वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०२ पृ. ५-६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km ४/०२ पृ. ५-६

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत जानेवारी ७ ते एप्रिल २२, २००२ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:

१. उपदेशक २:२ येथे शलमोनाचा असा अर्थ होता की, हसणे आणि विनोद करणे टाळले पाहिजे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८७ १२/१ पृ. २८ परि. ५.]

२. मानवजातीवर राज्य करण्याच्या देवाच्या अधिकाराचे समर्थन आणि त्याच्या राज्याकरवी त्याचा प्रेमळ उद्देश साकारणे हा विषय संपूर्ण बायबलमध्ये सामावलेला आहे. [kl-MR पृ. १४ परि. ७]

३. यशया १:७ येथे आहाज राजाच्या कारकीर्दीत यहूदा ओसाड झाल्याविषयी संदेष्टा सांगत होता. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. १७ परि. १६.]

४. यहोवा हाबेलच्या अर्पणाने संतुष्ट होता कारण ते काईनाने दिलेल्या अर्पणापेक्षा चांगले होते. (उत्प. ४:४) [my-MR ६]

५. आपल्या साधनांनी—आपला वेळ, क्षमता, शक्‍ती आणि भौतिक वस्तू—यांच्याद्वारे ‘यहोवाचा सन्मान’ भरभरून केल्याने यहोवा आपल्याला पुष्कळ आध्यात्मिक आशीर्वाद देईल. (नीति. ३:९, १०) [w-MR०० १/१५ पृ. २५ परि. १]

६. यशया २८:२१ येथे भाकीत केलेले आधुनिक काळातील ‘अपूर्व कार्य आणि विलक्षण कृती’ हर्मगिद्दोनात होणाऱ्‍या राष्ट्रांच्या नाशाला सूचित करते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. २९५ परि. १६; पृ. ३०१ परि. २८.]

७. मत्तय २४:३८, ३९ [NW] येथे दाखवल्याप्रमाणे, खाणेपिणे व इतर मानवी कार्यहालचालींमुळे नोहाच्या दिवसातील लोक प्रलयात वाहून गेले. [w-MR०० २/१५ पृ. ६ परि. ६]

८. निःस्वार्थ सेवा करणाऱ्‍या नम्र सेवकांच्या विनंत्या यहोवा नेहमीच मान्य करतो. [w-MR०० ३/१ पृ. ४ परि. ३]

९. यशया ६०:३ येथील “राष्ट्रे” देवाकडील प्रकाशाकडे आकर्षित होणारी वैयक्‍तिक राजकीय राष्ट्रे आहेत. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR०० १/१ पृ. १२ परि. ४.]

१०. यहोवाने यिर्मया जन्मण्याआधी त्याला “पवित्र केले” अर्थात त्याने यिर्मयाचे अनंतकाळाचे भविष्य पूर्वनियोजित केले. (यिर्म. १:५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ ५/१ पृ. २१ परि. २.]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. उपदेशक ११:१ येथे ‘अन्‍न सोडण्याचा’ काय अर्थ होतो? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८७ १२/१ पृ. ३० परि. १०]

१२. यशया ६:८ येथे यहोवा “आमच्यासाठी” म्हणतो त्यात आणखी कोण सामील आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. ९३-४ परि. १३.]

१३. यशया ९:२ च्या पूर्णतेत गालीलात “मोठा प्रकाश” कसा पडला आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. १२६ परि. १७.]

१४. सा.यु.पू. ५३९ मध्ये बॅबिलोनचा पाडाव आणि सरतेशेवटी तिची पूर्ण ओसाडी यासंदर्भात आधुनिक काळात कोणती समान घटना घडली आहे? (यश. १३:१९, २०; १४:२२, २३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. १८८ परि. ३०-१.]

१५. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ यशया २१:६ मध्ये सांगितलेला “टेहळणारा” कसा बनला आहे? (मत्त. २४:४५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. २२१-२ परि. ११.]

१६. विवाहसोबत्याच्या शोधात असलेल्या तरुणासाठी नीतिसूत्रे ३१:१० येथे कोणता सुज्ञ सल्ला आहे? [w-MR०० २/१ पृ. ३१ परि. १]

१७. यशया ४३:९ येथे राष्ट्रांच्या देवांना कोणते आव्हान देण्यात आले आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ ९/१ पृ. १७ परि. ३.]

१८. देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणाऱ्‍यांचे पाय कशाप्रकारे “मनोरम” आहेत? (यश. ५२:७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९७ ४/१५ पृ. २७ परि. ६.]

१९. आपल्या अंतःकरणाने आपल्याला फसवू नये म्हणून आपण काय करण्याची गरज आहे? (यिर्म. १७:९) [w-MR०० ३/१ पृ. ३० परि. ४]

२०. ‘यहोवाच्या मार्गाने चालणाऱ्‍यांनी’ काय करावे? (यिर्म. ७:२३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९९ ८/१५ पृ. २९ परि. ६.]

पुढील वाक्ये पूर्ण करा:

२१. “शहाण्याचे मन उजवीकडे . . . असते” हे या अर्थाने की “उजवी” बाजू नेहमी ______________________ दर्शवते; याकारणास्तव, त्याचे ______________________ त्याला चांगला, कृपायुक्‍त मार्ग अनुसरण्याची चालना देते याचे हे सूचक आहे. (उप. १०:२; मत्त. २५:३३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८७ १२/१ पृ. ३० परि. ४]

२२. आपण शास्त्रवचने ______________________ व त्यातील सल्ल्याचा ______________________ करतो तेव्हा मानवाला स्वतःला जे साध्य करता येणार नाही असे ______________________ मिळवत असतो. [kl-MR पृ. २१ परि. २०]

२३. यशया ३३:१ येथे वर्णन केलेला यहूदाच्या शहरांचा लुटाऱ्‍या म्हणजे ______________________ आहे; सा.यु.पू. ६३२ मध्ये त्याचाच स्वतःचा पराभव होऊन ______________________ येथील रहिवाशांकरता मोठी लूट राहिली ज्यांनी ‘टोळांप्रमाणे त्यांची लूट हरण केली.’ (यश. ३३:४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. ३४३ परि. ४; पृ. ३४५ परि. ६.]

२४. यशया ५४:१ आणि गलतीकर ४:२६, २७ यांच्यात तुलना केल्यास ‘वंध्य स्त्री’ “______________________” हिला चित्रित करते; आणि ‘विवाहित स्त्री,’ ______________________ याला चित्रित करते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ८/१ पृ. ११ परि. ८.]

२५. आपल्या सेवेत आपली थट्टा होते किंवा आपले ऐकले जात नाही तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, हा विरोध खरे म्हणजे ______________________ नव्हे तर आपण ज्याच्या संदेशाचा प्रचार करीत आहोत त्या ______________________ होत असतो. (२ करिंथ. ४:१, ७) [w-MR०० १/१५ पृ. २१ परि. २]

पुढील वाक्यांतील बरोबर उत्तर निवडा:

२६. येशूच्या स्वर्गीय वैभवातील दृष्टान्ताविषयी लिहीत असताना, पौलाने स्वतःचा उल्लेख “अकाली जन्मलेला” असा केला अर्थात (तो नव्यानेच आत्म्याने अभिषिक्‍त झाला होता; राष्ट्रांकरता प्रेषित या नात्याने त्याला लवकर नियुक्‍ती मिळाली होती; जणू वेळेआधीच त्याला आत्मिक जीवनात जन्मण्याचा किंवा पुनरुत्थित होण्याचा बहुमान लाभला होता). (१ करिंथ. ९:१; १५:८) [w-MR०० १/१५ पृ. २९ परि. ६]

२७. “सनातन पिता” ही उपाधी मानवांना (आध्यात्मिक तजेला; स्वर्गात अमर जीवन; पृथ्वीवर अनंत जीवनाची आशा) देण्याची मशीही राजाची शक्‍ती व अधिकार याला सूचित करते. (यश. ९:६; योहा. ११:२५, २६) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. १३१ परि. २६.]

२८. यशया ६६:७ च्या आधुनिक पूर्णतेत, जन्मलेला “पुत्र” (येशू ख्रिस्त; मशीही राज्य; १९१९ साली नवीन आत्मिक राष्ट्र) याला सूचित करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ १/१ पृ. ११ परि. ३]

२९. “मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन” असे पेत्राला सांगताना येशू हे प्रकट करत होता की, पेत्राला (त्याच्या प्रेषितांमध्ये पहिले स्थान दिले जाईल; विशेष हक्क दिले जातील; मंडळीचा पाया बनवले जाईल). (मत्त. १६:१९) [gt-MR अध्याय ५९]

३०. आधुनिक दिवसातील पूर्णतेत, यिर्मया ७:२८ येथील ‘आपला देव परमेश्‍वर याचा शब्द ऐकत नाही ते राष्ट्र’ (मोठी बाबेल; ख्रिस्ती धर्मजगत; सातवी विश्‍व शक्‍ती) याला चित्रित करते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ ५/१ पृ. २९ परि. १०.]

पुढील वचने खाली दिलेल्या वाक्यांशी जुळवा:

नीति. २४:१६; उप. ३:११; यश. ४०:८; मत्त. ३:१६, १७; योहा. ६:१४, १५

३१. योग्य समयी, देवाच्या उद्देशात हरएक वस्तूचे कोणते स्थान आहे ते प्रकट केले जाईल. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८७ १२/१ पृ. २८ परि. ८.]

३२. येशू चमत्कारिकरित्या हजारोंना जेवू घालत होता हे पाहून लोकांनी असा निष्कर्ष काढला की, तो मोशेपेक्षा थोर संदेष्टा असावा आणि उत्तम शासक ठरेल. [gt-MR अध्याय ५३]

३३. जीवनातील अडखळणे अपरिहार्य असली तरीही धार्मिक मनुष्य योग्य ते करण्याचा सातत्याने प्रयत्न करायचे सोडत नाही. [w-MR०० २/१ पृ. ५ परि. १]

३४. देवाचे वचन किंवा प्रकट केलेला उद्देश फोल ठरवणे किंवा त्याच्या पूर्णतेत बाधा आणणे शक्य नाही. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा ip-1 पृ. ४०१-२ परि. १०.]

३५. यहोवाने स्वतः स्वर्गातून वाणी करून येशूबद्दल आपली स्वीकृती व्यक्‍त केली. [kl-MR पृ. ३८ परि. १०]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा