घोषणा
◼ साहित्य सादरता
मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एक वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एक वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात. उचित ठिकाणी कौटुंबिक जीवन पुस्तक सादर केले जाऊ शकते.
जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. पर्याय म्हणून, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). उचित असेल तेथे किंवा यांपैकीच्या कोणत्याही एका पुस्तकासोबत कौटुंबिक जीवन पुस्तक सादर केले जाऊ शकते.
जुलै आणि ऑगस्ट: पुढील ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि ईश्वरी नाम—जे सर्वकाळ टिकेल (इंग्रजी).