साक्षीदार नसलेल्या वैवाहिक सोबत्यांना आपण मदत कशी करू शकतो?
१ यहोवाच्या अनेक सेवकांचा विवाह अशा व्यक्तींबरोबर झालेला असतो ज्यांचे बांधवांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असतात आणि मंडळीच्या बाबतीतही त्यांची मनोवृती सकारात्मक असते परंतु ते स्वतः देवाचे सेवक होण्यासाठी काही पाऊल उचलत नाहीत. आपल्या एका भगिनीच्या साक्षीदार नसलेल्या पतीने कबूल केले: “घरोघरी जाण्याची कल्पनाच खरं तर माझ्यासाठी एक अडखळण होती.” इतरांना शास्त्रवचनाच्या विरोधात असलेल्या काही सवयी असतील ज्या त्यांना सोडाव्या लागतील किंवा कदाचित त्यांना असे वाटत असेल, की आपल्या वैवाहिक सोबत्याप्रमाणे आपल्याला ईश्वरशासित कार्यांत व्यस्त राहायला जमणार नाही. अशांना आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?
२ व्यक्तिगत आस्था दाखवा: लोकांमध्ये, त्यांना ज्या गोष्टींबद्दल चिंता वाटते त्याबद्दल व्यक्तिगत आस्था दाखवल्याने, बायबलमधील सत्याकडे ते कदाचित वळू शकतील. (फिलिप्पै. २:४) पूर्वी सत्यात नसलेले, सत्यात आल्यावर बहुतेकदा इतर साक्षीदारांनी त्यांच्यामध्ये घेतलेल्या व्यक्तिगत प्रेमळ आस्थेचा उल्लेख करतात. आधी ज्या पतीचा उल्लेख करण्यात आला होता त्यांनी असे म्हटले: “मंडळीत वडील असलेले होसे यांनी माझ्यात खास आवड घेतली. मला वाटतं, त्यांच्याच उत्तेजनामुळे मी गंभीरपणे अभ्यास करायला लागलो.” आणखी एका भगिनीचे पती आठवून सांगतात, की मला भेट द्यायला येणाऱ्या बांधवांनी, माझ्या आवडीच्या गोष्टींविषयी बोलायचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले: “[माझ्या पत्नीच्या] धर्माबद्दल माझा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. तिचे स्नेही हुशार लोक होते आणि ते विविध विषयांवर बोलायचे.”—१ करिंथ. ९:२०-२३.
३ व्यावहारिक मदत द्या: साक्षीदार नसलेल्या वैवाहिक सोबत्यांवर, त्यांना दाखवण्यात आलेल्या दयेची देखील छाप पडली असावी. (नीति. ३:२७; गलती. ६:१०) साक्षीदार नसलेल्या एका भगिनीच्या पतीची एकदा कार बिघडली तेव्हा, एका तरुण साक्षीदाराने त्याला मदत केली. तो आठवून सांगतो: “याचा माझ्या मनावर खूप प्रभाव पडला.” आणखी एका बांधवाने, एका भगिनीच्या सत्यात नसलेल्या पतीला, कुंपण घालायला एक संपूर्ण दिवस मदत केली. एकत्र काम करत बोलत असताना त्या दोघांची मैत्री झाली. दोन आठवड्यांनंतर तो पती बांधवाकडे येऊन म्हणाला: “मी जीवनात बदल करण्याची वेळ आली आहे. तुम्ही माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास कराल का?” त्याने जलद प्रगती केली आणि आता तो बाप्तिस्मा घेतलेला साक्षीदार आहे.
४ आपल्या क्षेत्रातील योग्यता प्राप्त लोकांचा आपण शोध घेत असताना आपण, सहउपासकांच्या वैवाहिक सोबत्यांना देखील मदत करायचा प्रयत्न करू या.—१ तीम. २:१-४.