एप्रिलमध्ये नियतकालिक कार्यासाठी तयारी करा
आपल्या १९९६ दिनदर्शिकेवर नमूद केल्याप्रमाणे, प्रभूचे सांजभोजन या वर्षी एप्रिल २ रोजी पाळण्यात येईल. या महान प्रसंगाने उत्तेजित होऊन, सबंध एप्रिलमध्ये आपण सर्वजण आवेशी नियतकालिक वितरणात सहभाग घेऊ या. आपण किती समयोचित नियतकालिके उपयोगात आणणार आहोत! एप्रिल १ चे टेहळणी बुरूज, “सनातन राज्याची स्तुती करा!” या मागील वर्षाच्या प्रांतीय अधिवेशनाच्या जाहीर भाषणावर लक्ष केंद्रित करील. एप्रिल १५ टेहळणी बुरूज नियतकालिकाला “खोट्या धर्माचा अंत जवळ आहे” या मागील एप्रिलच्या खास जाहीर भाषणाचा विषय असेल. एप्रिल २१ रोजी, “विपरीत पिढीमध्ये निर्दोष राहणे” या वर्षाच्या खास भाषणाने राज्य कार्यहालचालीला अधिक उद्दीपन द्यावयास हवे. आपण “येथून पुढे युद्ध नसणार” या विषयाचे एप्रिल २२ सावध राहा! नियतकालिक सादर करणार आहोत.
मागील एप्रिलमधील राज्य वार्ता याच्या मोहिमेचा मागोवा म्हणून या वेळेस एप्रिल महिना नियतकालिक वितरणासाठी उल्लेखनीय असला पाहिजे. योजना करण्याची वेळ आता आहे. अनेकांना साहाय्यक पायनियर या नात्याने नाव नोंदवण्यास आवडेल. आवश्यकतेनुसार, एप्रिलच्या नियतकालिकांच्या जादा प्रती मागवल्या जाव्यात. नियतकालिक दिवसांसाठी योजना केल्या जाव्यात, व शक्य असेल त्या सर्वांनी—सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी सहभाग घ्यावा. आपण सर्वजण “वचनाप्रमाणे आचरण करणारे” बनू या. स्तोत्र ६९:९ मध्ये मशीहाविषयी भाकीत केल्याप्रमाणे, आपल्यालाही असे म्हणता यावे: “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.”—याको. १:२२; योहा. २:१७.