घोषणा
▪ साहित्य सादरता
जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. पर्याय म्हणून, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). उचित असेल तेथे किंवा यांपैकीच्या कोणत्याही एका पुस्तकासोबत कौटुंबिक जीवन पुस्तक सादर केले जाऊ शकते.
जुलै आणि ऑगस्ट: पुढीलपैकी ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि ईश्वरी नाम—जे सर्वकाळ टिकेल (इंग्रजी).
सप्टेंबर: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल किंवा जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना).
सूचना: आम्ही सर्व मंडळ्यांना कौटुंबिक जीवन आणि अनंतकाल जगू शकाल पुस्तकांचा उत्तम वापर करण्यास उत्तेजन देतो. प्रचारकांना या पुस्तकांच्या प्रती त्यांच्यासोबत वर्षभर ठेवण्यास व प्रत्येक उचित प्रसंगी त्यांस सादर करण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते. ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.
▪ सप्टेंबर ९, १९९६ ने सुरू होणाऱ्या सप्ताहापासून सप्टेंबर २९, १९९७ या दरम्यान सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक मंडळीच्या पुस्तक अभ्यासात विचारात घेतले जाईल.
▪ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, जून १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीत त्याची घोषणा करा.
▪ येथूनपुढे, संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या सर्व प्रादेशिक भाषांतील बायबलची किंमत ६०.०० रुपये असेल.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?: —नेपाळी, पंजाबी, हिंदी