घोषणा
◼ साहित्य सादरता सप्टेंबर: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आहे ९०.०० रुपये. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी उपलब्ध नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात. वर्गण्या प्राप्त करताना आठवणीत ठेवा की, पंजाबी आणि उर्दू वगळता (ज्यांमध्ये ते मासिक आहे), टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळी भाषेत, दर पंधरवड्याला प्रकाशित होते. सावध राहा! हे मल्याळम व तामीळ या भाषांत पाक्षिक आहे पण कन्नड, गुजराती, तेलगू, नेपाळी, मराठी व हिंदी या भाषांत ते मासिक आहे. उर्दू व पंजाबी भाषेत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या दोन भाषांत वर्गण्या उपलब्ध नाहीत. महिन्याच्या उत्तरार्धात राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण केले जाईल. नोव्हेंबर: राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण चालू राहील. प्रत्येक घरातील अथवा निवासातील घरमालकाला राज्य वार्ता क्र. ३५ देऊन ज्या मंडळ्या आपले क्षेत्र उरकतात ते आता ज्ञान पुस्तक, २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर करू शकतात. डिसेंबर: पुढील तीन पुस्तकांपैकी कोणतेही ४५.०० रुपयांच्या अनुदानात: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, (लहान आकाराचे २५.०० रुपयांना), बायबल कथांचं माझं पुस्तक, (इंग्रजी, लहान आकाराचे ३०.०० रुपयांना), सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्याय म्हणून, जुलैची आमची राज्य सेवा यात खास दरांच्या पुस्तकांच्या यादीतली कोणतीही पुस्तके २.५० रुपयांना सादर केली जाऊ शकतात. सूचना: वर उल्लेखिलेल्या कोणत्याही सादरतांच्या मोहिमेची मागणी ज्या मंडळ्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) वर मागणी पाठवावी.
◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, सप्टेंबर १ रोजी अथवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीत त्याची घोषणा करा.
◼ पुनःस्वीकार केला जावा अशी इच्छा दाखवलेल्या कोणाही बहिष्कृत अथवा अलिप्त केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत फेब्रुवारी १, १९९२, टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-९ वर दिलेल्या सुचना अनुसरण्याची वडिलांना आठवण करून दिली जात आहे.
◼ रविवार, ऑगस्ट ३१ रोजी सर्व प्रचारकांनी ऑगस्ट महिन्याचा आपला क्षेत्र सेवेचा अहवाल द्यावा असे उत्तेजन देण्यात येते. मंडळीच्या सचिवांनी मंडळीचा अहवाल (S-1) तयार करून बुधवार, सप्टेंबर ३ या शेवटल्या तारखेआधी तो पोस्ट करावा अशीही विनंती करण्यात येते, ज्यामुळे वार्षिक अहवालाचे वेळेवर संकलन करणे आम्हाला शक्य होईल.
◼ संस्था, प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची मासिक साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी प्रत्येक महिन्याला एक घोषणा करण्याची योजना करावी; यामुळे, वैयक्तिक साहित्य प्राप्त करू इच्छिणारे सर्वजण साहित्य हाताळणाऱ्या बांधवास त्याबद्दलची माहिती देऊ शकतील. कोणती प्रकाशने, खास मागणीची आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ साहित्याची मागणी करताना, मंडळ्यांनी लक्षात ठेवावे, की संस्थेचे सीडी-रॉम यात अशी काही विशिष्ट माहिती आहे जी सर्वसामान्य जनतेसाठी पुरवलेली नाही, त्यामुळे ते केवळ प्रचारकांच्या वापरासाठी आहेत.
◼ मे १९९७ ची आमची राज्य सेवा यात दिलेल्या ‘प्रश्न पेटीत’ अशी शिफारस केली होती, की सेवेत विरुद्धलिंगी प्रचारकांसोबत कार्य करताना आपण सावध असले पाहिजे. या संदर्भात उत्तम निर्णयशक्तीचा उपयोग करण्याकरता आपणा सर्वांजवळ सबळ कारणे आहेत. मात्र याचा अर्थ, प्रवासी पर्यवेक्षक वा इतर बांधवांनीही क्षेत्र सेवेत बहिणींसोबत कार्य करू नये असा होत नाही. या उलट, असा विचार अभिव्यक्त करण्यात आला होता, की एखाद्या बांधवाने त्याच त्या विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत अर्थात जिच्याशी त्याचे नाते नाही अशासोबत नियमितपणे वेळ घालवू नये.
◼ तुम्हाला हे जाणून आनंद वाटेल, की मे २२ रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरास हादरून टाकणाऱ्या जबरदस्त भूमिकंपात मंडळीतल्या १९ प्रचारकांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या घरालगतचा फ्लॅट्सचा ब्लॉक जमीनदोस्त झाला पण त्यांच्या घराच्या भिंतीला केवळ एक भेग पडली व जिना तुटला, परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. अनेक धार्मिक इमारती कोलमडून पडल्या; यात एका भव्य चर्चच्या इमारतीचे सपशेल दोन भाग झाले पण साक्षीदारांची सभास्थाने मात्र सुस्थितीत राहिली. याबाबतीत तुम्ही केलेल्या चौकशींची आम्ही प्रशंसा करतो कारण यांवरून, आपल्या विश्वबंधुत्त्वातील सदस्यांसाठी असलेले तुमचे बंधुप्रेम व चिंता प्रकट होते ज्यांच्याशी कदाचित तुमची केव्हाही भेट झाली नसेल.
◼ पणजी, गोवा येथील प्रांतीय अधिवेशन आता नोव्हेंबर २१-२३, १९९७ या तारखेस फेरनियोजित केले गेले आहे.
◼ या वर्षी केरळमध्ये तीन अधिवेशने होणार असल्यामुळे प्रत्येकासाठी नियुक्त केलेले विभाग खाली दाखवले आहेत:
कट्टापना (डिसें. १२-१४): हाय रेंजेसमधील केई-५ व केई-७ विभागांतल्या सर्व मंडळ्या.
अर्नाकुलम (डिसें. २६-२८): केई-३, केई-४, केई-६ आणि केई-८ विभागांतल्या तसेच केई-७ विभागांतल्या सर्व मंडळ्या ज्या हाय रेंजेसमधल्या नाहीत.
कोझीकोड (जाने. २-४, १९९८): केई-१ आणि केई-२ विभागांतील सर्व मंडळ्या.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
बायबल कथांचं माझं पुस्तक (लहान आकाराचे) —तेलगू
◼ साठ्यात नसलेली प्रकाशने:
खरी शांती आणि सुरक्षितता—कोणत्या उगमाकडून? —तामीळ
मानव येथे उत्क्रांतीने आला की निर्मितीने? —इंग्रजी