वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. १
  • गट साक्षकार्यामुळे आनंद मिळतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गट साक्षकार्यामुळे आनंद मिळतो
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या क्षेत्र सेवेच्या गटापासून फायदा मिळवा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • प्रचार सेवा गटाच्या व्यवस्थेमुळे कसा फायदा होऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • क्षेत्र सेवेच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००९
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. १

गट साक्षकार्यामुळे आनंद मिळतो

१ आपल्या ७० शिष्यांना प्रचाराला पाठवताना, येशूने त्यांना, काय बोलावे याचे प्रशिक्षण दिले, त्याने दोघा-दोघांना पाठवले आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात कार्य करायचे होते ते सांगितले. यामुळे त्यांच्या आनंदात भर पडली. (लूक १०:१-१७) तसेच आजही, गट साक्षकार्य, देवाच्या लोकांना प्रचारकार्यासाठी सज्ज करते, संघटित करते आणि उत्तेजन देते.

२ वडील पुढाकार घेतात: प्रचार कार्यात सर्वांना नियमित भाग घेण्यास मदत करण्यात वडिलांची महत्त्वाची भूमिका असते. सेवा पर्यवेक्षक, आठवड्यांतल्या मधल्या दिवसांसाठी प्रचाराची व्यवस्था करण्यात पुढाकार घेतात. प्रत्येक पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक, आपल्या गटासाठी खासकरून शनिवार-रविवारच्या दिवशी सेवेची योजना करण्यास जबाबदार आहे. कधीकधी, संपूर्ण मंडळी क्षेत्र सेवेसाठी जमते तेव्हा, जसे की टेहळणी बुरूज अभ्यासानंतर जमते तेव्हा, प्रत्येक पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी आपापल्या गटातील सदस्यांसाठी व्यवस्था करावी.

३ “शिस्तवार व व्यवस्थितपणे”: क्षेत्र सेवेची सभा संचालित करण्यास नेमण्यात आलेल्या बांधवाने ही सभा वेळेवर सुरू करावी आणि ती १० ते १५ मिनिटे घ्यावी. साक्षकार्य गटांची आणि क्षेत्रांची नेमणूक (वर सांगितल्याप्रमाणे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक करत नसल्यास) प्रार्थनेने सभा समाप्त होण्यापूर्वी करावी. यामुळे, प्रचारक जेथे सेवा करणार आहेत तेथे घोळका दिसणार नाही; कारण क्षेत्रात मोठा घोळका दिसल्यास आपल्या कार्याची प्रतिष्ठा उरत नाही आणि जे आपल्या कार्याचा विरोध करतात त्यांच्या नजरेत आपण सहजरीत्या येऊ शकतो. तसेच, हे पौलाच्या सल्ल्याच्या अनुषंगातही आहे जेथे त्याने म्हटले: “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” (१ करिंथ. १४:४०) या सभांना उपस्थित राहणारे सर्व जण, सभेसाठी वेळेवर येण्याद्वारे, पुढाकार घेणाऱ्‍या बांधवाला पूर्ण सहकार्य देण्याद्वारे व गटाची विभागणी झाल्याबरोबर लगेच आपापल्या क्षेत्रात निघून जाण्याद्वारे, या व्यवस्थेला हातभार लावू शकतात.

४ एकत्र आल्याने ऐक्य वाढते: गट साक्षकार्याच्या व्यवस्थेमुळे, आपल्याला मंडळीतील सर्वांना जवळून ओळखण्याची उत्तम संधी मिळते. आपण साक्षकार्यात कोणाबरोबर काम करणार याची आधीच योजना करण्यात काही गैर नसले तरी, अशा प्रकारच्या आगाऊ योजना न करताच क्षेत्र सेवेच्या सभांना उपस्थित राहिल्याने देखील बरेच प्रतिफळ मिळू शकते. आपल्याला कदाचित अशा बंधू अथवा भगिनीबरोबर सेवा करावयास सांगितले जाईल, ज्यांना आपण व्यवस्थितरीत्या ओळखत नसू; यामुळे आपले प्रेम “विशाल” होऊ शकते.—२ करिंथ. ६:११-१३.

५ गट साक्षकार्यामुळे आपल्याला उत्तेजन मिळते आणि ‘सत्यामध्ये सहकारी’ म्हणून आपण एकमेकांच्या समीप येतो. (३ योहा. ८) यास्तव, गट साक्षकार्यात आपण पूर्ण सहभाग घेऊ या!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा