घोषणा
डिसेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकारातील पुस्तक ४५.०० रुपयांना). आळीपाळीने, बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) किंवा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.
जानेवारी: १९२ पृष्ठांच्या जुन्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी १०.०० रुपयांच्या अनुदानात. या वर्गातील खालील पुस्तके आमच्याजवळ अद्यापही उपलब्ध आहेत: इंग्रजी: मानव उत्क्रांतीने आला की निर्मितीने? आणि सद्य जीवन एवढेच सर्व काही आहे का?; कन्नड: ‘ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा गोष्टी,’ “तुझे राज्य येवो;” आणि गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो,” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामीळ आणि हिंदी: “तुझे राज्य येवो;” तेलगू: सद्य जीवन एवढेच सर्व काही आहे का?; मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका;. बंगाली किंवा नेपाळी वाचकांसाठी ३२ पानांचे कोणतेही माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत हवे असणाऱ्या लोकांसाठी तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते आणि पंजाबी वाचकांसाठी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांसाठी सादर केले जाऊ शकते. कृपया नोंद घ्या की, ही शेवटली दोन पुस्तके खास दरात सादर केली जाऊ नयेत.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना) किंवा तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. पंजाबी वाचकांना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते. पर्याय म्हणून, खास सादरतेची कोणतीही १९२ पानी जुनी पुस्तके १०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.
सूचना: अनंतकाल जगू शकाल आणि कौटुंबिक या पुस्तकांचा उत्तम वापर करीत राहण्याचे उत्तेजन आम्ही सर्व मंडळ्यांना देतो. संपूर्ण वर्षादरम्यान, या पुस्तकाच्या प्रती आपल्यासोबत ठेवून प्रत्येक उचित प्रसंगी त्या सादर करण्याचे उत्तेजन प्रचारकांना दिले जाऊ शकते. ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.
◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने डिसेंबर १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीमध्ये घोषणा करा.
◼ सन १९९७ चा स्मारकविधी रविवारी, मार्च २३ रोजी सूर्यास्तानंतर आहे. बांधव, आवश्यकतेनुसार सभागृहांचे आरक्षण करू शकतील म्हणून ही स्मरणिका दिली जात आहे.
◼ जानेवारीपासून विभागीय पर्यवेक्षक, “आपला देव यहोवा यासारखा कोण आहे?” हे जाहीर भाषण देतील. गुरुवारी (अथवा शुक्रवारी) दिल्या जाणाऱ्या पहिल्या सेवा भाषणाचा विषय असा आहे: “सुवार्ता सांगण्यात गर्क व्हा,” आणि त्याच दिवशी ४५ मिनिटांच्या एकत्रित मंडळीच्या पुस्तक अभ्यासानंतर दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या सेवा भाषणाचा विषय आहे: “सद्मार्ग की अपमार्ग—तुम्ही कोणता पत्करता?” हे प्रत्येक भाषण २५ मिनिटांचे असून गुरुवार (अथवा शुक्रवारच्या) सभेचा एकूण कालावधी एक तास आणि ५० मिनिटांचा असेल. ‘शिकलेल्या गोष्टी करत राहा,’ हे बदलण्यात आले आहे.
◼ सन १९९७ चे वार्षिक वचन आहे: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव.”—स्तोत्र १४३:१०. मंडळ्यांना नवीन वार्षिक वचनाचा फलक तयार करता आला तर उत्तम होईल जेणेकरून तो जानेवारी १, १९९७ रोजी अथवा त्यानंतर होता होईल तितक्या लवकर लावता येईल.
◼ कलकत्ता येथील प्रांतीय अधिवेशनाची तारीख बदलून जानेवारी ३-५, १९९७ करण्यात आली आहे.
◼ सन १९९७ दरम्यान सेवा फॉर्म्सचा अतिरिक्त साठा प्रत्येक मंडळीच्या वापरासाठी पाठवण्यात आला आहे. संबंधित बांधवांना उचित फॉर्म देण्यात मंडळीच्या सचिवांना मदत करण्यासाठी फॉर्म्ससोबत एक तपासयादी पाठवण्यात आली होती. हे फॉर्म ज्यासाठी आहेत त्या उद्देशाकरताच त्यांचा उपयोग केला जावा, त्यांना वाया घालवू नये. हे फॉर्म एका वर्षाकरता मंडळीसाठी पुरेसे आहेत का याची कृपया खात्री करून घ्या. अतिरिक्त फॉर्म हवे असल्यास, त्यांची मागणी तत्काळ करण्यात यावी. डिसेंबर १९९७ पर्यंत पुरतील इतक्याच फॉर्म्सची मागणी करा.
फॉर्म्ससोबत नवीन वॉचटावर प्रकाशनांच्या यादीच्या चार प्रती पाठवण्यात आल्या होत्या. एक सचिवांजवळ ठेवण्यात यावी आणि बाकीच्या साहित्य, नियतकालिके आणि जमाखर्च यांची देखरेख करणाऱ्या बांधवांना देण्यात याव्यात.