अचूक अहवाल देण्यात तुम्ही तुमचा भाग पूर्ण करता का?
१ पुष्कळ बायबल अहवालांमध्ये, ठराविक संख्येचा अहवाल देण्यात आला आहे; ज्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर, वास्तवात जे घडले होते त्याचे स्पष्ट चित्र उभे राहते. उदाहरणार्थ, गिदोनाने केवळ ३०० पुरुषांना सोबत घेऊन मिद्यानी लोकांच्या छावणीवर पराजय मिळवला. (शास्ते ७:७) यहोवाच्या देवदूताने १,८५,००० अश्शूरी सैनिकांची कत्तल केली. (२ राजे १९:३५) सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुमारे ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर लगेच विश्वास करणाऱ्यांची संख्या सुमारे ५,००० इतकी वाढली. (प्रे. कृत्ये २:४१; ४:४) या अहवालांवरून स्पष्ट होते, की देवाच्या प्राचीन सेवकांनी पूर्ण व अचूक अहवाल देण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला.
२ यहोवाची संघटना आजही आपल्याला दर महिन्याला आपला क्षेत्र सेवेचा अहवाल देण्यास सांगते. या व्यवस्थेला विश्वासूपणे सहकार्य दिल्याने प्रचार कार्यावर प्रभावीपणे देखरेख करणे शक्य होते. सेवेच्या कोणत्या पैलूवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे किंवा क्षेत्रातील कोणत्या विशिष्ट भागात अधिक कामकऱ्यांची आवश्यकता आहे हे या अहवालांवरून स्पष्ट होऊ शकते. मंडळीत, क्षेत्र सेवेच्या अहवालांवरून वडिलांना, अधिक सेवा करण्याची क्षमता असलेल्या किंवा साहाय्याची आवश्यकता असलेल्या प्रचारकांना ओळखता येते. राज्य प्रचार कार्यातील प्रगतीचे कोणतेही अहवाल संपूर्ण ख्रिस्ती बंधूवर्गाला प्रोत्साहनदायक ठरू शकतात. तेव्हा, अचूक अहवाल देण्यात तुम्ही तुमचा भाग पूर्ण करता का?
३ तुमची व्यक्तिगत जबाबदारी: महिन्याच्या अखेरीस तुम्हाला, सेवेमध्ये तुम्ही किती तास खर्च केलेत हे आठवण्यास कठीण जाते का? असल्यास, क्षेत्र सेवेला जाऊन आल्याबरोबर तुम्ही तुमचे तास लिहून ठेवू शकता का? काही जण कॅलेंडरवर लिहून ठेवतात किंवा काही जण लहानशा डायरीत लिहून ठेवतात. इतर काही, क्षेत्र सेवेचा कोरा अहवाल आपल्यासोबत ठेवतात. महिन्याच्या अखेरीस न विसरता तुम्ही तुमचा अहवाल तुमच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना देऊ शकता. किंवा, राज्य सभागृहातील अहवाल टाकण्याच्या पेटीत तुम्ही आपला अहवाल टाकू शकता. तुम्ही तुमचा अहवाल द्यायला विसरला असाल तर, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी तुमच्याकडे येऊन तुमचा अहवाल मागण्याआधीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. सेवेचा अहवाल देण्याचा तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास तुम्हाला, यहोवाने केलेल्या व्यवस्थेबद्दल आदर आहे आणि अहवाल गोळा करून एकूण बेरीज करण्याचे काम नेमलेल्या बांधवांबद्दल प्रेम आहे हे दिसून येईल.—लूक १६:१०.
४ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांची भूमिका: सावध व काळजीवाहू मेंढपाळ या नात्याने पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक संपूर्ण महिन्यादरम्यानच्या आपल्या गटाच्या कार्यात रस घेतात. (नीति. २७:२३) प्रत्येक प्रचारक नियमित, अर्थपूर्ण व आनंदाने क्षेत्र सेवेत भाग घेत आहे की नाही हे त्यांना माहीत असते आणि एका संपूर्ण महिन्यात एखाद्याने क्षेत्र सेवेत भाग घेतला नसेल तर अशा प्रचारकाला मदत करण्यास ते तत्पर असतात. अशा प्रचारकांना सहसा, उत्तेजनाची, व्यावहारिक सूचनेची किंवा कोणीतरी त्यांच्याबरोबर क्षेत्र सेवेत काम करण्याची आवश्यकता असते.
५ महिन्याच्या अखेरीस पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक आपल्या गटातील सर्वांनी, आपापला क्षेत्र सेवेचा अहवाल लिहून दिला आहे की नाही याची खात्री करतील जेणेकरून मंडळीच्या सचिवांना मंडळीचा अहवाल पुढील महिन्याच्या सहा तारखेपर्यंत शाखा दफ्तराला पाठवता येऊ शकतो. महिना जसजसा संपत येतो तसतसे मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक आपल्या गटातील सर्वांना आपला क्षेत्र सेवेचा अहवाल लिहून देण्याची आठवण करून देऊ शकतात आणि पुस्तक अभ्यास होणाऱ्या ठिकाणी अहवालाच्या स्लीप सर्वांच्या हातात देऊ शकतात. गटातील कोणी विसराळू असेल तर अशांना ते उचितरीत्या आठवण देऊन उत्तेजन देऊ शकतात.
६ आपला क्षेत्र सेवेचा अहवाल तत्परतेने दिल्याने, क्षेत्र सेवेत काय साध्य करण्यात आले हे दर्शवणारा एक अचूक अहवाल तयार करण्यास मदत मिळते. तेव्हा, दर महिन्याला आपल्या सेवेचा अहवाल तत्परतेने देण्यात तुम्ही तुमचा भाग पूर्ण कराल का?