तुम्ही देखील ज्यात सामील आहात अशी घोडदळ
१, २. देवाचे सेवक आज, प्रकटीकरण ९:१३-१९ मध्ये लिहून ठेवलेल्या भविष्यसूचक दृष्टान्ताच्या पूर्णतेत कशाप्रकारे गोवलेले आहेत?
१ “सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला.” त्यानंतर, “वीस कोटी” संख्या असलेली घोडदळे गर्जना करीत गेली. हे काही साधेसुधे लष्करी बळ नव्हे. “त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती.” त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक येत होते आणि त्यांची “शेपटे सापांसारखी” होती. या लाक्षणिक घोडदळीनंतर सर्वकाही उद्ध्वस्त होते. (प्रकटी. ९:१३-१९) या लक्षवेधक भविष्यसूचक दृष्टान्ताच्या पूर्णतेत तुम्ही कसे गोवलेले आहात हे तुम्हाला माहीत आहे का?
२ अभिषिक्त शेष आणि त्यांचे सोबती अर्थात दुसरी मेंढरे एकजुटीने देवाच्या न्यायदंडाची घोषणा करत आहेत. यामुळे ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिकरित्या मृत स्थिती पूर्णपणे उघडकीस येते. देवाच्या सेवकांचे सेवाकार्य इतके परिणामकारक का आहे हे ठळकपणे दाखवणाऱ्या भविष्यसूचक दृष्टान्तातील दोन घटकांचे आपण परीक्षण करू या.
३. देवाचा संदेश प्रभावीपणे सांगण्यास तुम्हाला कोणते प्रशिक्षण मिळाले आहे?
३ देवाचा संदेश सांगण्यासाठी प्रशिक्षित व सुसज्ज: ईश्वरशासित सेवा प्रशालेद्वारे आणि मंडळीच्या इतर सभांद्वारे देवाच्या सेवकांना, देवाचा संदेश पूर्ण अधिकाराने सांगण्यास प्रशिक्षण देण्यात आले आहे. येशू आणि त्याचे शिष्य यांचे अनुकरण करून हे सेवक योग्य असलेल्यांना शोधतात व लोक भेटतील तेथे त्यांना प्रचार करतात. (मत्त. १०:११; मार्क १:१६; लूक ४:१५; प्रे. कृत्ये २०:१८-२०) प्रचाराची ही बायबल आधारित पद्धत किती प्रभावी ठरली आहे!
४. अनेक प्रचारकांना आपले कार्य पूर्ण करण्याकरता कोणते साधन उपलब्ध आहे?
४ देवाने दिलेली ही कामगिरी पूर्ण करताना ख्रिस्ती सेवकांनी कोट्यवधी बायबल, पुस्तके, माहितीपत्रके आणि नियतकालिके वितरीत केली आहेत. ही प्रकाशने, जवळजवळ ४०० भाषांमध्ये व विविध प्रकारच्या लोकांना आवडतील अशा विविध विषयांद्वारे पुरवण्यात आली आहेत. तुम्ही या साधनांचा परिणामकारक पद्धतीने उपयोग करीत आहात का?
५, ६. यहोवाच्या लोकांना स्वर्गीय पाठिंबा आहे हे कशावरून सूचित होते?
५ स्वर्गीय मार्गदर्शन व पाठिंबा: भविष्यसूचक दृष्टान्तात हेही स्पष्ट करण्यात आले होते, की या कार्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लाक्षणिक घोडदळाला देवाचा पाठिंबा आहे. (प्रकटी. ९:१३-१५) विश्वव्यापी प्रचार कार्य, मानवी बुद्धीने किंवा शक्तीने साध्य होत नाही तर देवाच्या आत्म्याने साध्य होते. (जख. ४:६) या कार्याला मार्गदर्शन देण्याकरता यहोवा आपल्या दूतांचा उपयोग करतो. (प्रकटी. १४:६) त्यामुळे नम्र लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता यहोवा, आपल्या मानवी साक्षीदारांच्या प्रयत्नांना स्वर्गीय पाठिंबा देतो.—योहान ६:४५, ६५.
६ यहोवाचा संदेश सांगण्यास प्रशिक्षित, सुसज्ज आणि देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेल्या त्याच्या लोकांना कोणीही थांबवू शकत नाही. तेव्हा, या लक्षवेधक भविष्यसूचक दृष्टान्ताच्या पूर्णतेतील भूमिका आपण पूर्ण करीत राहू या.