घोषणा
◼ साहित्य सादरता ऑगस्ट: पुढे सुचवलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करता येऊ शकतो: चिरकाल टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! व मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्धाविना जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. सप्टेंबर: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार हे माहितीपत्रक आणि जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की उत्पत्तीने? (इंग्रजी) हे पुस्तक. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आस्था दाखवणाऱ्या लोकांबरोबर मॅग्झीन रूट सुरू करण्यासाठी पुनर्भेटी करा. मॅग्झीन रूट सुरू करणे जेथे शक्य नाही केवळ तेथेच वर्गणी सादर करावी. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे ही प्रकाशने आधीपासूनच असतील तर देवाच्या शोधात मानवजात (इंग्रजी) हे पुस्तक किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करता येऊ शकते.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
◼ लवकरच लोणावळ्यातील शाखा दफ्तर, बेंगळूर येथे स्थलांतरीत होणार असल्यामुळे, या वर्षी प्रत्येक मंडळीला वेगवेगळ्या पाकीटात २००२ आणि २००३ या दोन्ही सेवा वर्षांदरम्यान पुरेल इतका फॉर्मचा साठा पाठवण्यात आला आहे. तेव्हा, कृपया हे फॉर्म्स जपून वापरावेत. ज्या कामासाठी हे फॉर्म्स आहेत त्याच कामासाठी ते वापरावेत. वर्ष २००३ सेवा वर्षासाठी असलेले पाकीट त्याच वर्षी वापरण्यासाठी कृपया ते जपून ठेवावे.
◼ या वर्षापासून पुढे, सप्टेंबर महिन्याच्या १ तारखेपर्यंत ज्या नियमित पायनियरांचे वय किमान १६ वर्ष पूर्ण झालेले नसेल त्यांना पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहता येणार नाही. परंतु, वयोमान कमी असलेल्या एखाद्या पायनियरचे पालक या प्रशालेला उपस्थित राहणार असतील तर तो/ती या प्रशालेला आपल्या पालकाबरोबर उपस्थित राहू शकतो/शकते.
◼ ऑगस्ट ३१, २००१ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्वेन्टरी फॉर्मवर (S-18) भराव्यात. मासिकांची एकूण संख्या, लिटरेचर ग्रूपमध्ये असणाऱ्या प्रत्येक मंडळीचे मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्वेन्टरी फॉर्म्स (S-18) पाठवले जातील. यांपैकी मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ च्या आत संस्थेला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत वर्क शीट म्हणून वापरू शकता. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्वेन्टरीची तपासणी करावी. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी व अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्या कराव्यात.
◼ ऑगस्ट २४, २००१ पासून ऑगस्ट ३१, २००१ पर्यंत संस्थेजवळ अर्थात लोणावळा बेथेलमध्ये असलेल्या सर्व लिटरेचरची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाईल. या दरम्यान कोणत्याही मंडळीच्या लिटरेचर रिक्वेस्ट्स पाठवल्या जाणार नाहीत.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीसाठी प्रकाश I —कन्नड, तामीळ, तेलगू, पंजाबी, हिंदी
देवाचे मार्गदर्शन—परादीसकडे जाणारा मार्ग —हिंदी