घोषणा
◼ साहित्य सादरता एप्रिल व मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांची एकेक प्रत सादर करा. आस्थेवाईक लोकांना म्हणजे, संघटनेसोबत सक्रिय सहवास न ठेवणाऱ्या परंतु स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या लोकांनाही पुनःभेट देताना देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक सादर करण्याचा जास्त प्रयत्न करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे; खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तकातून व अपेक्षा माहितीपत्रकातून आधी अभ्यास केलेला असेल त्यांच्यासोबत. जून: थोर शिक्षकापासून शिका. (इंग्रजी) आपल्याला मुले नाहीत असे घरमालक म्हणतात तेव्हा त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. माहितीपत्रकाचा उपयोग करताना, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करा. जुलै व ऑगस्ट: आमची राज्य सेवा यांतील यादीतील उपलब्ध असलेली माहितीपत्रके.
◼ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराकडे असणे आवश्यक आहे. तेव्हा, यात केव्हाही काही बदल असतील तर मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून व सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्यक आहे.
◼ मंडळीच्या सचिवांनी ॲप्लीकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस (S-205) आणि ॲप्लीकेशन फॉर ऑक्झीलरी पायनियर सर्व्हिस (S-205b) फॉर्म्सचा पुरेसा साठा बाळगावा. हे फॉर्म्स लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) मागवता येतात. एक वर्षभर पुरतील इतक्या फॉर्म्सचा साठा ठेवा. सर्व रेग्युलर पायनियर फॉर्म्स पडताळून ते पूर्णपणे भरलेले आहेत की नाहीत हे पाहा. फॉर्म भरणाऱ्यांनी त्यांच्या बाप्तिस्म्याची तारीख लिहिली आहे की नाही हेही पाहा.
◼ लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्ममध्ये (S-14) दिलेल्या सर्व फॉर्म्सच्या वार्षिक अपेक्षेनुसार आपल्या मागण्या पाठवा. फॉर्म्स मागवण्यासाठी एक वेगळे पत्र किंवा एक वेगळा लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म पाठवू नका; तर तुमच्या एप्रिल महिन्याच्या लिटरेचर रिक्वेस्टच्या सोबतच ते मागवा. अधिक माहितीसाठी, वॉचटावर लिटरेचर रिक्वेस्ट गाईड, विभाग ४, पृष्ठ १ वरील “इयरली कॅलेंडर ऑफ लिटरेचर आयटम्स” पाहा.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
यहोवाची स्तुती गा (लहान गीतपुस्तक) —तमिळ
दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! —उर्दू
यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? त्यांचा काय विश्वास आहे? (माहितीपत्रक) —उर्दू
दुःखाचा कधी अंत होईल का? (पत्रिका क्र. ७५) —आसामी, कन्नड, तमिळ, तेलगू, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे —तमिळ