नवीन माहितीपत्रक आणि त्याची कॅसेट उपयोगात आणून इतरांना देवाच्या अपेक्षा शिकून घेण्यास मदत करा
“ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनादरम्यान, देवाच्या अपेक्षा शिकवण्यास इतरांना मदत करणे यावर जोर देण्यात आला होता. देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचे प्रकाशन झाल्यावर, त्याद्वारे बायबल अभ्यास चालवून इतरांना देवाची सेवा करण्याच्या महत्त्वपूर्ण अपेक्षा शिकून त्यांची मदत करण्यासाठी या माहितीपत्रकाचा उपयोग कसा करता येईल हे एका भाषणात सांगण्यात आले. या माहितीपत्रकात दोन पानाचे १३ पाठ आहेत आणि एका पानाचे तीन पाठ आहेत जे घरमालकाला तुलनात्मकरित्या अल्पावधीत देवाला संतुष्ट करण्याच्या अत्यावश्यक अपेक्षांची समज प्राप्त करण्यास मदत करतात. त्या भाषणाने आणि त्याच्या प्रात्यक्षिकाने, या प्रकाशनाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करणे किती सोपे असू शकते हे दाखवले.
२ मग प्रश्न विचारण्यात आला: “एखाद्या आस्थेवाईक व्यक्तीला वाचता येत नसल्यास काय?” या क्षणी, “संस्था, हे नवीन माहितीपत्रक ऑडियो कॅसेटवर उपलब्ध करून देत आहे हे तुम्हाला सांगण्यास आम्हाला आनंद होतो,” अशी घोषणा करून एक ऑडियो कॅसेट प्रकाशित करण्यात आली. ही कॅसेट आता दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे; तर मग चित्रांनी भरलेले हे माहितीपत्रक आणि त्याच्या ऑडियो कॅसेटच्या मदतीने निरक्षर असलेल्या आस्थेवाईकांसोबत आपल्याला अभ्यास सुरू करता आले पाहिजेत. (१ तीम. २:३, ४) शिवाय, अद्याप उत्तम वाचता न येणाऱ्या लहान मुलांसोबत अभ्यास चालवण्यासाठीही या माहितीपत्रकाचा आणि कॅसेटचा उपयोग केला जाऊ शकतो. हे प्रभावकारकपणे कसे करता येईल?
३ आता एक प्रचारक घरमालकाच्या घरी पुनर्भेट द्यायला आला आहे असे समजू या. टेप रेकॉर्डर आणि अपेक्षा माहितीपत्रकाची स्थानिक भाषेतील ऑडियो कॅसेट यांचा उपयोग करून निरक्षर असलेल्या घरमालकाला देवाच्या अपेक्षा काय आहेत ते शिकवण्यासाठी, अभ्यास चालवण्याकरता कॅसेटचा आणि अपेक्षा माहितीपत्रकाचा कसा उपयोग केला जाणार आहे त्याचे प्रात्यक्षिक दाखवतो.
४ प्रथम टेप रेकॉर्डर सुरू करा. घरमालक टेप ऐकत असताना, आपण पहिल्या पाठाच्या पहिल्या परिच्छेदात येतो जेथे देवाकडील सर्वात मोठे बक्षीस म्हणजे बायबल आहे असे म्हटले आहे. टेप रेकॉर्डर बंद करा आणि तिसऱ्या पानावरचे चित्र घरमालकाला दाखवा; त्या चित्रात प्राचीन हस्तलिखितांमधून बायबलची नकल केल्याचे कसे दाखवले आहे आणि या नकला किती मुश्किलीने केल्या जात त्यावर काही स्पष्टीकरण द्या. पुढच्या पाठात गेल्यावर, परिच्छेद सहा दाखवून देतो की, देवाने केलेल्या निर्मितीवरून आणि त्याच्या वचनावरून आपण त्याला जाणून घेऊ शकतो. मग पुन्हा, टेप रेकॉर्डर थांबवून चार आणि पाच पानांवरील रमणीय चित्रांकडे घरमालकाचे लक्ष वेधा आणि त्याला त्यावर काही टिपणी करायला सांगा व यहोवाच्या सर्जनशील क्षमतेवर जोर द्या. परिच्छेद सहावर असतानाच, उघडलेले बायबल एका स्टँडवर असल्याचे चित्र दाखवा. अशाप्रकारे, देवाच्या सर्जनशील हस्तकृत्यांद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे देव आहे हे आपण जाणू शकतो हे घरमालकाच्या मनावर बिंबवा. इतर पाठांसाठी हीच पद्धत वापरा.
५ जेथे कोठे आवश्यकता असते तेथे, चित्रांकडे लक्ष वेधण्यासाठी टेप रेकॉर्डर थांबवण्याविषयी दक्ष असा. प्रत्येक पाठानंतर, पुन्हा एकदा उजळणी प्रश्ने विचारा (टेप रेकॉर्डर बंद ठेवून) आणि घरमालकाला आपल्या स्वतःच्या शब्दांत त्यावर विवेचन करू द्या. विद्यार्थी किती वेळ एकाग्र होऊ शकतो आणि त्याच्या क्षमता यांनुसार एका अभ्यासात निदान एक अध्याय तरी पूर्ण करता आला पाहिजे. घाईघाईने अभ्यास पूर्ण करू नका. विद्यार्थ्याच्या अंतःकरणात यहोवाविषयी कदर निर्माण व्हायला मदत मिळावी हा मुख्य हेतू आहे. माहितीपत्रकातील मूलभूत गोष्टी घरमालकाच्या लक्षात एकदा बसल्या की मग ज्ञान पुस्तकातून अभ्यास घेऊ लागा.
६ तुम्ही अभ्यास सुरू करता तेव्हाच घरमालकाला स्थानिक राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहण्यास आमंत्रण द्या. प्रत्येक आठवडी त्याला जाहीर भाषणाचा विषय काय तो सांगा आणि विद्यार्थ्याने आधी आस्था दाखवली आहे अशा एखाद्या विषयावर जाहीर भाषण असेल तेव्हा त्याने उपस्थित राहावे म्हणून त्याला खास उत्तेजन द्या. तो उपस्थित राहतो तेव्हा सभेतील इतरांशी त्याची ओळख करून द्या. अशा तऱ्हेने तुम्ही हळूहळू विद्यार्थ्याला संघटनेशी साहचर्य ठेवण्यास मदत देऊ शकाल. तो काही सभांना उपस्थित राहिल्यावर, त्याच्या मनातली कोणतीही भीती घालवून द्यायला आणि त्याच्या स्वतःच्या शब्दांमध्ये संक्षिप्त विवेचने द्यायला त्याला मदत करा. यामुळे, जे काही चालले आहे त्यात आपलाही भाग आहे असे त्याला वाटेल.
७ विद्यार्थ्याची प्रगती होते तसे, माहितीपत्रकातून आणि कॅसेटमधून किंवा ज्ञान पुस्तकातून त्याला जे मौल्यवान मुद्दे शिकायला मिळतात त्यांविषयी इतरांना सांगायला त्याला प्रोत्साहन द्या. कालांतराने, सेवाकार्यात आपल्यासोबत येण्याच्या आवश्यकतेची चर्चा त्याच्यासोबत करा आणि बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनण्याच्या सुहक्कासाठी त्याची तयारी करा. सरतेशेवटी, ही पावले त्याला समर्पण आणि बाप्तिस्म्याकरता पात्र ठरवण्यास मदत करतील.
८ मेहनती आणि समंजस शिक्षकाप्रमाणे, विद्यार्थ्याला यहोवा आणि त्या संघटनेबद्दल किती प्रेम आहे हे तुम्ही ठरवू शकाल. लक्षात ठेवा, अपेक्षा माहितीपत्रक आणि त्याची कॅसेट ही मर्यादित क्षमता असलेल्यांकरता दोन साधने आहेत. अशांना, देवाच्या नवीन जगात सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास मदत देण्यासाठी या साधनांचा उत्तम वापर करा.