वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९९ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • उपचारासंबंधी निर्माण होणाऱ्‍या समस्यांसाठी आत्तापासूनच तयार राहा!
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • विश्‍वासास आव्हान देणाऱ्‍या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारीत आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९०
  • तुमच्या मुलांना रक्‍ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • रक्‍ताबद्दल देवाचा दृष्टिकोन
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ९/९९ पृ. ७

प्रश्‍न पेटी

◼ तातडीचा प्रसंग उद्‌भवल्यास तुम्ही तयार असाल का?

हल्ली अनेकदा, “समय व प्रसंग” यांच्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या तातडीचा प्रसंग ओढवतो आणि त्यासोबतच रक्‍त घेण्याचाही जबरदस्त दबाव येतो. (उप. ९:११; पं.र.भा.) अशा प्रसंगाला तोंड देण्यास आपण तयार असावे म्हणून यहोवाने त्याच्या संघटनेमार्फत अनेकानेक मार्गांनी आपल्याला मदत पुरवली आहे; पण, त्याचवेळी आपणही आपले कर्तव्य करावे अशी त्याची अपेक्षा आहे. या संदर्भात तुम्हाला सहायक ठरतील असे काही मुद्दे पुढे दिले आहेत.

• नेहमी आपले नो-ब्लड कार्ड आपल्याजवळ असू द्या.

• तुमची मुले देखील आपले आयडेन्टिटी कार्ड नेहमी सोबत ठेवतात याची खात्री करा.

• तुमच्या मुलांच्या उपचारांविषयी डॉक्टरांसोबत आणि न्यायाधीशांसोबत उत्तमप्रकारे तर्क करता यावा म्हणून ऑक्टोबर १९९२ च्या आमची राज्य सेवा पुरवणीची उजळणी करा.

• रक्‍ताचे घटक आणि रक्‍तासाठी असलेले पर्याय यांवरील लेखांची उजळणी करा. (यासाठी पुढील लेखांची शिफारस केलेली आहे: टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १, १९९४, पृष्ठ ३१; जून १, १९९०, पृष्ठे ३०-१ (इंग्रजी); मार्च १, १९८९, पृष्ठे ३०-१ (इंग्रजी); सावध राहा!, डिसेंबर ८, १९९४, पृष्ठे २३-७ (इंग्रजी); ऑगस्ट ८, १९९३, पृष्ठे १७-१९; नोव्हेंबर २२, १९९१, पृष्ठ १० (इंग्रजी); आणि आमची राज्य सेवा, ऑक्टोबर १९९२ ची आणि डिसेंबर १९९० ची पुरवणी. हे सर्व लेख एखाद्या फाईलमध्ये तयार ठेवा.)

• शरीराबाहेर रक्‍ताभिसरण करणाऱ्‍या मशिन्सचा उपयोग करावा की नाही किंवा शरीरात रक्‍ताचे घटक घ्यावेत की नाही हे तुमच्या विवेकावर अवलंबून असावे.

• शक्य असल्यास, हॉस्पिटलला जाण्याआधी मंडळीतल्या वडिलांना कळवा जेणेकरून ते तुमच्या मदतीला येऊ शकतील किंवा आवश्‍यकता असल्यास हॉस्पिटल लिएझॉन कमिटीशी (एचएलसी) संपर्क करू शकतील. लहान मुलांच्या बाबतीत पुरेशा वेळेआधीच एचएलसीला कळवण्यास वडिलांना सांगा.

तुम्ही रक्‍त घेणार नाहीत हे स्पष्टपणे सांगा: अहवालांवरून समजते, की आपण रक्‍त घेत नाही ही गोष्ट काही बंधुभगिनी अगदी शेवटल्या क्षणी डॉक्टरांना सांगतात. वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांना असे शेवटल्या क्षणी सांगणे योग्य नाही शिवाय यात तुम्हाला रक्‍त देण्याचा धोकाही असू शकतो. तुमच्या दृढ मतांविषयी डॉक्टरांना माहिती असेल आणि तुमच्या इच्छेला आधार देणारी सही केलेली कागदपत्रे असली ज्यामध्ये तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगितलेले असेल, तर उशीर न लावता उपचार सुरू करण्यास आणि रक्‍तविरहित वैद्यकीय उपचारासंबंधी अतिरिक्‍त पर्याय निवडण्यास त्यांना मदत होऊ शकते.

तातडीचा प्रसंग केव्हाही ओढवू शकतो; विशेषतः, आपण अपेक्षाही केलेली नसते अशा वेळी. तेव्हा, रक्‍त संक्रमणापासून स्वतःला आणि तुमच्या मुलांना वाचवण्यासाठी आताच पावले उचला.—नीति. १६:२०; २२:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा