वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०२ पृ. ३
  • ‘सर्वांचे बरे करावे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘सर्वांचे बरे करावे’
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • चांगल्याची आस्था बाळगा!
    आमची राज्य सेवा—२००३
  • “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा”
    आमची राज्य सेवा—२००२
  • एप्रिल—‘मेहनत व परिश्रम’ करण्याचा समय
    आमची राज्य सेवा—२००१
  • “सत्कर्माविषयी धनवान असावे”
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ४/०२ पृ. ३

‘सर्वांचे बरे करावे’

१ “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा” आणि “सत्कर्माविषयी धनवान असावे” हे, आमची राज्य सेवा फेब्रुवारी आणि मार्च २००२ मधील पुरवणींचे विषय होते. (कलस्सै. १:२५, इजी-टू-रीड व्हर्शन; १ तीम. ६:१८) या अंकांमध्ये, आस्थेवाईक लोकांना स्मारकविधीला उपस्थित राहण्यास, अक्रियाशील झालेल्यांना पुन्हा एकदा मंडळीत क्रियाशील होण्यास व आपल्या मुलांना आणि योग्य बायबल विद्यार्थ्यांना सुवार्तेचा प्रचारक होण्यास मदत करण्याचे उत्तेजन आपल्याला देण्यात आले होते. आणि यासाठी मनापासून केलेल्या आपल्या प्रयत्नांना काही प्रमाणात तरी यश आले असेल यात काही शंका नाही. आता, “आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे . . . बरे” करीत राहू या.—गलती. ६:१०.

२ पुन्हा उपस्थित राहण्यास त्यांना आमंत्रण द्या: भारतातील कारभार सांभाळणाऱ्‍या शाखेच्या क्षेत्रात, स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांपैकी तीस हजारापेक्षा अधिक लोक सुवार्तेचे प्रचारक नव्हते. परंतु ते स्मारकविधीला उपस्थित राहिले यावरून त्यांना थोडीतरी आस्था आहे हे सूचित होत असल्यामुळे, ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्या या लोकांना विश्‍वास ठेवण्यास’ आपण कशाप्रकारे मदत करू शकतो? (प्रे. कृत्ये १३:४८) होता होईल तितक्या लवकर त्यांना मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या.

३ आस्था बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीला तुम्ही मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला येऊन यशयाच्या भविष्यवाणीवर चाललेली चर्चा ऐकायला बोलवू शकता. तुम्ही त्या व्यक्‍तीचे नातेवाईक आहात किंवा ओळखीचे आहात तर ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतील तुमच्या विद्यार्थी भाषणासाठी त्यांना आमंत्रण देऊ शकता. पुढील आठवड्यात दिल्या जाणाऱ्‍या जाहीर भाषणांचे विषय तुम्ही त्यांना सांगू शकता. (माहिती फलकावर अद्ययावत आराखडा लावला जावा.) मिळेल त्या संधीला, यहोवाची उपासना करण्याची इच्छा त्या व्यक्‍तीमध्ये कशी जागृत करता येईल ते पाहा. आणि त्याने बायबलचा अभ्यास अद्याप सुरू केला नसेल तर तुम्ही त्याला अभ्यासाविषयी विचारू शकता.

४ अक्रियाशील झालेल्यांना उत्तेजन देत राहा: स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या अनेकांनी आधीच यहोवाला आपले जीवन समर्पित केलेले आहे. पण, काही कारणास्तव त्यांनी सुवार्तेचा सक्रियपणे प्रचार करण्याचे थांबवले आहे. परंतु पौल आपल्याला, “विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे,” असा आर्जव करतो. (गलती. ६:१०) तेव्हा, अक्रियाशील बंधूभगिनींना मदत करणे हा आपला प्रमुख हेतू असला पाहिजे.

५ काही बंधूभगिनींनी कदाचित, वडिलांकडून व मंडळीतील इतरांकडून मिळालेल्या उत्तेजनामुळे सेवेमध्ये पुन्हा यायला सुरवात केलीही असेल. पुन्हा क्रियाशील झालेल्या एखाद्या प्रचारकासोबत काम करण्यास तुम्हाला वडिलांनी सांगितले असेल तर, यहोवाबद्दल आणि क्षेत्र सेवेबद्दल तुम्हाला असलेले प्रेम पाहून क्रियाशील व्यक्‍तीचा भरवसा वाढेल हे लक्षात ठेवा. सेवेच्या विविध क्षेत्रांमध्ये भाग कसा घ्यायचा ते त्या व्यक्‍तीला दाखवा जेणेकरून तिलाही त्यात आनंद मिळेल, प्रचार कार्यात नेहमी भाग घ्यायला आवडेल व अशाप्रकारे ती यहोवाचे आशीर्वाद मिळवेल.

६ नवीन प्रचारकांना चांगली सुरवात करून द्या: एका आस्थेवाईक स्त्रीला जेव्हा पटले की हीच देवाची खरी संस्था आहे, तेव्हा तिला लगेच सेवेत भाग घेण्याची इच्छा होती. पण सेवेत जाण्याआधी तिला काय काय करावे लागणार आहे हे सांगितल्यावर ती म्हणाली: “मी लगेच कामाला लागते.” तुम्ही जिच्याबरोबर बायबलचा अभ्यास करीत आहात ती व्यक्‍ती क्षेत्र सेवेत भाग घेण्यास तयार झाली असेल तर तिने ‘लगेच कामाला लागण्याची’ गरज आहे हे पाहण्यास तिला मदत करा आणि लागलीच नवीन प्रचारकाची चांगली सुरवात करून द्या. दर आठवडी, क्षेत्र सेवेची तयारी करून त्यात नियमितरीत्या भाग घेण्याची सवय लावण्यास तिला मदत करा.

७ तुमची स्वतःची मुले नव्याने बाप्तिस्मा घेतलेले प्रचारक झाले असतील तर त्यांचे वय आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांना प्रगती करायला मदत करा. तुमच्याकडून मिळालेल्या थोड्याशा मदतीने ते एखाद्याबरोबर संभाषण सुरू करू शकतात, बायबलमधून वचन दाखवू शकतात आणि साहित्य देऊ शकतात हे पाहून तुम्हाला आश्‍चर्यच वाटेल. तुमच्या मुलाला, क्षेत्र सेवेत कोणी आस्थेवाईक व्यक्‍ती भेटते तेव्हा त्या व्यक्‍तीकडे पुन्हा जाण्यासाठी व त्या व्यक्‍तीची आस्था वाढवत राहण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला प्रशिक्षण देऊ शकता.

८ तुमची स्वतःची सेवा वाढवा: स्मारकविधीच्या काळाव्यतिरिक्‍त सुवार्तेच्या प्रचारकार्यात जास्त भाग घ्यायला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जमते का? तुम्ही नेहमी क्षेत्र सेवेत जितका वेळ घालवता त्यापेक्षा दर आठवडी एक किंवा दोन तास अधिक घालू शकता का? तुम्हाला पुन्हा एकदा साहाय्यक पायनियरींग केव्हा करता येईल हे तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहात असता का? किंवा, पूर्ण-वेळची सेवा सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवन-शैलीत काही फेरफार करू शकाल का? सेवेसाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांमुळे कदाचित एखाद्याला सत्यात येण्यास आपण मदत करू शकू! (प्रे. कृत्ये ८:२६-३९) तेव्हा येणाऱ्‍या दिवसांत, आपण सर्व, “सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत” राहू या.—१ थेस्सलनी. ५:१५.

[३ पानांवरील चौकट]

मदत करीत राहा:

□✔ स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांना

□✔ पुन्हा क्रियाशील झालेल्या प्रचारकांना

□✔ बाप्तिस्मारहित प्रचारकांना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा