द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शनची ऐतिहासिक उजळणी
सन १९५४ मध्ये तयार केलेल्या या फिल्मचा व्हिडिओ पाहताना, पुढील प्रश्नांच्या उत्तरावर विचार करा: (१) ही फिल्म कोणत्या उद्देशास्तव निर्माण करण्यात आली होती व याद्वारे काय साध्य करण्यात आले? (२) यहोवाचे साक्षीदार कोणकोणती प्रकाशने छापतात, कोणासाठी छापतात व का छापतात? (३) एकोणीशे चौपन्न सालच्या तुलनेत टेहळणी बुरूज मासिकाच्या सध्याच्या वितरणाबद्दल काय म्हणता येईल? (४) अलिकडील वर्षांत, आपल्या छपाईच्या कार्याचे कशाप्रकारे आधुनिकीकरण करण्यात आले आहे? (५) यांकी स्टेडियम येथे १९५३ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही प्रभावीत झालात? (६) ट्रेलर सिटी काय होती व त्याविषयीच्या कोणत्या उल्लेखनीय गोष्टी तुमच्या लक्षात आल्या? (७) आपले कार्य फक्त एका राष्ट्राचे, एकाच राष्ट्रांतील लोकांचे किंवा एकाच जातीच्या लोकांचे नाही हे कशावरून दिसते? (८) यहोवाची संघटना प्रेमळ आत्म्याने कार्य करते हे तुम्हाला कशावरून वाटते? (स्तो. १३३:१) (९) एकोणशे पन्नासच्या दशकादरम्यानच्या न्यू वर्ल्ड सोसायटीच्या कार्यांचा इतिहास कोणाला पाहायला जास्त आवडेल असे तुम्हाला वाटते?