एप्रिलसाठी सेवा सभा
एप्रिल १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३२ (७०)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मागील महिन्यापासून लागू झालेल्या नियतकालिक आणि वर्गण्यांच्या दरातील वाढीची आठवण प्रचारकांना करून द्या. स्मारक विधीच्या तुमच्या निरीक्षणाविषयी कोणत्याही उल्लेखनीय अहवालांचा उल्लेख करा.
२० मि:“एप्रिल दरम्यान ‘चांगल्या कामांत तत्पर’ असा!” सेवा पर्यवेक्षकांनी परिच्छेद १-१० प्रश्नोत्तराने पूर्ण करणे. (१) एप्रिल दरम्यान विस्तारित क्षेत्र सेवेसाठी स्थानिकरित्या कोणती योजना करण्यात आली आहे, (२) सर्वजणांना सहभाग घेण्यास कशी मदत दिली जाऊ शकते, आणि (३) नवोदितांना तसेच युवकांना कसे समाविष्ट केले जाऊ शकते ते स्पष्ट करा.
१५ मि:“योग्य मनोवृत्ती असलेल्यांचा शोध घ्या.” सुचवलेल्या प्रस्तुतींची उजळणी करा आणि त्यांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ते दोन प्रात्यक्षिकांद्वारे दाखवा. वेळ अनुमती देईल त्यानुसार, नियतकालिके सादर करण्याबद्दल जानेवारी १९९६ च्या आमची राज्य सेवा यामध्ये पृष्ठ ५ वर आढळणाऱ्या काही सूचना सांगा.
गीत २० (५५) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७२ (५८)
१५ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल; संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या नवोदितांना पुढील आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपण मदत करू शकतो अशा व्यावहारिक मार्गांची चर्चा करा. एप्रिल १, १९९१ चे टेहळणी बुरूज पृष्ठे ९-१२ याची उजळणी करा.
१५ मि:“अहोरात्र पवित्र सेवा करा.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ५ आणि ६ वाचा.
१५ मि:“एप्रिल दरम्यान ‘चांगल्या कामांत तत्पर’ असा!” परिच्छेद ११-१५ प्रश्नोत्तराने पूर्ण करा. सर्वांना त्यांच्या व्यक्तिगत परिस्थितींचे परीक्षण करण्यास आणि क्षेत्र सेवेतील त्यांचा पाठिंबा कसा वाढवावा हे पाहण्यास उत्तेजन द्या.
गीत ११३ (६२) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३३ (६८)
१० मि:स्थानिक घोषणा. एप्रिल २१ रोजी, “विकृत पिढीमध्ये निर्दोष राहणे” असे शीर्षक असलेल्या खास जाहीर भाषणाविषयी श्रोत्यांना आठवण करून द्या. सर्वांना उपस्थित राहण्याकरता मदत करण्यासाठी खास परिश्रम करण्यास प्रोत्साहन द्या.
१५ मि:“काळ बदलला आहे.” प्रश्नोत्तरे. लोकांच्या सर्वात निकडीच्या गरजा पूर्ण होतील अशा तऱ्हेने राज्य संदेश प्रस्तुत करण्यावर जोर द्या. जानेवारी १, १९९४, टेहळणी बुरूज, पृष्ठे २२-३ वर नमूद केल्याप्रमाणे, अनेक लोकांच्या मनात असलेले कौटुंबिक आणि सामाजिक विषय सुचवा.
२० मि:“विश्वास वार्ता ऐकण्यावरून होतो.” नियतकालिक वाटपांमुळे, ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास घेतले जाऊ शकतात अशाप्रकारे आस्था कशी विकसित केली जाऊ शकते याची चर्चा करा. दोन किंवा तीन सादरतांची प्रात्यक्षिके दाखवा.
गीत २०४ (१०९) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६ (४)
१५ मि:स्थानिक घोषणा. गेल्या आठवडी दिलेल्या खास भाषणातील ठळक मुद्यांची उजळणी करा. या सूचनेमुळे आस्थेवाईक लोक खऱ्या उपासनेकरता दृढ भूमिका घेण्यास कसे प्रवृत्त झाले पाहिजेत त्याची चर्चा करा. ‘देवाच्या अचूक ज्ञानाने वृद्धी होत राहो’ याकडेही लक्ष आकर्षित करा आणि मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला नियमितरित्या उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
१२ मि:प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण. सभांचे संचालन करणाऱ्या बांधवांनी उपस्थितांना त्यांच्या पहिल्या नावाने बोलावून त्यांच्यासोबत अनावश्यक फाजील सलगी का टाळावी याचे स्पष्टीकरण द्या.
१८ मि:सप्टेंबर १५, १९९५ च्या टेहळणी बुरूज पृष्ठे २०-३ मधील “गतकाळातील ईश्वरी कुटुंबे—आपल्या दिवसांकरता एक नमुना” या शीर्षकाच्या लेखाची वडील आणि सेवा-सेवक यांच्यामधील चर्चा. स्थानीयरित्या कुटुंबांना लाभ मिळण्याकरता व्यावहारिक अवलंब करा.
गीत १४३ (७६) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४४ (७८)
१२ मि:स्थानिक घोषणा. काहीजण यहोवाच्या साक्षीदारांचे वर्णन एखादा “गट” किंवा “पंथ” असे करून आपल्या कार्यहालचाली व हेतू यांविषयी इतरांची दिशाभूल करतात. युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठ २०२ चा उपयोग करून हा चुकीचा आरोप असल्याचे कसे दाखविले जाऊ शकते याचे संक्षिप्त स्पष्टीकरण द्या.
१५ मि:आपले क्षेत्र एकसारखे उरकणे. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. विखुरलेल्या किंवा दूरवरील क्षेत्रांमध्ये क्वचितच कार्य केले जाईल. श्रीमंत किंवा अतिशय धार्मिक लोक राहत असलेल्या ठिकाणांमध्ये काहीजण कार्य करण्याचे मुद्दामहून टाळतात. व्यापारी क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले जात असेल. काही प्रचारक, सध्या उरकण्यास आवश्यक असणाऱ्या क्षेत्रांऐवजी स्वतःला व्यक्तिगतपणे सोयीस्कर वाटणारी क्षेत्रे नेहमीच मागून घेतील. कार्य न झालेली क्षेत्रे उरकण्याच्या प्रयत्नात सर्वांना सहयोग देण्यास प्रोत्साहन द्या. बहुधा उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये दूरवरील ग्रामीण भागांमध्ये कार्य करण्यास उत्तम संधी मिळते; कदाचित मोटारीने जाणाऱ्या गटांची योजना केली जाऊ शकते. नकाशा परत देण्याआधी, घरी नसलेल्या लोकांसहित क्षेत्र पूर्णपणे उरकल्याची खात्री करा. तुमचे क्षेत्र सर्वोत्तम प्रकारे उरकण्यासाठी मदत कशी दिली जाऊ शकते हे दाखवण्याकरता इतर व्यावहारिक सूचना सादर करा.
१८ मि:मे दरम्यान टेहळणी बुरूज तसेच सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या सादर करा. प्रथम भेटीत, वर्गणीची प्रस्तुती नाकारण्यात आल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती सादर करा आणि उचित असल्यास, पुनर्भेट देताना पुन्हा वर्गणी सादर करा. घरमालकाला नियतकालिकांमध्ये रस आहे परंतु काही कारणास्तव त्याने वर्गणी स्वीकारली नसल्यास, नियतकालिक मार्ग स्थापन करण्याच्या ध्येयाने वाटपांचा अहवाल ठेवा. राज्य संदेश जनतेपर्यंत पोहंचवण्याकरता नियतकालिकाच्या वितरणाचे दीर्घकालीन लाभ सर्वात प्रभावकारी माध्यम आहे असा त्यावर जोर द्या. क्षेत्र सेवेला जाताना तुमच्याकडे नियतकालिकांचा साठा आहे याची खात्री करा; ती प्रत्येक संधीला सादर करा. साप्ताहिक नियतकालिक दिवसाकरता व्यक्तिगत योजना करणे हा वाटप वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. नियतकालिकांच्या साहाय्याने दुकानादुकानातील कार्य आणि मार्ग साक्षकार्य देखील फलदायी आहेत. ज्ञान पुस्तकाचा उपयोग करून अभ्यास सुरू करण्यासाठी तयार केलेल्या पुनर्भेटींचा आस्थेने मागोवा घ्या. कदाचित जानेवारी १९९६ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ३, परिच्छेद ३-५ वरील सादरतांचा उपयोग करून अलीकडील अंक सादर करण्याचे एक किंवा दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.
गीत १९५ (१०५) व समाप्तीची प्रार्थना.