“आमच्यासाठी कोण जाईल?”
यहोवाने हा प्रश्न विचारताच यशयाने तत्परतेने उत्तर दिले: “हा मी आहे! मला पाठीव.” (यश. ६:८) आज, मोठी कापणी असल्यामुळे तीच हाक आता सुनावली जात आहे. अधिक पूर्ण-वेळ कामगारांची—नियमित पायनियरांची—नितान्त गरज आहे! (मत्त. ९:३७) तुम्ही स्वयंसेवक होण्यास तयार आहात का? असाल तर, १९९८ सेवा वर्षाची सुरूवात अर्थात सप्टेंबर १ ही तारीख पायनियर म्हणून नाव नोंदवण्याची उत्तम वेळ असेल. वडिलांकडून एखादा अर्ज का मागून घेऊ नये?