वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०३ पृ. ६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००३
km २/०३ पृ. ६

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

फेब्रुवारी २४, २००३ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जानेवारी ६ ते फेब्रुवारी २४, २००३ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचा गुण

१. बरोबर किंवा चूक: अचूक वाचन करण्याचा अर्थ, जे वाचले जात आहे ते, जे लिहिले आहे त्यापासून थोडेसे वेगळे असले तरी, बरोबर आहे की नाही याची खात्री करणे, असा होतो. स्पष्टीकरण द्या. [be पृ. ८३]

२. रिकाम्या जागा भरा: अचूक वाचण्याकरता, ______________________ केला पाहिजे, _____________________  व _________________________  मोठ्याने वाचन केले पाहिजे. [be पृ. ८५]

३. स्पष्ट बोलणे महत्त्वाचे का आहे? (१ करिंथ. १४:८, ९) [be पृ. ८६]

४. कोणत्या काही कारणांमुळे आपले बोलणे अस्पष्ट होऊ शकते आणि ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? [be पृ. ८७-८]

५. गेल्या दोन महिन्यांत ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत कोणत्या शब्दांचा चुकीचा उच्चार करण्यात आला ज्याविषयी तुम्ही सुधारणा केली पाहिजे असे तुम्हाला वाटते? [be पृ. ९२]

नेमणूक क्र. १

६. बरोबर किंवा चूक: आपले डोळे आपल्याला ऐकण्यास मदत करू शकतात. स्पष्टीकरण द्या. [be पृ. १४]

७. रिकाम्या जागा भरा: _________________________ , _________________________  आणि _________________________  हे सर्व, देवाने पुरवलेले कालदर्शक आहेत. [si पृ. २७९ परि. ७]

८. रिकाम्या जागा भरा: बायबलमध्ये, “दिवस” हा शब्द, संदर्भानुसार ___________________________  तास, ___________________  तास, _______________________  वर्षे किंवा _________________________  यांना सूचित होऊ शकतो. [si पृ. २७९ परि. ८]

९. हन्‍ना, मार्क आणि एलीया यांची उदाहरणे आपल्याला निराशेवर यशस्वीरीत्या मात करण्यास मदत कशी करू शकतात? या उदाहरणांचा उपयोग करून आपण इतरांना मदत कशी करू शकतो? [w-MR०१ २/१ पृ. २०-३]

१०. प्राचीन खेळांविषयीची माहिती आपल्याला बायबलमधील विशिष्ट वचने समजण्यास कशी मदत करू शकते? या माहितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला पाहिजे? [w-MR०१ १/१ पृ. २८-३१]

साप्ताहिक बायबल वाचन

११. बरोबर किंवा चूक: देवाचे राज्य १९१४ मध्ये स्वर्गात स्थापन झाले असल्यामुळे “तुझे राज्य येवो,” अशी प्रार्थना करण्याची आता गरज नाही. (मत्त. ६:१०) स्पष्टीकरण द्या. [be पृ. २७९; w-MR९६ ६/१ पृ. ३१]

१२. बरोबर किंवा चूक: मत्तय ११:२४ मधील येशूच्या शब्दांचा असा अर्थ होतो, की सदोम व गमोरातील अग्नीने नाश केलेल्या लोकांचे यहोवा पुनरुत्थान करील. स्पष्टीकरण द्या.

१३. उचित वाक्यांश निवडा: मत्तय २४:४५-४७ मध्ये येशूने उल्लेखलेला विश्‍वासू व बुद्धिमान दास हा (अ) यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ आहे; (ब) कोणत्याही समयी पृथ्वीवर असलेला सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा गट आहे; (क) स्वतः येशू ख्रिस्त आहे. हा दास (अ) वैयक्‍तिक अभिषिक्‍त जनांना; (ब) दुसऱ्‍या मेंढरांना; (क) ख्रिस्ती प्रकाशने वाचणाऱ्‍या सर्व लोकांना चित्रित करणाऱ्‍या “परिवाराला” यथाकाळी खावयास आध्यात्मिक अन्‍न देतो. धन्याने या दासाला (अ) १९१४; (ब) सा.यु. ३३; (क) १९१९ या वर्षी आपल्या सर्वस्वावर नेमले.

१४. उचित वाक्यांश निवडा: मत्तय १३:४७-५० मधील येशूच्या दृष्टान्तातील जाळे यांत, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी आणि (अ) देवाचे मशीही राज्य; (ब) त्यांचे सोबती अर्थात दुसरी मेंढरे; (क) ख्रिस्ती धर्मजगत या दोघांचा समावेश होतो.

१५. मत्तय ५:२४ मधील येशूच्या शब्दांनुसार, तुम्ही एखाद्या सहउपासकाचे मन दुखावले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास काय केले पाहिजे? [g९६ २/८ पृ. २६-७]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा