तुम्ही कसे ऐकता याकडे लक्ष द्या
आपण मंडळीच्या सभा, संमेलने आणि अधिवेशने यांस उपस्थित राहतो तेव्हा लक्ष देऊन ऐकणे अतिशय महत्त्वाचे आहे. (लूक ८:१८) पण, लक्ष देऊन ऐकण्याची ही क्षमता तुम्ही कशी विकसित करू शकता? त्यासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवा:
◼ सभांच्या आधी जास्त जेवू नका.
◼ सभांमध्ये बसलेले असताना मन एकाग्र करा.
◼ मुख्य मुद्द्यांच्या संक्षिप्त नोंदी लिहून घ्या.
◼ व्यासपीठावरून शास्त्रवचने सांगितली जातात तेव्हा आपले बायबल उघडून ती वाचा.
◼ संधी मिळेल तेव्हा सभांमध्ये उत्तरे द्या.
◼ व्यासपीठावरून जे सांगितले जाते त्यावर विचार करा.
◼ ऐकलेल्या गोष्टींचा रोजच्या जीवनात कसा उपयोग केला जाऊ शकतो याचा विचार करा.
◼ शेवटी सभांमधून जे काही शिकायला मिळाले त्याची चर्चा करा.
अधिक माहितीसाठी थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबूक, अभ्यास ५ पाहा.