिगत वर्गणीची मागणी करण्याकरता शाखा दफ्तराला पत्र पाठवू शकत नाहीत. प्रचारकांनी किंवा आस्थेवाईक लोकांनी वर्गण्यांची मागणी करणारी अशी पत्रे शाखेला पाठवली तर ती पत्रे पुन्हा मंडळीला पाठवली जातील.