वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०१ पृ. ८
  • सणासुदीच्या दिवसांत यहोवाचा आदर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सणासुदीच्या दिवसांत यहोवाचा आदर करा
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km १०/०१ पृ. ८

सणासुदीच्या दिवसांत यहोवाचा आदर करा

१ भारतभर ऑगस्ट ते जानेवारी या पावसाळ्यानंतरच्या महिन्यांदरम्यानचा कालावधी सणासुदींचा असतो. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, ओणम, पोंगल यांसारखे सण साजरे करणाऱ्‍यांसाठी हा आनंदाचा समय असतो; आणि जे लोक हे सण साजरे करत नाहीत त्यांनाही हा काळ आनंदाचा असतो कारण या सणांच्या सुट्यांचा आनंद लुटायला त्यांना मिळतो. तुम्ही या सणांच्या सुट्यांमधील अतिरिक्‍त वेळ कशाप्रकारे घालवण्याची योजना करत आहात?

२ ईश्‍वरशासित कार्यांसाठी अतिरिक्‍त सुट्यांचा उपयोग करा: या सणांदरम्यान अनेकांना सुट्या असल्यामुळे, या रिकाम्या वेळेचा उपयोग लोकांना सुवार्ता सांगण्यात घालवणे यापेक्षा आणखी उत्तम काय असू शकते? सुट्या असल्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्य घरात असतील आणि सर्वजण आनंदात असतील. तेव्हा, या सुट्यांमध्ये केलेले साक्षकार्य प्रभावकारी व आनंददायक ठरू शकेल.

३ या सुट्यांचा पुरेपूर फायदा व्हावा म्हणून मंडळीचे वडील खास क्षेत्र सेवेची योजना करण्यात तत्परता दाखवू शकतात. कुटुंब प्रमुख, आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर सुटीच्या दिवसांमध्ये या साक्षकार्याच्या व्यवस्थेला पाठिंबा देण्याची आधीपासूनच योजना करतील. नेहमीपेक्षा जरा जास्त प्रयत्न करून तुम्ही कदाचित साहाय्यक पायनियरींग देखील करू शकाल. थकून गेलेल्या येशूलासुद्धा प्रचार कार्य, भोजनाप्रमाणे तजेला देणारे वाटले. (योहा. ४:३४) आपणही आपल्या शेजाऱ्‍यांना मदत करण्यात आपला व्यक्‍तिगत वेळ खर्च करतो तेव्हा आपल्यालाही असाच अनुभव येईल.

४ समंजसपणा व समजदारी दाखवा: इतरांबद्दल असलेले प्रेम आपल्याला त्यांच्या परिस्थितीचा विचार करण्यास प्रवृत्त करील. सणासुदींत लोक सहसा घरी आलेल्या पाहुण्यांना आदरातिथ्य दाखवण्यात किंवा त्यांच्यासाठी खास भोजन बनवण्यात व्यस्त असतात. ही परिस्थिती समजून घेतल्यामुळे ख्रिस्ती शिष्टाचार आपल्याला आपली सादरता संक्षिप्त ठेवण्यास प्रवृत्त करील. परंतु, काही लोक घाईगडबडीत नाहीत व आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करण्यास इच्छुक आहेत असे कदाचित तुम्हाला दिसेल. अशा वेळी समजूतदारपणा तुम्हाला, संभाषण पुढे वाढवायचे की नाही हे ठरवण्यास साहाय्य करील. असे असल्यास, तुम्ही म्हणू शकता:

◼ “आज सुटी असल्यामुळे सर्वजण आनंदात आहेत. काहीजण सणामुळे तर काहीजण सुटीमुळे खूष आहेत. अशा सुटीच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्य आरामात असतो, आणि घरातील सर्वजण प्रेमाने एकत्र मिळून कार्य करतात. परंतु वर्षातील प्रत्येक दिवशी काही चिंता नसली आणि सर्वत्र आनंदीआनंदच असला तर तुम्हाला कसे वाटेल? [उत्तर ऐका.] धार्मिक लोकांसाठी देवाने असेच करायचे ठरवले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?” उत्तर ऐका. उत्तर ऐकल्यावर तुम्ही स्तोत्र ३७:११, २९ वाचून म्हणू शकता: “आम्ही सर्व लोकांना अशा काळाचा विचार करण्याचे उत्तेजन देत आहोत जेव्हा पृथ्वीवर राहणाऱ्‍या प्रत्येकाला दररोजचा दिवस आनंदाचा ठरेल.” ज्ञान पुस्तकाच्या पृष्ठे ४ आणि ५ वरील चित्र दाखवा. अध्याय १ मधील मुद्द्‌यांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा येऊ शकतो का असे विचारा.

५ घरमालक आपल्याला निश्‍चितच सणाच्या शुभेच्छा देतील. अशा वेळी आपण एक तत्त्व नेहमी लक्षात ठेवू शकतो: आपण जगाच्या धार्मिक सणांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये भाग घेत नाही किंवा इतरांना सणांच्या शुभेच्छा देत नाही. (२ करिंथ. ६:१४-१८) परंतु, एखादा सत्हृदयी घरमालक जेव्हा आपल्याला शुभेच्छा देतो तेव्हा आपण विनाकारण त्याचे मन दुखवू इच्छित नाही. आपल्याला कोणी शुभेच्छा देतो तेव्हा आपण हात जोडून फक्‍त “धन्यवाद” किंवा “आभारी आहे” असे म्हणू शकतो. ही परिस्थिती हाताळण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, ऐकून घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो, असेही आपण म्हणू शकतो. अशाप्रकारे, आपण धार्मिक विषयाशी संबंधित असलेले शब्द वापरण्याचे आणि हातमिळवणी केल्याची भावना टाळू शकतो पण त्याचबरोबर इतरांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध देखील टिकवून ठेवू शकतो.

६ ते आपल्याला प्रसाद देतात तेव्हा काय? हा ‘मूर्तीला अर्पिलेला पदार्थ’ आहे आणि म्हणून तो खायचा की नाही हे माझ्या विवेकावर आहे असे आपण म्हणू शकतो का? (१ करिंथ. १०:२५-३०) नाही, प्रसाद हा सहसा, त्या दिवशी झालेल्या पूजेचा एक भाग म्हणून पाहुण्यांना व घरी भेट देणाऱ्‍यांना दिला जातो आणि जे तो प्रसाद खातात तेही त्या पूजेत सहभागी होत असतात. ही गोष्ट आपल्याला माहीत असल्यामुळे आपण व्यवहारबुद्धीने व स्पष्टपणे म्हणू शकतो: “वाईट वाटून घेऊ नका, पण मी प्रसाद घेत नाही.” (प्रे. कृत्ये १५:२८, २९) परंतु, काही घरांमध्ये, या काळात येणाऱ्‍या पाहुण्यांना फराळ अथवा दुसरे काही गोडधोड देण्याची रीत असेल. या रीती थेट पूजेशी संबंधित नसल्यामुळे पुष्कळजण स्वच्छ विवेकाने ते खातात.

७ सणासुदीच्या दिवसांमध्ये फक्‍त यहोवाचे साक्षीदारच घरोघरी जात नाहीत. काही स्थानीय लोकांचा गट घरोघरी जाऊन स्थानीय सणासाठी अथवा पूजेसाठी वर्गणी मागतात. शाळेमध्ये अथवा नोकरीच्या ठिकाणी देखील अशा वर्गण्या मागितल्या जातात. अशा कार्यासाठी वर्गण्या दिल्याने, आपणही ज्या दैवताच्या नावाने त्या गोळा केल्या जातात त्याला मान्यता दिल्याप्रमाणे होईल; तेव्हा, याबाबतीत आपल्या ठाम निर्णयाविषयी आधीच ठरवले पाहिजे. अशा प्रसंगीसुद्धा ठामपणे, परंतु व्यवहारबुद्धीने दिलेल्या उत्तराने बराच चांगला परिणाम होऊ शकतो. उचित शब्दांत आपण या गोष्टीवर जोर देऊ शकतो, की आम्ही वर्गणी देणे म्हणजे आमच्या उपासनेशी हातमिळवणी केल्यासारखे व आमच्या देवाशी बेईमानी केल्यासारखे समजतो; म्हणून आम्ही वर्गणी देण्याचा विचारही करत नाही.

८ सण पाळल्याने संपूर्ण वर्षभर आपल्याला समृद्धी मिळत राहील असा अनेकांचा विश्‍वास असतो. त्यामुळेच ते प्रेमळ शब्दांनी व कार्यांनी नवीन वर्षाची सुरवात करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी लोकांशी बोलताना आपण, “मृत्यू,” “आजारपण,” “दुःख” यांसारखे शब्द जाणीवपूर्वक टाळले पाहिजेत. त्याऐवजी, “चांगले आरोग्य,” “नवीन जगात चिरकाल शांती व समृद्धी” यांसारख्या आनंद देणाऱ्‍या विषयांवर आपण बोलू शकतो. वर्षाच्या या काळात अशा विषयांवर बोलायला बहुतेकांना निश्‍चितच आवडेल.

९ यहोवाचा आदर करण्याच्या आपल्या इच्छेमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये अधिक सेवाकार्य करण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे. लोकांनी आपला संदेश ऐकावा असे आपल्याला वाटत असल्यामुळे व्यवहारबुद्धीचा उपयोग करा पण त्यासोबतच, आपल्या विश्‍वासाची हातमिळवणी न करण्याच्या बाबतीत दक्ष राहा. येणाऱ्‍या नवीन जगात यहोवाने राखून ठेवलेल्या सार्वकालिक आनंदोत्सवात सहभागी होण्याकरता आपण आपल्या शेजाऱ्‍यांना मदत करू या.—जख. १४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा