वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ४/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! एप्रि.-जून

“पुरेसे शिक्षण घेण्याच्या महत्त्वावर बायबल जोर देते. [नीतिसूत्रे २:१०, ११ वाचा.] प्रशिक्षित शिक्षकांची आपल्याला किती गरज आहे, हे सर्वांना माहीत आहे. सावध राहा! नियतकालिकात, शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका, त्यांना कराव्या लागणाऱ्‍या बलिदानांची कदर बाळगणे आणि त्यांच्यासमोर येणाऱ्‍या आव्हानात्मक परिस्थितींना पालकांनी मदत करणे, यावर जोर दिला आहे.”

टेहळणी बुरूज एप्रिल १५

“लोक कुठेही राहत असले तरी, त्यांना आपल्या सुरक्षेची जास्त काळजी असते जसे की, एक चांगली नोकरी मिळवणे व ती टिकवून ठेवणे. परंतु एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे तुम्हाला कायमची सुरक्षा मिळू शकेल व तुम्ही चिरकालासाठी सुरक्षित राहू शकाल, हे तुम्हाला माहीत आहे का? [स्तोत्र १६:८, ९ वाचा.] टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात खरी सुरक्षा कशी प्राप्त करता येईल ते तुम्ही पाहू शकता.”

सावध राहा! एप्रि.-जून

“एखादी चूक केल्यावर आपल्या सर्वांना दोषी वाटत असते. हे आपल्यासाठी चांगले आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकल्यावर, स्तोत्र ३२:३, ७ वाचा.] सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकात सांगितले आहे की, आपल्या मनात उत्पन्‍न झालेली दोषी भावना आपल्याला सकारात्मक कार्य करण्यास प्रवृत्त करते.”

टेहळणी बुरूज मे १

“खूप आजारी असलेल्या किंवा अपंग असलेल्या कोणाला तुम्ही ओळखता का? अशा लोकांना उत्तेजनाची आवश्‍यकता असते, हे तुम्ही निश्‍चितच मान्य कराल. परंतु त्यांना उत्तेजन मिळेल असे आपण काय बोलू शकतो? बायबलमध्ये आशेचा संदेश दिला आहे. [यशया ३५:५, ६ वाचा.] टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात तुम्हाला हे वाचायला मिळेल, की ही भविष्यवाणी खरी ठरणार आहे याची आपण खात्री का बाळगू शकतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा