वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. ८
  • “निरर्थक गोष्टींमागे” लागू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “निरर्थक गोष्टींमागे” लागू नका
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!
    आमची राज्य सेवा—१९९९
  • इंटरनेटवर सुवार्ता
    आमची राज्य सेवा—१९९७
  • इंटरनेटचे विनियोग आणि साधने
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. ८

“निरर्थक गोष्टींमागे” लागू नका

१ आज ई-मेल दळणवळणाचा लोकप्रिय मार्ग आहे. ई-मेलद्वारे व्यक्‍तिगत अनुभवांची व विचारांची देवाणघेवाण उचित असली तरी, तिच्या बेलगाम उपयोगाचा कोणत्या ‘निरर्थक गोष्टींशी’ संबंध असू शकतो?—नीति. १२:११.

२ ई-मेलविषयी सावधान: काहींना असे वाटते, की ई-मेलद्वारे त्यांना यहोवाच्या संघटनेबाबतची ताजी बातमी मिळाल्यावर ते यहोवाच्या संघटनेशी चांगल्याप्रकारे दळणवळण करू शकतात. यात, अनुभव, बेथेलमध्ये होणाऱ्‍या घटनांबद्दलची माहिती, संकटे किंवा छळाबद्दलच्या बातम्या, इतकेच नव्हे तर राज्य सेवा प्रशालेतील अगदी गोपनीय माहिती देखील सांगितली जाते. असे दिसते की काही जण तर अशाप्रकारचे संदेश पाठवण्यास इतके उतावीळ होतात, की ही बातमी आधी आपणच आपल्या मित्रांना दिली पाहिजे, असे त्यांना वाटते.

३ कधीकधी, पाठवण्यात आलेली काही माहिती व अनुभव चुकीचे असतात किंवा मसाला लावून सांगितलेले असतात. किंवा कदाचित, सनसनाटी बातमी द्यायची असते म्हणून, काही जण चुकीची बातमी देखील देतात. कोणत्याही गोष्टी पोटात ठेवू न शकणाऱ्‍या लोकांना सहसा सर्व वस्तुस्थितींची माहिती नसते. (नीति. २९:२०) काही बाबतीत तर एखादी बातमी विश्‍वास ठेवण्यालायक नसताना देखील ती मजेशीर म्हणून पसरवली जाते. अशा प्रकारच्या खोट्या व फसव्या बातम्या, या ‘[खोट्या] कहाण्या’ आहेत ज्या खऱ्‍या ईश्‍वरी भक्‍तीला बढावा देत नाहीत.—१ तीम. ४:६, ७.

४ तुम्ही पाठवलेली एखादी बातमी जर चुकीची ठरते तर या पसरलेल्या बातमीमुळे होणाऱ्‍या दुःखास किंवा गोंधळास तुम्ही काही प्रमाणात कारणीभूत आहात. दाविदाला एक अशीच चुकीची बातमी मिळाली की त्याचे सर्व पुत्र ठार मारले गेले तेव्हा त्याने दुःखावेगात “आपली वस्त्रे फाडिली.” परंतु वास्तविकतेत, त्याचा फक्‍त एक पुत्र मारला गेला होता. अर्थात ही देखील दुःखाचीच बातमी होती परंतु वाढवून-चढवून सांगितलेल्या या बातमीने दाविदाला आणखी दुःख झाले. (२ शमु. १३:३०-३३) तेव्हा, आपल्या बंधूभगिनींची फसवणूक होईल किंवा ते निरुत्साहित होतील असे काहीही आपण करू इच्छिणार नाही.

५ देवाने ठरवलेले माध्यम: आपल्या स्वर्गीय पित्याने दळणवळणाचा एक मार्ग ठरवला आहे; ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग.’ विश्‍वासाच्या घराण्याला कोणती माहिती दिली पाहिजे आणि ती “यथाकाळी” केव्हा दिली पाहिजे, ही जबाबदारी या दासवर्गाची आहे. हे आध्यात्मिक अन्‍न केवळ ईश्‍वरशासित संघटनेद्वारेच उपलब्ध आहे. तेव्हा, आपण विश्‍वास ठेवण्यालायक माहितीसाठी, इंटरनेट नेटवर्कचा उपयोग करणाऱ्‍यांकडे नव्हे तर देवाने ठरवलेल्या माध्यमाकडे पाहिले पाहिजे.—मत्त. २४:४५.

६ इंटरनेट वेब साईटस्‌: आपल्या संस्थेचे अधिकृत इंटरनेट वेब साईट: www.watchtower.org. आहे. या साईटवर जनतेसाठी सर्व आवश्‍यक माहिती उपलब्ध आहे. व्यक्‍तिगतरीत्या कोणालाही, समितीला किंवा मंडळीला यहोवाच्या साक्षीदारांविषयी वेब-पेज बनवण्याची गरज नाही. काहींनी, आपल्या प्रकाशनांतील सर्व शास्त्रवचनांसह पूर्ण मजकूर इंटरनेटवर पोस्ट केला आहे; इतकेच नव्हे तर दान गोळा करून अधिवेशन साहित्याच्या माहितीच्या अनेक कॉपी करून दिल्या आहेत. यात नफा आहे की नाही ही गोष्ट वेगळी पण यहोवाचे साक्षीदार प्रकाशित करत असलेल्या प्रकाशनांची इलेक्ट्रॉनिक डॉक्यूमेंटवर पुनःनिर्मिती करून तिचे वाटप करणे हा ग्रंथावरील मालकी हक्कांविरुद्धचा गुन्हा आहे. काहींना असे करणे निव्वळ आपल्या बंधूभगिनींची सेवा करतोय असे वाटेल परंतु हे योग्य नाही व ते थांबवलेच पाहिजे.

७ इलेक्ट्रॉनिक दळणवळणाचा उपयोग करताना समंजसपणा आणि संयम बाळगल्यास, आपले मन आपण “मनोरम वस्तूंनी” भरत आहोत याची आपण खात्री करू शकतो.—नीति. २४:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा