पूर्वतयारी केल्याने आनंद मिळतो
१ क्षेत्र सेवा एक अत्यंत आनंददायक कार्य आहे. (स्तोत्र ८९:१५, १६) पण हा आनंद पुरेपूर अनुभवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची आहे तयारी. जितकी चांगली तयारी, तितकेच चांगले परिणाम आणि जितके चांगले परिणाम मिळतील तितकाच आपल्याला जास्त आनंद होईल.
२ पुरवलेली साधने उपयोगात आणा: तयारी करताना पहिल्यांदा आमची राज्य सेवा यातील माहिती वाचून ती नीट समजून घ्या. तुम्हाला राज्य संदेश सहजसोप्या आणि परिणामकारक पद्धतीने सादर करता यावा म्हणून विचारपूर्वक तयार केलेल्या सादरता सहसा यात दिलेल्या असतात. लोक सहसा जे आक्षेप घेतात, त्यांना कसे तोंड द्यावे यावरही उदाहरणांसहित मार्गदर्शन तुम्हाला सापडेल. तसेच, बायबल अभ्यास सुरू करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून परिणामकारक पद्धतीने पुनर्भेट कशी करावी याबद्दलही खास सहायक सूचना दिल्या जातात. या सूचनांचा सहज-स्वाभाविक पद्धतीने उपयोग करता यावा म्हणून तुम्ही त्यांत आवश्यक फेरबदल करू शकता. याशिवाय, तुमच्याजवळ पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्यात ही पुस्तिका देखील असेलच; या पुस्तिकेत निरनिराळ्या प्रस्तावना दिलेल्या आहेत, तसेच संभाषण बंद करू पाहणाऱ्यांना कशी उत्तरे द्यावीत हे देखील. यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींना परिणामकारकरित्या तोंड देण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
३ जे प्रकाशन तुम्ही सादर करणार आहात, त्याचा अभ्यास करा; घरमालकाला दाखवता येतील असे एखाददोन लक्ष वेधून घेणारे मुद्दे निवडा. संभाषण सुरू करण्यासाठी, अलीकडेच तुमच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेल्या एखाद्या खळबळजनक बातमीचा उपयोग करता येईल. लोक सहसा कशाप्रकारचे आक्षेप घेतात आणि या आक्षेपांना एखाददोन प्रकारे कशी उत्तरे देता येतील याविषयी आधीच थोडा विचार करा. यानंतर, घरमालकाशी तुम्ही कसे बोलणार आहात याचा काही मिनिटे सराव करा.
४ प्रत्येक सेवा सभेला उपस्थित राहा: सेवा सभेत जेव्हा आमची राज्य सेवा यातील सहायक सूचनांवर चर्चा, उजळणी आणि त्यांवर आधारित प्रात्यक्षिके केली जातात तेव्हा लक्षपूर्वक ऐका. सुवार्ता सादर करताना ज्या सूचना उपयोगात आणता येतील असे तुम्हाला वाटते, त्या थोडक्यात लिहून घ्या. सेवेत सहसा कशाप्रकारचे प्रसंग उपस्थित होतात हे आठवून पाहा आणि अधिक परिणामकारक पद्धतीने साक्ष कशी देता येईल यावर विचार करा. सभा सुरू होण्याआधी आणि संपल्यावर, इतर प्रचारकांशी या मुद्द्यांवर चर्चा करा.
५ तुम्ही “प्रत्येक चांगल्या कामास तयार” असल्यास, इतरांना जीवनाच्या मार्गावर येण्यासाठी मदत करण्यात तुम्हाला अधिक आनंद आणि सफलता लाभेल ही खात्री तुम्ही बाळगू शकता.—२ तीम. २:२१.