कार्य उरकण्यात प्रत्येकाचा हातभार आवश्यक
१ येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्याने याची जाण राखली पाहिजे, की राज्य प्रचार कार्यास पाठिंबा देण्याचे व त्यात सहभागी होण्याचे त्याचे प्रयास अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आपले शिष्य एकाच प्रमाणात राज्याची फळे उत्पन्न करणार नाहीत याची जाणीव येशूला होती. (मत्त. १३:२३) कामसू वृत्तीचे अनेक पायनियर प्रचार कार्यात सिंहाचा वाटा उचलत असले तरी, जे लोक त्यांच्या परीने होता होईल तितके फळ उत्पन्न करून उत्सुकतेने देवाचे गौरव करतात त्या सर्वांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.—योहा. १५:८.
२ सामाईक प्रयत्नांनी पुष्कळ काही साध्य होते: येशूने भाकीत केले होते, की त्याच्या शिष्यांच्या सामाईक प्रयत्नांमुळे त्याने स्वतः केले त्याहून मोठे कार्य निष्पन्न होईल. (योहा. १४:१२) आपल्या वैयक्तिक परिस्थितींनुसार, राज्य प्रचार कार्यात आपण खारीचा वाटा उचलत असू अथवा सिंहाचा वाटा उचलत असू, कार्य उरकण्यात मात्र प्रत्येकाचा हातभार आवश्यक आहे. पौलाने म्हटले अगदी त्याप्रमाणे ते आहे: “प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.”—इफिस. ४:१६.
३ या कार्यात आपण अधिक योगदान करत नाही याची रुखरूख काहींना वाटू शकेल. तथापि, यहोवाच्या नजरेत जिवेभावे केलेल्या सेवेला महत्त्व आहे. त्याच्यासाठी आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट बहुमूल्य असून तिची कदर बाळगली जाते.—पडताळा लूक २१:१-४.
४ कार्याला पाठिंबा देत राहा: आपल्यापैकी प्रत्येकाला, जगव्याप्त कार्याला भौतिकरित्या हातभार लावण्याचा एक सुहक्क आहे. राज्य कार्यास पाठिंबा देण्यात काहीजण अंग मेहनतीच्या कामातही हातभार लावू शकतात. प्रत्येकजण सभांमध्ये, उत्तम प्रकारे पूर्व तयारी केलेली विवेचने देण्याचा तसेच ईश्वरशासित सेवा प्रशालेत सहभाग घेण्याचा प्रयत्न करू शकतो. इतरांना उत्तेजन देण्याच्या संधींचा फायदा उचलण्याद्वारे मंडळीच्या आध्यात्मिकतेत आपण मौल्यवान भर घालू शकतो; आणि यामुळेच मग, सोपवून दिलेले कार्य साध्य करण्यातील मंडळीची कार्यक्षमता वाढते.
५ खरेच, कार्य उरकण्यात प्रत्येकाचा हातभार आवश्यक आहे. कार्य उरकण्यासाठी आपली गरज नाही अशी भावना कोणीही बाळगू नये. यहोवाची सेवा करण्यातील आपल्या लहानमोठ्या सामाईक प्रयत्नांमुळे देवाचे एकमेव खरे उपासक या नात्याने आपण उठून दिसतो. (मला. ३:१८) आपल्यापैकी प्रत्येकजण, यहोवाचा सन्मान करण्यात तसेच इतरांना त्याची ओळख करून देण्यासाठी व त्याची सेवा करण्यासाठी मदत करण्यात अर्थपूर्ण सहभाग घेऊ शकतो.