‘देवाच्या अचूक ज्ञानाने वृद्धी होत राहो’
देवाबद्दलचे अचूक ज्ञान सार्वकालिक जीवनाप्रत नेते. (योहा. १७:३) देवाच्या अचूक ज्ञानामध्ये वृद्धी होण्याकरता आपल्यापरीने आपण सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. (कलस्सै. १:९, १०) एप्रिल २९ पासून आपण मंडळीच्या पुस्तक अभ्यासात सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. यामुळे देव वचनाबद्दलची आपली केवळ समजच वाढणार नाही, तर इतरांना ती शिकवण्यातही आपण उत्तमप्रकारे सज्ज होऊ. तुम्ही आगाऊ तयारी केल्यास, प्रत्येक आठवडी उपस्थित राहून सहभाग घेतल्यास, व ती माहिती सेवेत उपयोगात आणल्यास तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळेल.