ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर २ ते डिसेंबर २३, १९९६ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. प्रकटीकरण १३:१ येथे वर्णन केलेले, सात डोकी व दहा शिंगे असलेले ‘जंगली श्वापद’ दुसरे कोणीही नसून खुद्द दियाबल सैतान आहे. [uw-MR पृ. ६३ परि. ४]
२. मनुष्याला सकलपणे गिळंकृत करू शकेल असा “प्रचंड मत्स्य” निश्चितच हयात नाही. (योना १:१७) [si पृ. १५३ परि. ४]
३. लैंगिकतेसंबंधी असणारा बायबलचा दृष्टिकोन, अनेक वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या मानवांद्वारे देण्यात आला. [rs पृ. ३७० परि. १]
४. दानीएल ९:२४, २५ येथील भविष्यवाणी, येशूच्या जन्माकडे अंगुली निर्देशित करते. [kl-MR पृ. ३६ परि. ८]
५. एक परिपूर्ण मनुष्य चूक करण्यास अक्षम असेल. [rs पृ. ३७२ परि. १]
६. सैतान तेजस्वी देवदूताचे रूप धारण करू शकत असल्यामुळे पिशाच्चवादाच्या माध्यमांतून केलेल्या काही गोष्टी अल्पकालिक लाभाच्या दिसतात तेव्हा आपण मार्गभ्रष्ट होऊ नये. [rs पृ. ३८६ परि. ३]
७. होशेयाची भविष्यवाणी, यहुदाच्या द्वी-वंशीय राज्याकडे मुख्यतः निर्देशित करण्यात आली होती. [si पृ. १४४ परि. ८]
८. ज्यांना यहोवाशी सलोखा करायचा आहे व त्याचे संरक्षण हवे आहे अशांनी पिशाच्चवादाच्या सभांमध्ये सहभागी होण्याचे पूर्णपणे थांबवावे आणि प्रेषितांची कृत्ये १९:१९ येथे मांडण्यात आलेले उदाहरण अनुसरावे. [rs पृ. ३८९ परि. २]
९. सफन्या ३:९ यानुसार, नवीन जगात देवाचे लोक संयुक्त होतील कारण तेव्हा ते सर्व एकच भाषा—हिब्रू बोलतील. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८९ ६/१ पृ. ३०.]
१०. दानीएल १२:१ च्या पूर्णतेत, मीखाएल हा १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा झाला तेव्हापासून ‘उठला’ आहे; लवकरच तो अजिंक्य योद्धा राजा या नात्याने देवाच्या नामाने “उठेल” आणि या दुष्ट व्यवस्थीकरणावर नाश आणेल. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९३ ११/१ पृ. २३ परि. २३.]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. हाग्गय २:७ मध्ये उल्लेखिलेले “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” कोण आहेत आणि कोणत्या अर्थाने त्या ‘आत येतात’? [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८९ ६/१ पृ. ३१ परि. ५.]
१२. त्या तीन इब्रीयांचे कोणते शास्त्रवचनीय विधान प्रकट करते, की देवाप्रती असणारी त्यांची आज्ञाधारकता ईश्वरी संरक्षण व विमोचन यांवर अवलंबून नव्हती? (दानी. ३:१६-१८) [si पृ. १४१ परि. १९]
१३. कोणते शास्त्रवचन मशीहाचे जन्मस्थान भाकीत करते? [si पृ. १५६ परि. ६]
१४. येशूच्या नामात केलेली महत्कृत्ये देवाची पसंती व पाठबळ असल्याचा एक निश्चित पुरावा का असू शकणार नाही? [kl-MR पृ. ४६ परि. ६-७]
१५. जिवाबद्दल इब्री शास्त्रवचने जे काही सांगतात त्याचे १ करिंथकर १५:४५ (NW) कोणत्या प्रकारे समर्थन करते? [rs पृ. ३७६ परि. १]
१६. येशूने जेव्हा उच्च स्वराने ओरडून आपल्या पित्याला म्हटले “मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,” तेव्हा तो कशाबद्दल बोलत होता? (लूक २३:४६) [rs पृ. ३८३ परि. २]
१७. मानवात असणारी जीवनी शक्ती मृत्यूच्या वेळी निष्क्रिय होते हे सूचित करण्यासाठी स्तोत्र १४६:४ (NW) कोणती अभिव्यक्ती वापरते? [rs पृ. ३८५ परि. २]
१८. मानव खरोखरच मरत नाहीत ही कल्पना प्रथम कोणी मांडली आणि या खोट्या शिकवणुकींशी संबंधित असणारी मूळ लबाडी बायबलमध्ये कोठे आहे? [rs पृ. ३८५ परि. ५]
१९. हाग्गय २:९ मधील कोणते मंदिर “शेवटले” होते व कोणते ‘पहिले’ होते आणि ‘शेवटल्या मंदिराचे’ वैभव “पहिल्यापेक्षा” श्रेष्ठ का होते बरे? [साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८९ ६/१ पृ. ३०.]
२०. होशेय १४:२, इस्राएल लोकांना काय करण्यास आर्जवित होते आणि यहोवाचे साक्षीदार ह्या भविष्यवाणीची पूर्तता कशी करतात? (इब्री. १३:१५) [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९४ ९/१५ पृ. १० परि. १-२.]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. _________________________ शहराला, _________________________ याने देवाने दिलेले आपले कार्य तेथे पूर्ण केले त्याच्या सुमारे २०० वर्षांनंतर, _________________________ संदेष्ट्याद्वारे रक्तपाताची नगरी असे संबोधण्यात आले होते. [si पृ. १५४ परि. १०, पृ. १६० परि. १०]
२२. विश्वास व प्रीतीने ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणाने उत्प्रेरित होऊन आपण _________________________ देवाची भक्ती केली पाहिजे; त्याचप्रमाणे त्याच्या वचनाचा अभ्यास करून आपण _________________________ देखील त्याची भक्ती करण्यास हवी. [kl-MR पृ. ४५ परि. ४]
२३. आध्यात्मिकरित्या सुरक्षित राहण्याकरता देवापासून मिळालेली शस्त्रसामग्री, ज्यात ‘_________________________ ’ “_________________________ उरस्त्राण,” “शांतीच्या _________________________ लाभलेली सिद्धता,” ‘_________________________ मोठी ढाल,’ “_________________________ शिरस्त्राण” आणि “आत्म्याची _________________________ ” यांचा समावेश आहे, यांपैकी कोणताही भाग धारण करण्यात आपण हयगय करू नये. [uw-MR पृ. ६८, ६९ परि. १४]
२४. येशू हाच मशीहा असल्याचे शाबीत करणाऱ्या पुराव्यांचे तीन भाग म्हणजे (१) _________________________ , (२) _________________________ आणि (३) _________________________ , हे आहेत. [kl-MR पृ. ३४-८ परि. ६-१०]
२५. ओबद्याने भाकीत केले होते त्यानुसार, _________________________ मध्ये रोमी लोकांनी जेरुसलेमचा विध्वंस केल्यानंतर _________________________ इतिहासातून नामशेष झाले. [si पृ. १५२ परि. १२]
पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
२६. आमोस (८:११; ९:२, ३; ९:११, १२) याच्या आकलनामुळे पहिल्या शतकातील नियमन मंडळाला हे जाणण्यास मदत मिळाली, की गैर-इस्राएली लोकांना ख्रिस्ती मंडळीत एकत्र करणे ही देवाचीच मनसा होती. (प्रेषितांची कृत्ये १५:१३-१९) [si पृ. १५० परि. १६]
२७. जेव्हा (आमोस; योएल; हबक्कूक) याला यहोवाद्वारे पाचारण्यात आले तेव्हा तो एक संदेष्टा नव्हता अथवा संदेष्ट्याचा पुत्रही नव्हता परंतु एक गुराखी व झाडांवरील (खजुरांची; उंबरांची; जैतूनांची) निगा करणारा होता. [si पृ. १४८ परि. १]
२८. पवित्र आत्म्याची अचूक ओळख, आत्म्याचा उल्लेख करणाऱ्या (धार्मिक संकल्पना; ख्रिस्ती धर्मजगताचे संप्रदाय; सर्व शास्त्रवचने) यांशी सुसंगत असावयास हवी आणि त्यामुळे हा तर्कसंगत निष्कर्ष निघतो की पवित्र आत्मा (एक व्यक्ती; त्रैक्याचा भाग; देवाची कार्यकारी शक्ती) आहे. [rs पृ. ३८१ परि. १]
२९. योएल २:३२ हे (पेत्र; योहान; पौल) याने (प्रेषितांची कृत्ये २:४०; रोमकर १०:१३; १ तीमथ्य २:४) येथे उद्धृत केले होते जेथे तो यहोवाच्या नामाचा धावा करण्याच्या महत्त्वावर जोर देतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९६ ४/१ पृ. २० परि. १६.]
३०. आपण आपल्याकडे देवाचा पवित्र आत्मा असल्याचा पुरावा (धार्मिक उत्कटतेचा उमाळा करून; विचित्र अंगविक्षेप करून व लोळून; आवेशाने साक्षकार्य करून) व आत्म्याची (पाच; सात; नऊ) फळे प्रदर्शित करून दाखवत असतो. [rs पृ. ३८१ परि. ५-पृ. ३८२ परि. १]
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा: अनु. १८:१०-१२; होशे. १०:१२; सफ. २:३; याको. १:२६, २७, १ योहा. ३:४, ८
३१. आपली भक्ती देवास स्वीकारयोग्य असण्याकरता ती जगिक चालीरितींपासून केवळ निर्मळच असू नये तर देवास साधार वाटणाऱ्या सर्व गोष्टींचा देखील तिच्यात सामावेश असावा. [kl-MR पृ. ५१ परि. २०]
३२. आपल्या जीवनांत उचित ते करून आपण यहोवाच्या प्रेमळ दयेचा उपभोग घेऊ. [साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९६ ३/१५ पृ. २३ परि. २-३.]
३३. सर्व प्रकारचे भविष्यकथन, अशुद्ध आत्म्यांबरोबर संचारण करण्याचे अथवा त्यांना वश होण्याचे एक आमंत्रणच आहे; आणि अशाप्रकारच्या गोष्टींत गुंतणे म्हणजे यहोवाशी ढोबळ बेईमानी केल्यासारखे असेल. [rs पृ. ३८७ परि. ४]
३४. जे बुद्धिपुरस्सर पापाचा मार्ग निवडतात व तसे करण्याची सवय लावून घेतात असे लोक यहोवाच्या नजरेत गुन्हेगार आहेत. [rs पृ. ३७४ परि. २]
३५. आपण यहोवाची दया गृहित धरू शकत नाही. [si पृ. १६५ परि. ११]