भोळ्यांस समज प्राप्त करण्यास मदत करा
१ शिष्य बनविण्याच्या कार्यामार्फत आपण इतरांना, त्यांच्यासंबंधी असणाऱ्या देवाच्या अपेक्षांबद्दल शिकवतो. (मत्त. २८:१९, २०) असे करण्यासाठी, जगभरातील ५० लाखांपेक्षा अधिक साक्षीदार आटोकाट प्रयत्न करत आहेत. किती तास खर्च केले, किती साहित्यांचे वाटप केले अथवा किती बायबल अभ्यास सुरू केले यांच्या आधारावर यशाचे मोजमाप केले जात नाही. ज्यावेळी लोक समज प्राप्त करतात व शिकवलेल्या गोष्टी कृतीत आणतात, तेव्हा कोठे आपण आपले ध्येय साध्य करतो.
२ इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करण्यात, ‘भोळ्यांना समज देणे’ हे अंतर्भूत आहे. (स्तोत्र ११९:१३०) लोकांना ‘समज प्राप्त’ होते तेव्हाच ते त्यांच्या अंतःकरणाला भिडते व ते प्रवृत्त होतात. (मत्त. १५:१०) जसजसे आपले कार्य विस्तारते व जोरदार बनते तसतसे अधिकाधिक सोप्या पद्धतीने बोलण्याची व शिकवण्याची गरज आहे अशी आपल्याला जाणीव होते. याकरताच, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक संस्थेने प्रकाशित केले आहे. त्यात बायबलच्या मूलभूत शिकवणुकी समाविष्ट करणारा एक बहुव्यापक अभ्यासक्रम आहे. त्यातील धडे लहान, शब्द साधेसोपे आणि सूचना तर सहज आकलनीय असल्यामुळे ह्या माहितीपत्रकाला एक व्यापक महती मिळत आहे.
३ एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान हे माहितीपत्रक, वर्गण्यांसह सादर केले जाऊ शकते. गतकाळात ज्या लोकांनी साहित्य स्वीकारले आहे अशांसाठी हे माहितीपत्रक घेऊन जा. लक्षात असू द्या, की मुलांना तसेच ज्या लोकांची भाषा तुम्ही अस्खलितपणे बोलू शकत नाही; अथवा ज्या लोकांची वाचन क्षमता मर्यादित आहे अशांना शिकवण्याकरता हे खासपणे उपयोगात आणले जाऊ शकते.
४ एक साधीसोपी प्रस्तावना वापरा: अपेक्षा माहितीपत्रक प्रस्तुत करताना, पृष्ठ २ उघडा जेथे स्पष्टीकरण दिले आहे की, “हे माहितीपत्रक बायबल अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आले आहे.” बायबलचा अभ्यास त्या व्यक्तीकरता का आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी पृष्ठ ३ वरील परिच्छेद ३ कडे लक्ष आकर्षित करा. बायबलची साधीसोपी सत्ये प्रकट करणाऱ्या काही धड्यांच्या शीर्षकांकडे लक्ष वेधून व्यक्तीची आस्था आणखी वाढवा. ह्या माहितीपत्रकाचा अभ्यास करण्यात किती मजा आहे याचे एक प्रात्यक्ष दाखवा व व्यक्तिगत मदत पुरवण्याचा प्रस्ताव मांडा.
५ प्रगतिशील अभ्यास संचालित करा: आपले ध्येय, निव्वळ अभ्यास संचालित करण्यापेक्षा अधिक आहे—आपल्याला असे शिष्य बनवायचे आहेत जे खऱ्या उपासनेचे निश्चयी समर्थक होतील. हे माहितीपत्रक केवळ काही सप्ताहांतच पूर्ण केले जाऊ शकते तसेच, शेवटी ज्ञान पुस्तकातून अभ्यास करण्यासही ते मदतगार ठरेल. (पृष्ठ ३१ वरील तळटीप पाहा.) अगदी सुरवातीपासूनच विद्यार्थ्याला यहोवाच्या संघटनेची ओळख प्राप्त करण्यास मदत करा. (युक्तिवाद पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे २८३-४ पाहा.) मंडळीच्या सभांच्या मूल्यावर भर द्या तसेच, त्यांना उपस्थित राहिल्याने खरी उपासना कृतीत कशी आणावी याविषयीची एक व्यापक समज प्राप्त होते याचे स्पष्टीकरण द्या.—इब्री. १०:२४, २५.
६ एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान या खास कार्यात पुरेपूर सहभाग घेतल्याने प्रांजळ लोकांस “सुज्ञता [समज] संपादन” करण्यास मदत करण्यातील आनंद आपल्याला निश्चित अर्थाने प्राप्त होईल.—नीति. ४:५.