सेवा सभा आराखडा
जून ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २६ (२१२)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) आणि जून १५ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. प्रत्येक सादरतेत एक शास्त्रवचन दाखवा.
१५ मि: “ख्रिस्ती सेवा—आपले प्रमुख कार्य.”a पूर्ण वेळेच्या सेवेत उतरल्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांचा विचार करायला तरुणांना उत्तेजन द्या. टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २०००, पृष्ठे १९-२० वरील “विवेक आणि समाज यातील दुमत” या पोटमथळ्याखालील माहितीमधील काही मुद्दे सांगा.
२० मि: “सेवानिवृत्ती—कार्य साधण्याजोगे द्वार?”b शक्य असल्यास, एखाद्या अशा प्रचारकाची मुलाखत घ्या ज्यांनी यहोवाच्या सेवेत अधिक करण्यासाठी आपल्या निवृत्तीचा उपयोग केला आहे. त्यांनी कोणते फेरबदल केले आहेत आणि यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत ते विचारा.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १ (१३)
८ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
३७ मि: आपल्या कामाबद्दल लोकांचा गैरसमज होतो तेव्हा. शाखा दफ्तराने पाठवलेल्या रूपरेषेच्या आधारावर सुयोग्य वडिलांनी हा भाग हाताळावा.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २८ (२२४)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि जुलै १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. एका प्रात्यक्षिकात, प्रचारक रस्त्यावरील साक्षकार्य करीत असल्याचे दाखवा.
२० मि: “तत्परतेने ‘पूर्णपणे साक्ष’ द्या.”c दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. परिच्छेद ५ आणि ६ वर चर्चा केल्यावर, दुकानातील गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीला साक्ष देऊन तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका देत असल्याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. परिच्छेद ७ आणि ८ ची चर्चा करायच्या आधी परिच्छेद मोठ्याने वाचा. शेवटी, “यांना विसरू नका!” ही पेटी वाचून त्यावर चर्चा करा.
१५ मि: “सतत बदलत असलेल्या जगात प्रचार करणे.”d परिच्छेद २-३ वर चर्चा करताना, स्थानीय क्षेत्रात संभाषण सुरू करण्यासाठी कोणत्या चालू घटनांचा उल्लेख करता येऊ शकतो हे श्रोत्यांना विचारा. परिच्छेद ४ वर चर्चा करताना, दिलेल्या सादरतांपैकी एकीचा उपयोग करून संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना जून महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी असलेल्या साहित्य सादरतेची उजळणी करा. तुमच्या मंडळीच्या साठ्यात असलेल्या दोन माहितीपत्रकांबद्दल सांगा. सेवेमध्ये त्यांना कसे सादर केले जाऊ शकते, त्यावर चांगली तयारी केलेली प्रात्यक्षिके दाखवा. सुचवलेल्या सादरतांकरता, आमची राज्य सेवा जुलै १९९८, पृष्ठ ८ पाहा. जादा सादरतांसाठी, टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी), यात “सादरता” आणि “प्रकाशनांची यादी” या मध्यभागी असलेल्या पोटमथळ्याखालील माहिती पाहा.
१५ मि: निरुत्साहावर काय उपाय आहे? टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, १९९९, पृष्ठे २८-९ वरील, लेखाच्या सुरवातीपासून “चांगली मनोवृत्ती बाळगणे” या पोटमथळ्याखालील माहितीपर्यंतच्या साहित्यावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. व्यावहारिक सूचना तसेच शास्त्रवचनांतील सल्ला यांची उजळणी करा. कोणती गोष्ट सेवेमध्ये आपला आनंद टिकवून ठेवण्यास मदत करते हे सांगण्यास आधीच, एक किंवा दोन प्रभावी प्रचारकांना सांगा.
२० मि: राज्याचा प्रचार करण्याकरता देवाच्या वचनाचा प्रभावीपणे उपयोग करा. श्रोत्यांबरोबर चर्चा करून सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. सेवेमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राज्याविषयी असलेला उभारणीकारक विचार सांगण्यासाठी आपण झटतो. परंतु, आपण केवळ बायबल वचने वाचून दाखवणे पुरेसे नाही. आपण ती समजावून सांगण्याची, उदाहरणे देण्याची व त्यांना लागू करण्याची गरज आहे. हे कसे केले जाऊ शकते त्याचे उदाहरण म्हणून, युक्तीवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे १५४-५ वरील, “मानवजातीला तातडीने ज्याची गरज आहे ते मानवी शासने पुरवत नाहीत,” या तिरप्या वळणातील पोटमथळ्याखालील माहितीचा उपयोग करा. चर्चेनंतर, चांगली तयारी केलेला एक प्रचारक, पुनर्भेट द्यायला गेल्यावर एका शास्त्रवचनाचा प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल, त्या वचनाचे संक्षिप्त विवरण कसे देता येईल, एखादे साधेसे उदाहरण कसे देता येईल आणि राज्य शासनाचा व्यक्तिगतरीत्या घरमालकाला कसा लाभ होऊ शकतो, हे त्याला कसे सांगतो, ते दाखवतो. प्रात्यक्षिकाची सुरवात, प्रचारक वचन वाचून करतो. प्रात्यक्षिकानंतर, ते वचन कशाप्रकारे समजावण्यात आले, त्यावर कसे उदाहरण देण्यात आले आणि ते कसे लागू करण्यात आले त्याची उजळणी करा. सर्वांना, देवाच्या वचनाचा प्रभावीपणे उपयोग करण्याची क्षमता विकसित करण्याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
५ मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: स्थानीय अनुभव. स्थानीय प्रचारकांना, (१) इतर भाषेच्या लोकांना साक्ष देताना किंवा (२) घरोघरचे व रस्त्यावरील साक्षकार्य यांव्यतिरिक्त इतर परिस्थितीत साक्ष देताना आलेले अनुभव सांगण्यास किंवा त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगा. सर्व राष्ट्रांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्याचे आणि इतर भाषा बोलणारी व्यक्ती भेटते तेव्हा कृपया पुनर्भेट द्या, (S-43) हा फॉर्म भरण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.—आमची राज्य सेवा, जुलै २००२, पृष्ठ १ पाहा.
२५ मि: “देवाचे नाव प्रकट करणे.”e दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. चवथ्या परिच्छेदावर चर्चा करताना, उद्घोषक (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १२४ वरील “देवाचे नाव प्रकट करणे” या पेटीमधील माहितीचा समावेश करा. एका अनुभवी प्रचारकाला पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगा. युक्तीवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे १९६-७ वरील दोन किंवा तीन शास्त्रवचनांचा उपयोग करून, देवाचे व्यक्तिगत नाव माहीत असणे व त्याचा उपयोग करणे महत्त्वाचे का आहे हे दाखवा.
गीत क्र. ६ (४५) व समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.