१९९८ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला
प्रशाला, “ही एखाद्या विशिष्ट प्रकारचे ज्ञान किंवा प्रविणता यांचे शिक्षण देण्यासाठी असते.” ईश्वरशासित सेवा प्रशालेत आपल्याला सातत्याने देवाच्या ज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, या प्रशालेत सहभाग घेतल्याने आपली बोलण्याची आणि शिकविण्याची कौशल्ये धारदार करण्यासही आपल्याला मदत मिळते. १९९८ चा प्रशाला कार्यक्रम, अधिक आध्यात्मिक प्रगती करण्याच्या अनेक संधी आपल्याला पुरवील.
पुढील वर्षाच्या प्रशाला आराखड्याचे परीक्षण केल्यावर तुमच्या निदर्शनास येईल, की वर्षाच्या पूर्वार्धात नेमणूक क्र. ३, ज्ञान पुस्तकावर आधारित असेल. याशिवाय, १९९८ च्या अभ्यासक्रमात कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाचाही समावेश करण्यात आला असून नेमणूक क्र. ३ आणि क्र. ४ मध्ये ते क्रमाक्रमाने पूर्ण केले जाईल. जेव्हा नेमणूक क्र. ४ कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकावर आधारित असेल, तेव्हा ती एखाद्या बांधवाकडून मंडळीला भाषणाच्या रूपात सादर केले जाईल. आणि आठवण करून दिली जात आहे, की प्रशाला कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तीने नियुक्त वेळेतच आपला भाग उरकावा.
एक नवीन वैशिष्ट्य: आपल्या वैयक्तिक लाभाकरता, प्रत्येक सप्ताहासाठी नेमलेल्या गीत क्रमांकानंतर कंसामध्ये एक “अतिरिक्त बायबल-वाचन आराखडा” देखील दिलेला आहे. साप्ताहिक प्रशाला कार्यक्रमातील कोणतेही भाग या आराखड्यावर आधारित नसले तरी त्याचे अनुसरण करण्याचे ध्येय राखा. यामुळे, तुम्ही जर आतापर्यंत दररोज बायबल वाचन करत नसला तर तसे करण्याची एक सवय तुम्हाला स्वतःस लावता यईल.
नेमणुकी, सल्ला आणि लेखी उजळणी यांच्यावरील अधिक माहितीकरता कृपया, “१९९८ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा पर्यायी आराखडा” यात दिलेल्या सूचना तसेच ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ३ देखील काळजीपूर्वक वाचा.
तुम्ही अद्याप ईश्वरशासित सेवा प्रशालेत आपले नाव नोंदविले नसले, तर तसे करण्यास आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. ही अद्वितीय प्रशाला, यहोवाच्या नम्र व एकनिष्ठ सेवकांना त्याचे सेवक या नात्याने अधिक कार्यक्षम होण्यासाठी प्रशिक्षित करण्यात एक मोलाचा हातभार लावते.—१ तीम. ४:१३-१६.