वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९८ पृ. २
  • एप्रिलसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिलसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • एप्रिल ६ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २० ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९८
km ४/९८ पृ. २

एप्रिलसाठी सेवा सभा

एप्रिल ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २७ (४)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. शनिवार, एप्रिल ११ रोजी होणाऱ्‍या स्मारकविधीच्या स्थानाची व वेळेची सर्वांना आठवण करून द्या.

१५ मि: “आपली सेवा—खऱ्‍या प्रीतीची अभिव्यक्‍ती.” प्रश्‍नोत्तरे. फेब्रुवारी १, १९८७, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे १६-१७, परिच्छेद ३-७ यांतील संक्षिप्त विवेचने समाविष्ट करा.

२० मि: “नियतकालिके राज्याची घोषणा करतात.” नियतकालिकांचे वाटप करण्यात प्रभावी असलेल्या तीन किंवा चार प्रचारकांच्या गटासोबत वडील हा लेख विचारात घेतात. अलीकडील नियतकालिकांच्या आकर्षक वैशिष्ट्यांची चर्चा करून आपल्या प्रस्तुतींमध्ये हे मुद्दे समाविष्ट करण्याच्या पद्धती सुचवा. स्थानिक क्षेत्रातील नियतकालिक वितरणात वाढ कशी करता येईल हे देखील विचारात घ्या. अलीकडील अंकांचा उपयोग करून आस्था चेतविणारे लेख दाखवा; जसे की स्थानिक, कौटुंबिक किंवा सामाजिक विषय हाताळणारे लेख. दोन किंवा तीन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.

गीत २०५ (२८) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९० (७)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: “सभांना ‘अधिकाधिक’ उपस्थित राहा.” प्रश्‍नोत्तरे. वेळ असल्यास आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे ६४-५ वर दिलेल्या सल्ल्याची उजळणी करा. नियमितपणे सभांना उपस्थित राहणाऱ्‍यांची स्नेहपूर्ण प्रशंसा करा.

गीत ११९ (१७) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५ (६)

१० मि: स्थानिक घोषणा. हे स्पष्ट करा, की मे महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी अर्ज सादर करण्यास अद्यापही उशीर झालेला नाही.

१५ मि: प्रश्‍न पेटी. वडिलांचे भाषण; मंडळीत सुधारणा करण्याचे विशिष्ट मार्ग ते प्रेमळपणे दाखवून देतात.

२० मि: “‘आपल्यासारख्या भावना असलेले’ पुरुष.” मार्च १, १९९८ टेहळणी बुरूज यातील पृष्ठे २६-२९ वर दिलेल्या लेखावर आधारित वडिलांचे भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. प्रचार करण्याची आणि साक्ष देण्याची आपली कार्यनियुक्‍ती पूर्ण करत असताना यहोवावर विसंबून राहण्याच्या गरजेवर भर द्या. त्याच वेळेस, आपल्या बांधवांच्या विचारांची आणि भावनांची कदर करून त्यांना उत्तेजन देणे व त्यांची उभारणी करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

गीत १०९ (२) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १०० (२६)

१५ मि: स्थानिक घोषणा. “आपली माहितीपत्रके अभ्यासणे,” ही पेटी विचारात घ्या. सर्वांना, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची उत्तम तयारी करण्याचे व नियमितपणे उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन द्या. मे महिन्यात जे लोक सहायक पायनियरींग करतील त्यांची नावे घोषित करा. क्षेत्र सेवेच्या सभांसाठी स्थानिकरित्या केल्या जात असलेल्या अतिरिक्‍त व्यवस्था सांगा. अलीकडील नियतकालिकांच्या प्रस्तुती तयार करण्यासाठी काही उपयुक्‍त सूचना द्या.—पाहा ऑक्टोबर १९९६, आमची राज्य सेवा, पृष्ठ ८.

१५ मि: ख्रिस्ती मेंढपाळ तुमची सेवा कशी करतात. मार्च १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २४-७ वर आधारित वडिलांचे भाषण.

१५ मि: वारंवार उरकलेल्या क्षेत्रात प्रचार करताना सकारात्मक मनोवृत्ती बाळगा. वारंवार उरकलेल्या क्षेत्रातील नगण्य प्रतिसादामुळे निरुत्साहित झालेल्या दोन किंवा तीन प्रचारकांसोबत वडील या गरजेची चर्चा करतात. जुलै १५, १९८८, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे १६-१९, परिच्छेद ४-१४ ची, वडील त्यांच्यासोबत उजळणी करतात. स्थानिकरित्या या सूचनांचा अवलंब करण्याच्या मार्गांची ते सकारात्मक चर्चा करतात.

गीत १९१ (२१) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा