एप्रिलसाठी सेवा सभा
एप्रिल ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १०० (६)
१२ मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा आणि साहित्य सादरता यांतील निवडक घोषणा. चालू अंकांतील बोलण्याजोग्या मुद्द्यांचा उल्लेख करा.
१५ मि:“समुदायांची भर पडत आहे.” प्रश्नोत्तरे. ऑगस्ट १, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे २०-२५ वर दिलेल्या मुख्य सूचनांची उजळणी करा.
१८ मि:“भोळ्यांस समज प्राप्त करण्यास मदत करा.” प्रश्नोत्तरे. अपेक्षा माहितीपत्रकाच्या वैशिष्ट्यांची उजळणी करा: सुलभ केलेली अभ्यास पद्धत, समयोचित प्रश्न, आकर्षक चित्रे, मुबलक शास्त्रवचनीय संदर्भ. सरतेशेवटी ज्ञान पुस्तकांतून अभ्यास करण्याकडे वाटचाल करणारे अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर जोर द्या. परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या रुपरेषेचा उपयोग करून अभ्यास कसा सुरू करावा हे दाखवणारे प्रात्यक्षिक एखाद्या कार्यक्षम प्रचारकाकडून करून घ्या. मंडळीतील सर्व पालकांना आपल्या लहान मुलांसोबत या माहितीपत्रकातून अभ्यास करण्याचे उत्तेजन द्या.
गीत १३० (२२) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १०७ (४)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. वेळ असल्यास, वर्गण्या मिळवल्याचे किंवा अपेक्षा माहितीपत्रक सादर केल्याचे अथवा त्याचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्यासंबंधीचे स्थानिक क्षेत्रातील अनुभव संक्षिप्तपणे कथित करा.
१५ मि:“आपल्या संघटनेकडे विद्यार्थ्यांना निर्देशित करणे.” (परिच्छेद १-६) प्रश्नोत्तरे. परिच्छेद ५-६ आणि उद्धृत शास्त्रवचने वाचा. यहोवाचे साक्षीदार—या नावामागील संघटना हा व्हिडिओ पाहून बायबल विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रतिक्रियेबद्दल स्थानिक अनुभव कथित करा.
२० मि:“देव काय अपेक्षितो ते इतरांना शिकवा.” परिच्छेद १-४ वर श्रोत्यांसोबत चर्चा. रस्त्यावर, घरामध्ये, व्यापारी क्षेत्रात आणि उद्यानात अशी चार विभिन्न दृश्ये वापरून परिच्छेद ५ मध्ये दिलेल्या प्रस्तुतीचे प्रात्यक्षिक दाखवा. आज, राज्य सभागृह सोडण्यापूर्वी सर्वांना क्षेत्र सेवेकरता माहितीपत्रके व नियतकालिके घेऊन जाण्याचे स्मरण करून द्या.
गीत १२६ (३) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ११३ (१२)
१५ मि:स्थानिक घोषणा. असे स्पष्टीकरण द्या, की मे महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी अर्ज देण्यास अद्यापही खूप उशीर झालेला नाही. प्रश्न पेटीची उजळणी करा आणि राज्य सभागृहातील ग्रंथालयासाठी विशिष्ट पुस्तके हवी आहेत का याविषयी मंडळीला जाणीव करून द्या.
१५ मि:“आपल्या संघटनेकडे विद्यार्थ्यांना निर्देशित करणे.” (परिच्छेद ७-१४) प्रश्नोत्तरे. सभांना उपस्थित राहण्यासंबंधी विद्यार्थ्याबरोबर मनमोकळी चर्चा कशी करावी हे दाखवणारे प्रात्यक्षिक एखाद्या कार्यक्षम शिक्षकाकडून करून घ्या.
१५ मि:आपल्या साहित्यांचा पुरेपूर उपयोग करणे. वडिलांचे भाषण. (पाहा जानेवारी १९९६ ची आमची राज्य सेवा, पृष्ठे ३-५.) अहवाल दाखवून देतात, की मंडळ्या दर महिन्याला प्रत्यक्ष वितरित करतात त्यांपेक्षा अधिक नियतकालिकांची बहुधा मागणी करतात. जवळजवळ ५० टक्क्यांचे वाटप झाले, असा अहवाल कधीच मिळत नाही. (स्थानीयरित्या आकडेवारी काय सूचित करते ते दाखवा.) मग ह्या नियतकालिकांचे काय होते? यांतील बहुतेक कपाटातच पडून राहतात अथवा शेवटी टाकून दिले जातात. हे कसे टाळता येईल? प्रत्येक प्रचारकाने आपल्या आवश्यकतेचा काळजीपूर्वक अंदाज बांधून, तो वाटप करू शकेल केवळ इतक्यांचीच मागणी करावी. आपण ज्यांच्या संपर्कात येतो अशा सगळ्यांना नियतकालिके सादर करण्याची एक सवय लावा. जुन्या अंकाचाही उपयोग करा. नियतकालिक सेवेत नियमितरित्या सहभाग घ्या.
गीत १२८ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १२१ (२१)
१५ मि:स्थानिक घोषणा. सर्वांना त्यांचा एप्रिल महिन्याचा अहवाल सादर करण्याचे स्मरण द्या. मे महिन्यात सहायक पायनियरींग करणाऱ्या सर्वांची नावे घोषित करा. क्षेत्र सेवेकरता सभांच्या स्थानिकरित्या केल्या जात असलेल्या अतिरिक्त व्यवस्थांची रुपरेषा सांगा. महिन्यातील प्रत्येक सुट्टीच्या संपूर्ण दिवसासाठी क्षेत्र सेवेची योजना आखली जाऊ शकते. मे महिन्यादरम्यान, अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने माहितीपत्रकांच्या वाटपांचा मागोवा घेण्यासाठी खास प्रयत्न केले जावेत. आपण अनौपचारिकरित्या ज्यांना साक्ष देतो अशांकडून व्यवहार कुशलतेने त्यांचे नाव आणि त्यांचा पत्ता प्राप्त करण्याच्या पद्धती संक्षिप्तपणे सुचवा. प्रथम तुम्ही आपले नाव आणि आपला पत्ता देऊ शकता, आणि मग त्यांच्याशी संपर्क साधण्याकरता त्यांचा फोन नंबर आहे का याची विचारणा करा. श्रोत्यांना प्रभावकारी वाटलेल्या सूचना सादर करण्यास त्यांना आमंत्रित करा.
१५ मि:“ते का करतात?” एक वडील दोनतीन नियमित पायनियरांसोबत लेखाची चर्चा करतात. (नसल्यास, जे वेळोवेळी सहायक पायनियरींग करतात अशांना घ्या.) जानेवारी १५, १९९४, टेहळणी बुरूज (इंग्रजी) यातील “पायनियर अर्पण करतात आणि आशीर्वाद प्राप्त करतात,” या लेखातील ठळक मुद्द्यांचा समावेश करा. त्याने अथवा तिने पायनियर सेवा का निवडली याचे प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्यास सांगा. असे केल्याने त्यांना कोणते आशीर्वाद प्राप्त झाले आहेत ते अनुभव कथन करण्यास त्यांना सांगा.
१५ मि:स्थानिक घोषणा. विशिष्ट स्थानिक गरजांसंबंधी माहिती सादर करण्यासाठी वडील या वेळेचा उपयोग करू शकतात.
गीत १२९ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.