वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०० पृ. ४
  • तुम्ही लाजऱ्‍या स्वभावाचे आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही लाजऱ्‍या स्वभावाचे आहात का?
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • माझा स्वभाव इतका बुजरा का आहे?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • कोणाशी मैत्री करणं मला इतकं कठीण का जातं?
    सावध राहा!—१९९९
  • मला मनमिळाऊ होता येईल का?
    सावध राहा!—१९९९
  • यहोवा तुम्हाला ताकद देईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ७/०० पृ. ४

तुम्ही लाजऱ्‍या स्वभावाचे आहात का?

१ लहान मुलांना आपल्या आई किंवा बाबांच्या मागे लपून आपल्याकडे चोरून पाहताना तुम्ही पाहिले असेल. लहानपणी सगळ्याच मुलांना नवीन लोकांसमोर यायला लाज वाटते. काहीजण प्रौढपणी देखील स्वभावानेच लाजरेबुजरे असतात. पण लाजरेपणा हा तुमच्या प्रचार कार्यात अडखळण बनत असेल तर तुम्ही काय करू शकता?

२ लाजरेपणा घालवणे: आपल्या ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्याकडे’ लक्ष देणे गरजेचे आहे. (१ पेत्र ३:४) यहोवा देवाबद्दल व लोकांबद्दल वाटणारे प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा. हे निःस्वार्थ प्रेम व्यक्‍त करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे प्रचार कार्य आहे हे नीट समजून घ्या. वैयक्‍तिक अभ्यास नियमितपणे करा, सभांनाही नियमित उपस्थित राहा. निरंतर प्रार्थना करून यहोवाला आपली समस्या सांगा, त्याच्याकडे मदतीची याचना करा. तुमचा विश्‍वास आणि यहोवावरचा भरवसा पक्का होत जाईल तसतसा तुमचा आत्मविश्‍वास वाढेल आणि यामुळे तुम्हाला ‘देवाचे वचन निर्भयपणे सांगण्याचे अधिक धाडस होईल.’—फिलिप्पै. १:१४.

३ कमीपणाच्या भावनांना मुळीच थारा देऊ नका. एकेकाळी तीमथ्याला देखील ही समस्या होती. म्हणूनच पौलाने तीमथ्याला सांगितले, “कोणी तुझ्या तारूण्याला तुच्छ मानू नये.” त्याने तीमथ्याला आठवण करून दिली की “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा . . . आत्मा दिला आहे.” (१ तीम. ४:१२; २ तीम. १:७) यहोवाने आपल्या सेवेकरता तीमथ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. तुम्ही देखील यहोवावर पूर्ण विश्‍वास ठेवून धैर्याने पुढे गेलात तर त्याच्या सेवेकरता तो तुमचाही उपयोग करून घेईल.—स्तोत्र ५६:११.

४ एका बहिणीला हीच समस्या होती, ती अतिशय लाजऱ्‍या स्वभावाची होती. तिचा पती सत्याकरता तिचा विरोध करायचा त्यामुळे त्याची तिला खूप भीती वाटायची. पण मत्तय १०:३७ यांसारख्या बायबल वचनांवर मनन केल्यामुळे तिला मदत झाली. ती सेवेत टिकून राहिली. कालांतराने तिची भीती गेली आणि नंतर तिचा पती, आई आणि भाऊ यांनी देखील सत्य स्वीकारले!

५ तयारी करणे महत्त्वाचे आहे: सेवेला निघण्याआधी चांगली तयारी केल्यास तुमचा आत्मविश्‍वास आणखी वाढेल. रिझनिंग पुस्तकातून किंवा आमची राज्य सेवाच्या जुन्या अंकांतून एखादी साधीशी प्रस्तावना निवडा. ती नीट समजून घ्या आणि मग ती प्रस्तावना वापरून संदेश सांगण्याचा सराव करा. तुम्हाला भीती वाटू लागल्यास, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. इतरांसोबत सेवेला जाऊन, ते कसे बोलतात याचे निरीक्षण करून आपले धैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा. घरोघरच्या कार्यात तुम्ही ज्यांना भेटता त्यांपैकी बरेच लोक तुमच्यासारखेच बुजरे असतात हे विसरू नका. पण सर्वांना राज्याचा संदेश सांगणे महत्त्वाचे आहे.

६ आपल्या लाजऱ्‍या स्वभावामुळे हताश होऊ नका. तुम्ही प्रयत्न केले तर यहोवा तुम्हाला सुवार्तेचा धैर्यवान व प्रभावशाली प्रचारक बनायला अवश्‍य मदत करेल. मग तुम्हालाही सेवेतून मिळणारा आनंद अनुभवता येईल.—नीति. १०:२२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा