वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९९ पृ. १
  • सुवार्तेचा प्रचार उत्सुकतेने करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्तेचा प्रचार उत्सुकतेने करा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • प्रचार करा व चांगल्याप्रकारे साक्ष द्या
    आमची राज्य सेवा—२००३
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो
    आमची राज्य सेवा—२०००
  • उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ४/९९ पृ. १

सुवार्तेचा प्रचार उत्सुकतेने करा

१ “तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; . . . तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.” अशाप्रकारे प्रेषित पौलाने रोममधील बांधवांना लिहिलेल्या आपल्या पत्राची सुरवात केली. पण या बांधवांना भेटण्यास पौल इतका उत्सुक का होता? तो स्वतःच याचे उत्तर देतो: ‘म्हणजे तुमच्यामध्येही फलप्राप्ती व्हावी कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही; खरे तर, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.’—रोम. १:११-१६.

२ इफिसच्या वडीलवर्गाशी बोलतानाही पौलाने अशीच उत्सुकता दाखवली. त्याने त्यांना आठवण करून दिली: “आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून . . . चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. . . . यहूदी व हेल्लेणी ह्‍यांस मी साक्ष देत होतो.” (प्रे. कृत्ये २०:१८-२१) नेमून दिलेल्या क्षेत्रात तारणाची सुवार्ता सांगणे आणि राज्याची फलप्राप्ती करणे हाच पौलाचा उद्देश होता. पौलाची ही मनोवृत्ती खरोखरच अनुकरण करण्यासारखी आहे.

३ आपण स्वतःला विचारू शकतो: “माझ्या परिसरात सुवार्तेची घोषणा करण्यासाठी मी अशीच उत्सुकता दाखवतो का? प्रचाराचे कार्य केवळ एक कर्तव्य आहे असे न समजता शक्य तितक्या अधिक लोकांना सुवार्ता सांगण्यास मी उत्सुक असतो का? मी माझ्या परिस्थितींचा प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? घरोघरी, रस्त्यांवर, व्यापारी क्षेत्रात, टेलिफोनद्वारे आणि अनौपचारिकरीत्या प्रचार करण्याच्या माझ्या क्षेत्रातल्या सर्व शक्यतांचा मी अभ्यास केला आहे का?

४ एप्रिलमध्ये उत्सुकतेने सहभाग घ्या: प्रचार कार्यातील आपला सहभाग वाढवण्याची एक उत्तम संधी आपल्याला एप्रिल महिन्यात आहे. तसेच, तासांची मागणी कमी केल्यामुळे आता अधिकांना सहायक पायनियरींग करणे शक्य झाले पाहिजे. कदाचित, एप्रिल आणि मे महिन्यांत सहायक पायनियरींग करण्यास तुमची परिस्थिती तुम्हाला अनुमती देईल. किंवा मग तासांच्या मागणीत फेरबदल झाल्यामुळे एक नियमित पायनियर म्हणून आपले नाव नोंदवणे तुम्हाला शक्य होईल. तुम्ही मंडळीत प्रचारक असल्यास, या आणि पुढच्या महिन्यात सेवेत नेहमीपेक्षा अधिक वेळ खर्च करून तुम्ही पायनियरींग करू शकणाऱ्‍यांना पाठिंबा देऊ शकता का? असे केल्यामुळे यहोवाचे मन किती आनंदित होईल!

५ पौलाप्रमाणेच सर्व राज्य प्रचारकांनी प्रचाराच्या कार्यात सहभाग घेऊन सतत आपली उत्सुकता प्रदर्शित करण्यास हवी. सेवेत शक्य तितके केल्यामुळे आपल्याला खरा आनंद मिळू शकतो. आपल्या पवित्र सेवेबद्दल पौलाला असाच आनंद वाटत होता. त्याच्या या सर्वोत्कृष्ट उदाहरणाचे अनुकरण करण्यातच आज आपला फायदा आहे.—रोम. ११:१३; १ करिंथ. ४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा