स्मारक विधीकरता सूचना
या वर्षी स्मारकविधीची तारीख रविवार, एप्रिल ८ रोजी आहे. त्या अनुषंगाने वडिलांनी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे:
◼ सभेची वेळ ठरवताना सूर्यास्त होण्यापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करा.
◼ वक्त्यासहित सर्वांनाच समारंभाच्या निश्चित वेळेची व स्थानाची आगाऊ माहिती दिली जावी.
◼ उचित प्रकारची भाकरी आणि द्राक्षारस तयार ठेवला जावा.—फेब्रुवारी १५, १९८५ चे टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठ १९ पाहा.
◼ प्लेट्स, ग्लासेस, टेबल आणि टेबल क्लॉथ या सर्व वस्तू आधीच सभागृहात आणून योग्य ठिकाणी ठेवल्या जाव्यात.
◼ राज्य सभागृहाची किंवा ज्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे त्या ठिकाणाची नीट साफसफाई आधीच करण्यात यावी.
◼ अटेन्डंट तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्या बांधवांची आधीच निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल तसेच योग्य कार्यपद्धतीबद्दल सूचना देण्यात याव्यात.
◼ आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे कोणी अभिषिक्त जन समारंभाला हजर राहू शकत नसल्यास, त्यांना बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.
◼ एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरणार असल्यास प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग आणि वाहनतळे यांठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून सर्व मंडळ्यांनी मिळून आवश्यक ती व्यवस्था करावी.