वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०३ पृ. ७
  • स्मारक विधीकरता सूचना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मारक विधीकरता सूचना
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारक विधीकरता सूचना
    आमची राज्य सेवा—२००२
  • स्मारकविधीकरता सूचना
    आमची राज्य सेवा—२००६
  • स्मारक विधीकरता सूचना
    आमची राज्य सेवा—२००१
  • स्मारकविधीच्या स्मरणिका
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ३/०३ पृ. ७

स्मारक विधीकरता सूचना

या वर्षी स्मारक विधीची तारीख बुधवार, एप्रिल १६ ही आहे. त्या अनुषंगाने वडिलांनी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे:

▪ सभेची वेळ ठरवताना सूर्यास्त होण्यापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करावी.

▪ वक्‍त्‌यासहित सर्वांनाच समारंभाच्या निश्‍चित वेळेची व ठिकाणाची आगाऊ माहिती दिली जावी.

▪ उचित प्रकारची भाकरी आणि द्राक्षारस तयार ठेवला जावा.—टेहळणी बुरूज (इंग्रजी), फेब्रुवारी १५, १९८५, पृष्ठ १९ पाहा.

▪ प्लेट्‌स, ग्लासेस, टेबल आणि टेबल क्लॉथ या सर्व वस्तू आधीच सभागृहात आणून योग्य ठिकाणी ठेवल्या जाव्यात.

▪ राज्य सभागृहाची किंवा ज्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे त्या ठिकाणाची नीट साफसफाई आधीच करण्यात यावी.

▪ सेवक तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्‍या बांधवांची आधीच निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्‍यांबद्दल, योग्य पद्धतीबद्दल तसेच उचित वेशभूषा व केशभूषा यांविषयी सूचना देण्यात याव्यात.

▪ आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे कोणी अभिषिक्‍त जन समारंभाला हजर राहू शकत नसल्यास, त्यांना बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.

▪ एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरणार असल्यास प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग आणि वाहन तळे यांठिकाणी अनावश्‍यक गर्दी होऊ नये म्हणून सर्व मंडळ्यांनी एकमेकांना सहयोग द्यावा. शक्य तेथे, प्रत्येक सभेनंतर ४५ मिनिटांचे मध्यंतर ठेवावे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा