नव्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
१ प्रसार माध्यम आणि जगिक शिक्षक भौतिक संपत्ती मिळवण्याचे उत्तेजन देतात परंतु देवाचे वचन आपल्याला ‘सत्कर्मांविषयी धनवान असा’ हा आर्जव करते. (१ तीम. ६:१८) एप्रिल २००३ पासून सुरू होणाऱ्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचा हा विषय आहे. या संमेलनात आपल्याला कोणते उत्तेजन मिळणार आहे?
२ “देवाच्या नजरेत धनवान असा” याचा काय अर्थ होतो हे विभागीय पर्यवेक्षक समजावून सांगतील आणि आध्यात्मिक धन प्राप्त करण्यास झटणाऱ्या काहींची ते मुलाखत घेतील. आपल्या पहिल्या भाषणात, भेट देणारे वक्ता, देवाचे लोक “कापणीच्या या काळातील सत्कर्मे” कसे करत आहेत ते सांगतील. देवाने दिलेल्या व सध्या पूर्ण केल्या जात असलेल्या कापणीच्या कामात आपण अधिक सहभाग कसा घेऊ शकतो याचा विचार करण्यास आपल्यातील प्रत्येकाला उत्तेजन मिळेल.
३ आध्यात्मिक धनाचा पाठलाग करणाऱ्या ख्रिस्ती युवकांना पाहून आपल्याला किती अभिमान वाटतो! यामुळे यहोवाचे गौरव होते आणि युवकांना भवितव्यात मिळू शकणाऱ्या सेवेच्या विशेषाधिकारांसाठी एक पाया घालता येतो. “यहोवाच्या स्तुतीसाठी सत्कर्मे करणाऱ्या युवकांची प्रशंसा करणे” या भाषणात, स्थानीय ख्रिस्ती तरुण कोणकोणती सत्कर्मे करीत आहेत हे ठळकपणे सांगण्यात येईल.
४ सत्कर्मांचा पाठलाग केल्यामुळे काय प्रतिफळ मिळते? याची चर्चा, भेट देणारे वक्ता, “सत्कर्मे करत राहा आणि यहोवाचे आशीर्वाद मिळवा” या आपल्या शेवटल्या भाषणात करतील. आपण कोणकोणत्या चार क्षेत्रात समृद्ध आशीर्वादांची कापणी करू शकतो हे ते सांगतील: (१) व्यक्ती या नात्याने, (२) कुटुंब या नात्याने, (३) मंडळी या नात्याने व (४) जागतिक संघटना या नात्याने.
५ यहोवाला आपले जीवन समर्पित केलेल्यांना बाप्तिस्मा घेण्याची संधी मिळेल. हे पाऊल उचलण्यास तुम्ही तयार असाल तर त्वरेने अध्यक्षीय पर्यवेक्षकांना ते सांगा.
६ तुमच्या क्षेत्रात संमेलन केव्हा होणार आहे त्याची तारीख सांगितल्यावर उपस्थित राहण्यासाठी लगेच निश्चित योजना बनवा. लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सुरवातीच्या गीत व प्रार्थनेला उपस्थित राहता येईल. खास संमेलन दिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून लक्षपूर्वक ऐकल्याने आपल्याला, आपला देव यहोवा याच्या नजरेत खरोखर धनवान करणाऱ्या मार्गांचा पाठलाग करण्याची शक्ती मिळेल.