मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! एप्रि.-जून
“आपल्या मुलांना घडवण्यात प्रशिक्षित शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे या गोष्टीशी तुम्ही नक्कीच सहमत असाल. आपल्याकडील शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे असे तुम्हाला वाटते का? [नीतिसूत्रे २:१०, ११ वाचा.] सावध राहा! नियतकालिकात शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी आणि त्यांचे हे कठीण आव्हान पेलण्यास पालक कशाप्रकारे त्यांना हातभार लावू शकतात याविषयी सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज मे १५
“देवाला ओळखणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [घरमालकाचे मत ऐका.] ज्याच्याविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे कठीण असते, या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल. पण बायबल आपल्याला देवाला शोधण्याचे उत्तेजन देते. [प्रेषितांची कृत्ये १७:२७ वाचा.] आपण देवाला चांगल्याप्रकारे कसे ओळखू शकतो हे या लेखांमध्ये सांगितले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“कधीकधी दोषीपणाच्या भावनेमुळे एखादी व्यक्ती, आपली परिस्थिती आशाहीन आहे असा विचार करू शकते. दोषीपणाच्या भावनेचा आपल्याला काही फायदा होऊ शकतो का? [उत्तर ऐकल्यावर, स्तोत्र ३२:३, ५ वाचा.] या भावनांमुळे आपण सकारात्मक कार्य करण्यास कशाप्रकारे प्रवृत्त होऊ शकतो, हे सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज जून १
“अलीकडे घडलेल्या घटनांमुळे पुष्कळ लोक विचार करू लागले आहेत, की निष्पाप लोकांना अकाली मरण का येते. लोक का मरतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [घरमालकाचे उत्तर ऐकल्यावर, पृष्ठ ७ वरील तक्ता पाहा.] यांतील सर्वसामान्यपणे मानल्या जाणाऱ्या गैरसमजुतीविषयी बायबल काय म्हणते ते तुम्हाला पाहायला आवडेल का?” शक्य असेल तर दिलेले एखादे शास्त्रवचन वाचा.