वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९७ पृ. ८
  • देव काय अपेक्षितो ते इतरांना शिकवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव काय अपेक्षितो ते इतरांना शिकवा
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • वाढ होण्यासाठी यहोवावर विसंबून राहा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ४/९७ पृ. ८

देव काय अपेक्षितो ते इतरांना शिकवा

१ ‘यहोवाची वचने ऐकण्यापासून’ आध्यात्मिकरित्या वंचित असलेले अनेक लोक अद्यापही पाहायला मिळतात. (आमो. ८:११) काहीजण, देव अस्तित्वात आहे असा विश्‍वास बाळगत असले तरी त्याचा उद्देश व त्याच्या अपेक्षांसंबंधी मात्र ते अज्ञातच असतात. यास्तव, त्यांना राज्याचे प्राणरक्षक सत्य शिकवण्याची आपल्याला गरज आहे. साक्ष देण्यासाठी प्रत्येक प्रसंगी सुसज्जित व तयार असल्याने, यहोवा काय अपेक्षितो हे जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्‍या लोकांना आपण शोधून काढू शकतो.

२ एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान, वितरणासाठी तसेच वर्गण्या सादर करताना उपयोगात आणण्यासाठी आपल्याजवळ टेहळणी बुरूज व सावध राहा! या नियतकालिकांचे अगदी प्रसंगोचित अंक असतील. याबरोबरच, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक आपण पहिल्यांदाच सादर करणार आहोत. त्याची आकर्षक चित्रे व विचार-प्रवर्तक प्रश्‍न, या माहितीपत्रकास एक व्यापक महती प्रदान करतात. आपली सर्वोत्कृष्ट प्रकाशने प्रभावशालीरित्या उपयोगात आणण्याकरता पुढील सूचना सादर करण्यात आल्या आहेत.

३ लोकांना शोधून काढणे: ज्या क्षेत्रांत आपण घरोघर जाऊन लोकांना भेटतो तेव्हा अधिकतर लोक घरी भेटत नाहीत अशावेळी लोकांना शोधून काढणे व जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांच्याशी बोलणे फायदेकारक असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर १९९६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत आपल्याला सर्वत्र—रस्त्यावर, सार्वजनिक परिवहनात तसेच उद्यानात, वाहन तळांवर व व्यापारी क्षेत्रांत सुवार्तेचा प्रचार करण्याचे प्रोत्साहन दिले होते. त्यात, अनौपचारिकरित्या प्रचार करण्यासाठी संधी निर्माण करण्याच्या गरजेचीही आपल्याला जाणीव करून दिली होती. याचेच एक उदाहरण एका पायनियर बहिणीचे आहे; तिने, “धोक्यात असलेली प्राणीजात—चिंतेचा विषय का?” ही शृंखला असलेल्या ऑगस्ट ८, १९९६, सावध राहा! (इंग्रजी) या नियतकालिकांचा भरपूर साठा सोबत घेऊन, प्राणी संग्रहालयास भेट दिली. याचे महत्त्व ओळखणाऱ्‍या पशू-प्रेमींमध्ये, तिने केवळ तासाभरातच ४० प्रतींचे वाटप केले! अशाप्रकारे सुवार्तेचा प्रचार सर्वत्र केल्याने तुम्हाला कितपत यश मिळाले आहे? टेहळणी बुरूज व सावध राहा! तसेच अपेक्षा माहितीपत्रक यांमध्ये, लोकांच्या जीवनांवर परिणाम करणारी तसेच वैचारिक क्षमता उद्दीपित करणारी माहिती असल्यामुळे साक्ष देण्याच्या सर्व प्रकारांकरता ते विशेषतः यथोचित आहे.

४ संभाषण सुरू करणे: टेहळणी बुरूज व सावध राहा! यांसाठी तुमची स्वतःची प्रस्तुती कशी तयार करावी याबद्दल ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा याच्या मागील पृष्ठावर काही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अपेक्षा माहितीपत्रकासाठी आपली प्रस्तुती तयार करण्याकरता याच सूचना प्रभावकारी ठरतील. आपले बोलणे काही मोजकेच शब्द वापरून संक्षिप्त स्वरूपाचे असू शकते, अथवा एक शास्त्रवचनीय विचार समाविष्ट करण्याइतपतही असू शकते. सुरवातीचे शब्द वापरण्यासंबंधी एक विचारपूर्वक निवड करणे महत्त्वाचे आहे कारण हेच शब्द दाखवून देतील की तुम्ही ज्या व्यक्‍तीशी बोलणार आहात ती तुमचे पुढचे बोलणेही ऐकून घेईल किंवा नाही. काहींना, सुरवातीला हे विवेचन वापरून यश मिळाले आहे: “मी एक लेख वाचला आणि मला तो खूप उत्तेजन देणारा वाटला; मला तो तुम्हालाही दाखवावासा वाटतो.” किंवा दुसऱ्‍या व्यक्‍तीस संभाषणात गोवून घेण्यासाठी त्याची आस्था जागृत करणारा एखादा प्रश्‍न विचारा.

५ तुमच्या क्षेत्रात उचित असल्यास या महिन्यात कदाचित पुढील प्रश्‍नासारखे काही प्रश्‍न तुम्ही विचारू शकता:

▪ “आज पाहावं तिथं आपल्याला भितींवरील लिखाणं, केरकचरा आणि प्रदूषणच पाहायला मिळतं. तुम्हाला काय वाटतं, पृथ्वीवरून ह्‍या गोष्टी काढून टाकून, पृथ्वी ही राहण्यासाठी स्वच्छ व अगदी योग्य करण्यासाठी कशाची गरज आहे?” प्रतिसादासाठी वाव द्या; आणि मग, पृथ्वी कशी व केव्हा एक जगव्याप्त बाग होईल याची खात्री देणारी माहिती तुमच्याजवळ असल्याचे स्पष्टीकरण द्या. एखादे विशिष्ट विवेचन, एखादे संक्षिप्त शास्त्रवचन आणि चालू नियतकालिकांतील एखादे उठावदार चित्र दाखवून ते नियतकालिक नियमितरित्या कसे मागवले जाऊ शकते याविषयी त्यांना स्पष्टीकरण द्या. वर्गणी नाकारली गेली असल्यास नियतकालिकांच्या काही किरकोळ प्रती सादर करण्याचे मात्र विसरू नका. संभाषण संपवण्याआधी, ते पुढच्या एखाद्या वेळी जारी ठेवण्याच्या उद्देशाने काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करा.

▪ “तुमचा काय विचार आहे, आज आपण ज्या अनेक समस्यांना तोंड देत आहोत त्या समस्यांनी आपलं जीवन वेढलेलं असावं अशी देवाची इच्छा होती का?” व्यक्‍तीने उत्तर दिल्यानंतर, तुम्ही कदाचित म्हणू शकता: “येशूनं आपल्या अनुयायांना शिकवलेली प्रार्थना कदाचित तुमच्या ऐकण्यात आली असावी; त्यामध्ये तो, देवाचं राज्य यावं अशी प्रार्थना करतो. ते देवाचे राज्य काय आहे हे जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल का?” अपेक्षा माहितीपत्रकात पाठ ६ उघडा आणि धड्याच्या सुरवातीला दिलेले प्रश्‍न वाचा. मग तुम्ही परिच्छेद १ वाचत असताना पहिल्या प्रश्‍नाच्या उत्तराकडे लक्ष वेधा. बाकीच्या प्रश्‍नांचीही अशीच त्रोटक उत्तरे दिलेली आहेत याचे स्पष्टीकरण द्या. माहितीपत्रक सादर करा आणि राज्यासंबंधीच्या अतिरिक्‍त माहितीसह त्यांची पुन्हा भेट घेण्याचा प्रस्ताव मांडा.

▪ “अनेक विचारशील लोक, जगाचे धर्म मानवाच्या समस्यांना तोडगा आहेत असा विचार करण्याऐवजी त्यांचे मूळ कारणच आहे असा दृष्टिकोन बाळगू लागले आहेत. यांविषयी तुमचा काय विचार आहे?” त्या व्यक्‍तीचे मत ऐकल्यानंतर चालू नियतकालिकांतून असे काहीतरी दाखवा जे, खोट्या धर्मांच्या अपयशाबद्दल अथवा लवकरच होणाऱ्‍या त्यांच्या अधःपाताबद्दल व्यक्‍तीचे लक्ष वेधून घेईल. वर्गणी सादर करा. एकमेकांना आपला नावपत्ता द्या आणि खऱ्‍या धर्माने कशाप्रकारे मानवजातीची निराशा केलेली नाही याच्या स्पष्टीकरणासाठी तिच्याशी पुन्हा संपर्क राखण्याचा प्रस्ताव मांडा.

▪ “आज आपण पाहतो की, कौटुंबिक जीवन अनेक समस्यांनी ग्रस्त आहे; पण कौटुंबिक आनंद प्राप्त करण्याचे रहस्य काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला का?” प्रतिसादाकरता थांबा आणि स्पष्टीकरण द्या की, कौटुंबिक सौख्यानंदाचे खरे रहस्य देव बायबलमध्ये विदित करतो. कदाचित, तुम्ही यशया ४८:१७ वाचू शकता. मग, अपेक्षा माहितीपत्रकात पाठ ८ उघडा आणि कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी विश्‍वासार्ह मार्गदर्शन पुरवणारी उद्धृत केलेली काही बायबलची वचने निदर्शनास आणा. धड्याच्या सुरवातीला दिलेली प्रश्‍नावळी वाचा. त्या व्यक्‍तीला यांची उत्तरे वाचण्यास आवडेल का, याविषयी विचारणा करा. त्या व्यक्‍तीस माहितीपत्रक सादर करा आणि आनंदी कौटुंबिक जीवनाकरता बायबलमध्ये असणाऱ्‍या व्यावहारिक मार्गदर्शनासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी दुसऱ्‍या एखाद्या वेळी पुन्हा येण्याचा प्रस्ताव मांडा.

६ मार्च १९९७ ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीत, पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटण्याचे आपल्याला उत्तेजन दिले होते. त्यात, पहिल्या भेटीत शक्य नसले तर पुनर्भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग करण्याची शिफारस करण्यात आली होती. मानवाची सर्वात मोठी गरज म्हणजे, देव काय अपेक्षितो हे जाणून त्याप्रमाणे करणे हे होय. (कलस्सै. १:९, १०) जीवनासंबंधी आपल्याला माहीत असलेल्या देवाच्या अपेक्षा काय आहेत हे एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान इतरांना शिकवण्यास सुरवात करून आपण त्यांना पुष्कळ मदत करू या.—१ करिंथ. ९:२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा