वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९९ पृ. ४
  • सेवा सेवक मोलवान कामे पार पाडतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सेवक मोलवान कामे पार पाडतात
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • उपाध्य सेवक यहोवाच्या लोकांसाठी एक आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपाध्य सेवकहो आपणासाठी चांगली योग्यता राखा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मंडळीत सेवा सेवकांची काय भूमिका आहे?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • वडील आणि सेवा-सेवकांमध्ये सुसंगतता टिकवून ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ३/९९ पृ. ४

सेवा सेवक मोलवान कामे पार पाडतात

१ आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकातील पृष्ठ ५७ वर सेवा सेवकांविषयी असे म्हटले आहे: “त्यांनी स्वतःच्या बाबतीत खरेपणाने समर्पित पुरुष असल्याचे दाखवलेले असते व स्वतःचा विश्‍वास आवेशी राज्यसेवेद्वारे आणि इतरांना विश्‍वासात दृढ राहण्याची मदत करण्याद्वारे दाखवलेला असतो.” खरेच, आध्यात्मिकतेच्या बाबतीत आपल्या सेवा सेवकांनी मांडलेले उदाहरण खरोखरच अनुकरण करण्यासारखे आहे. त्यांच्या आणि वडिलांच्या सोबतीने कार्य केल्याने “संपूर्ण शरीर वाढते व प्रीती बळकट होत जाते.”—इफिस. ४:१६; ईझी टू रीड व्हर्शन.

२ मंडळीमध्ये सेवा सेवक एक अतिमहत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. ते करत असलेल्या महत्त्वपूर्ण कामांचा विचार करा: जमाखर्च अहवाल, साहित्य, नियतकालिके, वर्गण्या आणि क्षेत्रे यांसंबंधित जबाबदाऱ्‍या ते सांभाळतात; ते परिचारकाचे काम करतात, ध्वनिक्षेपण यंत्रे हाताळतात आणि राज्य सभागृहाची देखभाल करतात. या शिवाय, ते ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आणि सेवा सभेत सहभाग घेतात. यांच्यापैकी काही जाहीर भाषणे देतात किंवा मंडळीच्या काही सभाही चालवतात. आपल्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणेच हे सेवा सेवक आपल्याला आवश्‍यक असणाऱ्‍या सेवा पार पाडतात.—१ करिंथ. १२:१२-२६.

३ शरीराचा भाग या नात्याने सेवा सेवकांना वडिलांसोबत परस्पर आदराने, समजुतदारपणे सहकार्य करताना पाहून इतरांनाही त्यांचे अनुकरण करावेसे वाटते. (कलस्सै. २:१९) या सर्व जबाबदाऱ्‍या दर आठवडी नियमितपणे आणि विश्‍वासूपणे पूर्ण करून तसेच इतरांबद्दल वैयक्‍तिक आस्था दाखवून आध्यात्मिकरित्या प्रगतीशील असण्यास मंडळीला हातभार लावतात.

४ अशा कष्टाळू सेवा सेवकांची आपण कदर कशी करू शकतो? एकतर, त्यांना नेमून दिलेली कामे आपल्याला माहीत असली पाहिजेत आणि दुसरे म्हणजे त्यांना आपल्या मदतीची गरज असते तेव्हा सहकार्य करण्यास आपण नेहमी तयार असले पाहिजे. तसेच, बोलण्यातून किंवा कृतीतूनही आपण दाखवून देऊ शकतो की आपल्याला त्यांच्या सेवेची कदर आहे. (नीति. १५:२३) खरेच, आपल्यासाठी परिश्रम करणारे हे सेवा सेवक मनस्वी कृतज्ञतेच्या पात्र आहे.—१ थेस्सलनी. ५:१२, १३.

५ मंडळीत सेवा सेवकांची भूमिका काय आणि त्यांच्या पात्रता काय हे सर्व देवाच्या वचनात नमूद केलेले आहे. (१ तिमथ्य. ३:८-१०, १२, १३) मंडळीच्या सभा सुरळीत चालण्यासाठी यांच्या मोलवान पवित्र सेवेची अत्यंत गरज आहे. साहजिकच, ‘प्रभुच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असल्यामुळे,’ ते नेहमीच आपल्या उत्तेजनास पात्र आहेत.—१ करिंथ. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा