वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०३ पृ. ५
  • उचित समयी मदत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उचित समयी मदत
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • अक्रियाशील झालेल्यांना विसरू नका
    आमची राज्य सेवा—२००७
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०००
  • “माझ्याकडे परत या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km २/०३ पृ. ५

उचित समयी मदत

१ आपल्या सहविश्‍वासूंना मजबूतीची गरज आहे हे प्रेषित पेत्राने पाहिल्यावर त्याला त्यांच्याबद्दल काळजी वाटली आणि त्याने त्यांना प्रेमळपणे काही गोष्टींची आठवण करून दिली व त्यांना उत्तेजन दिले. (२ पेत्र १:१२, १३; ३:१) “विश्‍वास मिळालेल्या लोकांना,” त्याने त्यांचे आध्यात्मिक गुण वाढवत राहण्याचे उत्तेजन दिले जेणेकरून ते ‘आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या ओळखीविषयी निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाहीत.’ (२ पेत्र १:१, ५-८) यहोवाच्या “दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून” त्याच्याकडून आलेल्या पाचारणाची व निवडीची खात्री करण्यास त्यांना मदत करण्याचा पेत्राचा उद्देश होता. (२ पेत्र १:१०, ११; ३:१४) पुष्कळ सहविश्‍वासूंना त्याचे प्रोत्साहन हे उचित समयी आलेल्या मदतीप्रमाणे होते.

२ आज ख्रिस्ती पर्यवेक्षकांनासुद्धा देवाच्या लोकांबद्दल अशीच काळजी वाटते. आजच्या या ‘कठीण दिवसांत’ यहोवाच्या पुष्कळ सेवकांना अडचणींचा सामना करावा लागतो. (२ तीम. ३:१) सततच्या आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यक्‍तिगत समस्यांमुळे काहींना दाविदाप्रमाणे असे वाटेल: “असंख्य अरिष्टांनी मला घेरिले आहे; माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडिले आहे म्हणून मला तोंड वर करता येत नाही; ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; माझ्यात त्राण उरले नाही.” (स्तो. ४०:१२) असे लोक अशा दबावांखाली इतके दबून जातात की मग ते महत्त्वपूर्ण आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतात आणि ख्रिस्ती सेवेत सक्रिय सहभाग घेण्याचे थांबवू शकतात. पण अशा अडचणींमध्ये ते यहोवाच्या ‘आज्ञा कधी विसरलेले’ नसतात. (स्तो. ११९:१७६) तेव्हा अशा लोकांना वडिलांनी मदत देण्याची हीच वेळ आहे.—यश. ३२:१, २.

३ यासाठी वडिलांना, प्रचार कार्यात सध्या जे भाग घेत नाहीत अशांना मदत करण्याकरता खास प्रयत्न करण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. हे साध्य करण्यासाठी एकजुटीने केले जाणारे प्रयत्न सध्या चालू आहेत व मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत चालू राहतील. पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना, निष्क्रिय लोकांना भेटून आध्यात्मिक साहाय्य देण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून असे लोक पुन्हा एकदा मंडळीबरोबर आपले कार्य सुरू करू शकतील. आवश्‍यकता असते तेथे व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाची व्यवस्था केली जाऊ शकते. इतरांना अशा लोकांना साहाय्य देण्यास सांगितले जाऊ शकते. तुम्हाला असे करण्यास सांगण्यात आले तर, तुमचे प्रयत्न अशा लोकांना फायदेकारक ठरतील; खासकरून तुम्ही त्यांना दयाळुपणाने व समजंसपणाने उत्तेजन दिले तर ते आणखी प्रभावी ठरेल.

४ मंडळीमध्ये कोणी आपले कार्य पुन्हा सुरू करतो तेव्हा सर्वांना आनंद होतो. (लूक १५:६) निष्क्रिय लोकांना प्रोत्साहन देण्याकरता आपण केलेले प्रयत्न कदाचित “समयोचित भाषण” ठरू शकतील.—नीति. २५:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा