वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९८ पृ. २
  • आपली माहितीपत्रके अभ्यासणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपली माहितीपत्रके अभ्यासणे
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९५
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ४/९८ पृ. २

आपली माहितीपत्रके अभ्यासणे

फेब्रुवारी १९९८ ची आमची राज्य सेवा यात घोषित केल्याप्रमाणे, मे ४ ते सप्टेंबर १४, १९९८ या सप्ताहांदरम्यान आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासांमध्ये, एका पाठोपाठ एक अशा तीन माहितीपत्रकांचा आपण अभ्यास करणार आहोत. आमची राज्य सेवा यात प्रत्येक महिन्याचा जो आराखडा दिला जाईल त्यावरून, सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक आणि देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकांचा अभ्यास एकंदरीत जलदगतीने उरकला जाण्यास हवा असे तुम्हाला दिसून येईल. यासाठी संचालकाने आणि उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांनीच उत्तम तयारी करण्याची व तत्पर विवेचने मांडण्याची गरज आहे. सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक यात छापील प्रश्‍न नसल्यामुळे प्रत्येक संचालकाला आपले स्वतःचे प्रश्‍न तयार करावे लागतील तसेच परिच्छेदातील मुख्य मुद्देही ठळकपणे मांडावे लागतील. अभ्यास करावयाचे सर्व परिच्छेद वाचणे नेहमीच शक्य नसेल; पण निदान मुख्य परिच्छेद वाचले जातात याची खात्री संचालकाने करावी. जलदगतीने उरकल्यामुळे माहितीपत्रकांच्या एकंदरीत विषयांशी परिचित होणे शक्य होईल, जेणेकरून पुढेमागे एखाद्या विशिष्ट मुद्द्‌यावर संशोधन करताना नेमके कोठे पाहावे ते तरी आपल्याला माहीत असेल.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, सर्व परिच्छेद वाचण्यासाठी, सगळी किंवा बहुतेक उल्लेखित शास्त्रवचने वाचून त्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच विचारपूर्वक विवेचने मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकातील केवळ तीन पाठ प्रत्येक अभ्यासासाठी ठेवलेले आहेत. यासाठी देखील सर्वांनी उत्तम तयारी करण्याची गरज आहे. बायबल विद्यार्थ्यांसोबत आपण बहुधा याच माहितीपत्रकांतून अभ्यास करत असल्यामुळे या माहितीपत्रकाचा उपयोग करून, बायबलचे थोडेसे अथवा काहीच ज्ञान नसलेल्या व्यक्‍तींसोबत या माहितीपत्रकातून अभ्यास कसा केला जावा; अनावश्‍यक माहितीची भर न घालता शास्त्रवचनीय विषयांवर सुस्पष्ट युक्‍तिवाद कसा केला जावा; तसेच यहोवाच्या दर्जांसाठी मनस्वी कृतज्ञता विकसित करण्यास नवोदितांची मदत कशी केली जावी हे संचालकाने दाखवावे. पाठ १६ चा अभ्यास केल्यानंतर सबंध माहितीपत्रकाची उजळणी करताना संचालक विशेषतः, बायबल अभ्यासाच्या कार्यात उपयोग करता येतील अशा शिकवण्याजोग्या मुद्द्‌यांची उजळणी करू शकतो. या बाबींकडे लक्ष दिल्याने, देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने आपली कौशल्ये सुधारतील तसेच देवाला आपल्याकडून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा आपला मनोदय देखील आणखी पक्का होईल.—स्तोत्र १४३:१०; यश. ५०:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा