वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०२ पृ. ४
  • आहे त्यात तृप्त राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आहे त्यात तृप्त राहा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही धनवान होऊ शकता!
    आमची राज्य सेवा—२००८
  • भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्यासाठी झटा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्ही पैशांबद्दल संतुलित दृष्टिकोन कसा राखू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ‘पहिल्याने त्याचे राज्य मिळवण्यास झटा’
    उपासनेतील ऐक्य
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ६/०२ पृ. ४

आहे त्यात तृप्त राहा

१ शास्त्रवचने आपल्याला, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवण्याचा सल्ला देतात खरे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याला आपल्या जीवनातले प्रमुख ध्येय बनवले पाहिजे. आपण आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिले पाहिजे. (मत्त. ६:३३; १ तीम. ५:८) ‘कठीण दिवसात’ उचित संतुलन बाळगणे खरोखरच आव्हानात्मक आहे. (२ तीम. ३:१) परंतु कशामुळे आपल्याला मदत मिळू शकते?

२ बायबलचा दृष्टिकोन आत्मसात करा: धनसंपत्तीच्या मागे धावल्यामुळे आध्यात्मिकरीत्या आपला नाश होऊ शकतो, असा इशारा देवाचे वचन देते. (उप. ५:१०; मत्त. १३:२२; १ तीम. ६:९, १०) आजच्या महत्त्वपूर्ण काळात आपण नोकरीत किंवा आर्थिक चिंतांमध्ये इतके बुडून जाऊ, की सभा, अभ्यास आणि क्षेत्र सेवा यांसारख्या आध्यात्मिक कार्यांना आपण दुय्यम स्थानी ढकलू; असे करणे खरोखरच आपल्यातील कोणासाठीही घातक ठरू शकते. (लूक २१:३४-३६) परंतु बायबल सल्ला देते: “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीम. ६:७, ८.

३ याचा अर्थ असा होत नाही की ख्रिश्‍चनांनी गरिबीत दिवस काढावेत. परंतु, बायबलचा हा सल्ला आपल्याला, आपल्या भौतिक गरजा काय आहेत म्हणजे आपण जेथे राहतो तेथील परिस्थितींनुसार आपल्याला पुरेशा प्रमाणात अन्‍न, वस्र आणि निवारा उपलब्ध आहे का हे पाहायला मदत करतो. आपल्याजवळ या जीवनाश्‍यक गोष्टी असल्यास आपण आणखी जास्त व उत्तम गोष्टी मिळवण्याचा निरर्थक प्रयत्न करू नये. एखादी वस्तू खरेदी करताना किंवा ज्यादा काम करण्याचा विचार करताना आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘मला याची खरोखरच गरज आहे का?’ असे केल्यास आपल्याला, “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे,” या ईश्‍वरप्रेरित सल्ल्याचे पालन करणे सोपे जाईल.—इब्री १३:५.

४ आपण यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला मदत करील. (नीति. ३:५, ६) दररोजच्या जीवनावश्‍यक गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काबाडकष्ट करावे लागत असले तरी, त्यांनाच आपण अधिक महत्त्व देत नाही. आपल्याकडे थोडे असले तरी आपण यहोवावर भरवसा ठेवतो की तो आपल्या गरजा पूर्ण करील. (फिलिप्पै. ४:११-१३) यामुळे आपल्याला देवाकडून समाधान आणि इतर अनेक आशीर्वादही मिळतात.

५ इतरांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा: सत्याच्या मार्गात आपल्या मुलीचे संगोपन करणाऱ्‍या एका एकट्या मातेने आपले राहणीमान अतिशय साधे ठेवायला सुरवात केली. ती आपल्या आलिशान घरात आरामात राहत होती पण तिने ते सोडले आणि एका लहान घरात गेली आणि नंतर एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेली. यामुळे मोठ्या घराची आवराआवर करण्यात तिचा जितका वेळ जात होता तोच वेळ आता तिला क्षेत्र सेवेत खर्च करता येऊ लागला. तिची मुलगी मोठी होऊन तिचे लग्न झाल्यावर आईने स्वच्छेने सेवानिवृत्ती घेतली; यामुळे तिला कमी पैसा मिळू लागला. आपल्या या भगिनीचे हे सामान्य पायनियरींगचे सातवे वर्ष आहे आणि आपल्या जीवनात देवाच्या राज्याला प्रथम स्थान देण्याकरता तिने केलेल्या भौतिक त्यागांबद्दल तिला तीळमात्र पस्तावा होत नाही.

६ एक वडील आणि त्यांची पत्नी आपल्या तीन मुलांचे संगोपन करण्यासोबतच अनेक वर्षांपासून पायनियरींग करीत होते. कुटुंब या नात्याने त्यांनी, आपल्या इच्छा नव्हे तर आपल्या आवश्‍यकता पूर्ण करण्यात समाधान मानले. ते बांधव म्हणतात: “आम्हाला आमचं राहणीमान साधं ठेवावं लागलं. आमच्यावर तशी कठीण परिस्थिती आली होती पण यहोवानं नेहमी आम्हाला लागणाऱ्‍या गोष्टी पुरवल्या आहेत. . . . माझ्या कुटुंबानं आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिल्याचं पाहून मला खूप बरं वाटतं, समाधान वाटतं.” या बांधवाची पत्नी म्हणते: “[माझ्या पतीला] आध्यात्मिक गोष्टींत व्यस्त पाहून मलाही अगदी मनापासून एक प्रकारची संतुष्टी मिळते.” आपल्या पालकांनी यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुलांनाही आनंद वाटतो.

७ भौतिक गोष्टींच्या मागे धावण्याऐवजी, ईश्‍वरी भक्‍तीच्या मार्गावर चालण्याची निवड केलेल्यांना बायबल आताच्या जीवनासाठी आणि येणाऱ्‍या जीवनासाठी भरघोस आशीर्वादांचे वचन देते.—१ तीम. ४:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा