सेवा सभा आराखडा
सूचना: अधिवेशन होणाऱ्या महिन्यांत दर आठवड्यासाठी, आमची राज्य सेवा यात एका सेवा सभेचा आराखडा दिला जाईल. “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता मंडळ्या आवश्यक ते फेरबदल करू शकतात. उचित ठरेल तेव्हा, अधिवेशनाला जायच्या शेवटल्या आठवड्यातील सेवा सभेतील शेवटल्या १५ मिनिटांसाठी या महिन्याच्या पुरवणीतील स्थानीयरीत्या लागू होणाऱ्या सल्ल्याची उजळणी करावी. जानेवारी महिन्यात, एका संपूर्ण सेवा सभेत अधिवेशन कार्यक्रमांच्या मुख्य भागांची उजळणी केली जाईल. याची तयारी करण्यासाठी, आपण सर्वांनी अधिवेशनांत अर्थपूर्ण मुद्दे नोंदावेत तसेच, आपल्या जीवनात आणि आपल्या क्षेत्र सेवेत आपण लागू करू इच्छिणाऱ्या विशिष्ट मुद्द्यांची देखील नोंद घ्यावी. मग, अधिवेशनाला उपस्थित राहिल्यापासून आपण त्या सूचनांचा अवलंब कसा करत आलो आहोत ते सांगून आपण इतरांना उत्तेजन देऊ शकतो.
जुलै १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) आणि जुलै १५ चा टेहळणी बुरूज अंक मंडळीच्या क्षेत्रात कशाप्रकारे सादर केला जाऊ शकतो त्याची दोन वास्तविक वाटणारी प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा.
१५ मि: “यहोवाचे गौरव करण्याकरता एकत्र जमणे.”a दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या सकाळपासून तिसऱ्या दिवसाच्या शेवटल्या भाषणापर्यंतच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. कार्यक्रम केवळ ऐकण्यापेक्षा तो आपल्या जीवनात लागू करण्यावर अधिक जोर द्या. जानेवारी महिन्यातील एका सेवा सभेत, प्रांतीय अधिवेशनाच्या ठळक मुद्द्यांची उजळणी करण्यासाठी जी योजना करण्यात आली आहे तिची नोंद घ्या. सर्वांना टिपणी घेण्याचे उत्तेजन द्या.
२० मि: “यहोवाच्या दयेबद्दल कृतज्ञता.”b परिच्छेद ३ वर चर्चा करताना, मॅगझीन रूट तयार करण्याकरता, आमची राज्य सेवा, ऑक्टोबर १९९८, पृष्ठ ८ वर आधारित काही मुद्दे सुचवा. एक किंवा दोन अनुभवी प्रचारकांना विचारा की बायबल अभ्यास सुरू करताना कोणती पद्धत त्यांना प्रभावी वाटली. सर्वांना, एक बायबल अभ्यास सुरू करून तो संचालित करण्याचे ध्येय ठेवण्याचे उत्तेजन द्या.—om-MR पृ. ९१.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २८ (२२४)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: “चांगल्या कामात एक कित्ता व्हा.”c दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. रूम बुक करण्याविषयी आपल्या लाभास्तव असलेल्या व्यवस्थेचे पालन करण्याच्या गरजेवर जोर द्या. संपूर्ण अधिवेशनादरम्यान स्वच्छता राखणे का महत्त्वाचे आहे ते समजण्यास सर्वांना मदत करा. सर्वांनी उत्तम आचरण का ठेवावे ते समजावून सांगा.
२० मि: प्रचार कार्यातील त्यांच्या धैर्याचे अनुकरण करा. उपासना करा (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे १७०-१ वर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. श्रोत्यांना, परिच्छेद ७ मधील प्रश्नांची उत्तरे देण्यास व उत्तरांमध्ये परिच्छेदांतील वचनांवर टिपणी देण्यास आमंत्रित करा. निवडक वचने वाचा. या अहवालांवरून आपण कोणते धडे शिकतो आणि प्रचार करण्याविषयी आपल्याला मिळालेल्या नेमणुकीबद्दल उचित दृष्टिकोन बाळगण्यास हे धडे आपल्याला कशाप्रकारे मदत करतात यावर अधिक जोर द्या.
गीत क्र. १२ (११३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना जुलै महिन्याचा सेवा रिपोर्ट देण्याची आठवण करा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि ऑगस्ट १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. एका प्रात्यक्षिकात, प्रचारक अनौपचारिक साक्ष देत असल्याचे दाखवा.
१५ मि: “साजेल असा वेष देवाबद्दल आदर व्यक्त करतो.”d वडिलांनी हा भाग हाताळावा. दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. वाचन करणाऱ्या अनुभवी बांधवाला प्रत्येक परिच्छेद मोठ्याने वाचावयास सांगा.
२० मि: “गट साक्षकार्यामुळे आनंद मिळतो.”e परिच्छेद ३ वर चर्चा करताना, आमची राज्य सेवा, सप्टेंबर २००१ मधील प्रश्न पेटीतील मुद्द्यांचा समावेश करा. मंडळीच्या एका पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांची संक्षिप्त मुलाखत घ्या. या पर्यवेक्षकांनी आपल्या गटासाठी कोणत्या क्षेत्र सेवा व्यवस्था केल्या आहेत आणि एकत्र साक्षकार्य केल्यामुळे गटाला कशाप्रकारे लाभ मिळतो, हे त्यांना विचारा.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट ४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
१० मि: स्थानीय घोषणा. या महिन्याच्या साहित्य सादरतेविषयी सांगा. एक किंवा दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा ज्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.
२० मि: “बहुभाषिक क्षेत्रात साहित्य सादर करणे.”f दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. परिच्छेद ३ वर चर्चा करताना, स्थानीय क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या आणि ज्या भाषेची मंडळी नाही अशा दुसऱ्या एका भाषेतील एक साधेसे प्रात्यक्षिक सादर करा.
१५ मि: “अपंग—तरी फलदायी.”g इतरजण कशाप्रकारे मदत करू शकतात यावर, सावध राहा! (इंग्रजी), ऑगस्ट २२, १९९०, पृष्ठे २२-३ वरील, “काय केले जाऊ शकते?” या पोटमथळ्याखालील माहितीच्या आधारावर विवेचन द्या.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
f एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
g एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.