आपला विश्वव्यापी बंधूसमाज आपल्याला का प्रिय आहे?
आजच्या प्रेमहीन जगात आपण आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींबद्दलचे प्रेम जिवंत कसे ठेवू शकतो? (१ पेत्र २:१७) आपला बंधूसमाज वास्तविक व जगव्याप्त आहे हे आपण इतरांना कसे दाखवू शकतो? (मत्त. २३:८) हे आपण आपला विश्वव्यापी बंधूसमाज (इंग्रजी) या व्हिडिओद्वारे दाखवू शकतो. आपण एकमेकांवर प्रेम का करतो त्याची कारणे या व्हिडिओत सांगितली आहेत. या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे देता येतात का ते पाहा:
(१) कोणती तीन कार्ये आहेत जी आपल्या विश्वव्यापी बंधूसमाजाबरोबर आपणही करत आहोत? (२) आपल्या बांधवांनी (अ) अलास्काच्या ओसाड प्रदेशात, (ब) युरोपच्या प्रचंड बंदरांवर (क) पेरूच्या दाट जंगलांत प्रचार करण्याचा ठाम निश्चय केला आहे हे ते कसे दाखवत आहेत? (३) कोणते साधन विशेषकरून प्रभावकारी ठरले आहे? (४) प्रचार कार्य हे साधारण कार्य आहे असे आपण कधीच का समजू नये? (५) यहोवाच्या साक्षीदारांनी संकटाच्या वेळी—भूकंप, वादळे, मुलकी युद्धे यांवेळी एकमेकांना सांत्वन व आधार कसा दिला त्याची उदाहरणे सांगा. (सावध राहा! ऑगस्ट २२, १९९५, (इंग्रजी) पृष्ठ २३ वरील टाकाओ यांचे आणि सावध राहा! ऑक्टोबर २२, १९९६, (इंग्रजी) पृष्ठे २० वरील कोटोयो यांचे अनुभव वाचा) (६) आपण सर्व कोणत्या व्यावहारिक मार्गांद्वारे आपल्या ख्रिस्ती बंधूसमाजाचे सर्वात मोठे ओळख चिन्ह प्रदर्शित करू शकतो? (योहान १३:३५) (७) आपल्या मंडळीच्या सभांना आपण कितपत मोलाचे समजले पाहिजे? (८) एकत्र येण्यासाठी आधी ज्यांच्याकडे राज्य सभागृह नव्हते पण आता आहे, त्यांना याबद्दल कसे वाटते? (९) पूर्व युरोप आणि रशिया मधील आपले बंधूभगिनी बंदी असताना आध्यात्मिकरीत्या कसे टिकून राहिले? (१०) आताही, पुष्कळ साक्षीदारांना अधिवेशनांना उपस्थित राहण्याकरता कोणते उल्लेखनीय प्रयत्न करावे लागतात व का? याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडला? (११) ऐक्याने उपासना करण्याचा, गरजेच्या वेळी इतरांना मदत करण्याचा, जेव्हा कधी तुम्हाला जमते तेव्हा आणि कोणत्याही परिस्थितीत विश्वासूपणे प्रचार करण्याचा तुम्ही दृढनिश्चय का केला आहे? (१२) होता होईल तितक्या आस्थेवाईक लोकांना हा व्हिडिओ दाखवण्याचा काय फायदा होईल?